Submitted by मनी on 11 January, 2016 - 16:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
६- ७ मजदूल(खजूराचा एक प्रकार) खजूर बीया काढून किंवा कुठले ही मऊ खजूर
३ टेबलस्पून साखर नसलेली कोको पावडर
अंदाजे १ वाटी मिळून बदाम, आक्रोड, मनूका आणि काजू
मी थोडे मखाणे घेतलेले.
४-५ थेंब वॅनिला एसेंस किंवा वॅनिलाच्या बिया, मी बिया घेतलेल्या.
फोटो: हे दिसतं अगदी खजूर रोल सारखं पण चवीला चॉकलेट लागतं.
क्रमवार पाककृती:
आधी फूड प्रोसेस्सर मध्ये बदाम, आक्रोड, मनूका, मखाणे आणि काजू फिरवून घ्यायचे मग खजूर घालायचे आणि ३०-४० सेकंद फिरवायचं. खजूर छान बारिक झाले कि कोको पावडर घालायची. थोड्या वेळात या मिश्रणाला हलकं तेल सुटायला लागतं. तेल सुटलं कि वॅनिला घालून १-२ सेकंद फिरवाय्चं आणि एका पसरट भांड्यात थापायचं. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवायचं आणि सकाळी बारसारख्या वड्या कापायच्या.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे १-१.२५ इंच * ३ इंच आकाराचे ८-९ बार झाले.
अधिक टिपा:
१) जास्त वेळ प्रोसेसर मध्ये फिरवू नये. खुप तेल सुटलं कि मग आवरता आवरत नाही.
माहितीचा स्रोत:
मीच, माझ्या मुलीला शाळेनंतर डान्स क्लास असतो म्हणून क्लासपर्यंत जाईपर्यंत संपेल असं काहीतरी बीना साखरेचं हवं होतं. एकदा दुकानातून आणलेला चॉकलेट बार आवडला म्हणून साखर वजा करून खजूर घात्ला.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो?
फोटो?
कोको पावडर न घालता करते मी
कोको पावडर न घालता करते मी वेगवेगळ्या काँबोचे बार्स. एकदा कोको पावडर घालून पाहिन. म्खाणे पण इंट्रेस्टिंग अॅडिअशन आहे. मुलांना स्नॅक्सची सवय असेल तर फारच हँडी आणि पौष्टिक पर्याय आहे.