आऊसाहेब माफ करा,....
कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. 9730573783
आऊसाहेब आपला समाज,बदलला आहे खुप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| धृ ||
साठवून ठेवलेलं मनातलं काही
आज तुमच्यापुढे खोलायचं आहे
आजच्या वास्तवी परिस्थितीवर
आऊसाहेब तुम्हा बोलायचं आहे
अवजड आहे सांगणं,अंगाचा ऊडलाय थरकाप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| १ ||
ज्यांना इतिहास समजला नाही
त्यांचाच भलता रव होतोय
बदनामी केली तुमची ज्यांनी
त्यांचाही इथे गौरव होतोय
जणू निखळत चाललाय,तो दाप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| २ ||
स्रीया सोसताहेत झळ अजुनही
सामाजिक विषमता विरली नाही
कर्मकांड अन् घातक अंधश्रध्दा
समाजात अजुनही हरली नाही
आज असता तुम्ही तर,केला असता तोफ मारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ३ ||
जात पाहिली,ना धर्म पाहिला होता
सामाजिक अधोगतीचा तो वर्म पाहिला होता
महाराष्ट्राच्या मातीसाठी,मातीमधल्या माणसांसाठी
स्वराज्य निर्मितीचा तो मर्म पाहिला होता
विनला सामाजिक समतेचा एकात्मिक गोफ सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ४ ||
तुमचे नितीमुल्य अन तत्वही सारे
समाजात कसोसीने मांडतो आहोत
जिथे नैतिकता बिघडेल तिथे-तिथे
आज वैचारिकतेने भांडतो आहोत
पण ज्यांना आपले समजले,तेच ठरतात लोप सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ५ ||
तुमच्या एका हाके सरशी तर
मावळे सारेच्या सारे एक झाले
तेव्हा कुठे स्वराज्य निर्मितीचे
ते सकस कार्य नेक झाले
शुर वीर त्या मावळ्यांचा,धन्य धन्य तो स्टाफ सारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ६ ||
आज त्याच मावळ्यांचे वंशज
इतिहास जणू विसरले आहेत
इमान ठेवलंय गहाण आणि
बेइमानी मध्ये घसरले आहेत
राजे व्हायचंय त्यांनाही,असुन देखील पोटमारा
लाज वाटते आम्हा पण,आऊसाहेब माफ करा,...|| ७ ||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
* सदरील कविता नावासहीत शेअर करण्यास परवानगी
* या कवितेचा ऑडीओ ऐकण्यासाठी 9730573783 या व्हाटस्अप नंबर वर संपर्क करा
सुंदर!!
सुंदर!!