Submitted by गजानन on 4 January, 2016 - 13:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
कच्ची आणि अगदी कोवळी उंबरे (साधारण पावकिलो). अशा उंबरांनाच दोड्या (स्त्री.अ.व. ) असेही म्हणतात.
फोडणीसाठी: कांदा, तेल, तिखट, मीठ, हळद.
क्रमवार पाककृती:
उंबरे कोवळी हवीत. आकाराने एक ते दीड सेंमीपेक्षा मोठी नसावीत.
कोवळी उंबरे स्वच्छ धुवून घ्यावीत.
कुकरमध्ये/टोपात शिजवावीत.
शिजवलेली उंबरे फोडावीत (एकाचे दोन भाग तरी व्हावेत.)
कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यावा.
मीठ, हळद घालावे.
त्यात उकडून फोडलेली उंबरे घालून चवीप्रमाणे तिखट घालून चांगले परतावे. एक वाफ आली की भाजी तयार!
वाढणी/प्रमाण:
२ माणसे
अधिक टिपा:
किलोवर उंबरे कधी जोखली नसल्याने अंदाजाने पावकिलो लिहिले आहे. पण उंबरे बाजूला काढतानाच त्यांच्या ढिगावरून किती घ्यायला लागतील याचा अंदाज यावा.
माहितीचा स्रोत:
आऊसाहेब
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उंबरांची भाजी? प्रथमच ऐकले.
उंबरांची भाजी? प्रथमच ऐकले. जबरीच
छान प्रकार. हीच भाजी मटणाचा
छान प्रकार. हीच भाजी मटणाचा मसाला घालूनही करतात. कच्ची उंबरे ठेचून घेऊन करतात. जवळ उंबराचे झाड असेल तर करता येईल. बाजारात विकायला आलेली बघितली नाही मी कधी.
याचा तसा सिझन असा नसतो, पण प्रत्येक महिन्यात साधारण एक तरी उंबराचे झाड फळावलेले असते. ते झाड ज्या किटकांवर अवलंबून असते त्यांचे आयूष्य फार थोडे असते, त्यामूळे त्यांना जगवण्याची जबाबदारी ही झाडे घेतातच.
उंबरं खाण्यावरून मी एकदा इतकी
उंबरं खाण्यावरून मी एकदा इतकी बोलणी खाल्ली आहेत की रेसिपी सुद्धा थरथरत्या हातांनी उघडली
व्वा, भारतात होतो तेव्हा
व्वा, भारतात होतो तेव्हा माहीत असते तर नक्कि बनवून पाहीली असती ही भाजी, शेजार्यांचं एक उंबराचं झाड खुप बहरलं होतं.
शिजवलेली उंबरे फोडावीत >> म्हणजे कुकरमध्ये उंबरं मऊ शिजत नाहीत कां?
गजानन.. चक्क उंबरा ची भाजी??
गजानन.. चक्क उंबरा ची भाजी?? पहिल्यांदाच ऐकली.. विकायलाही कधी पाहिली नाही बाजारात..
फोटो टाकायचा ना एखादा.. आता उंबरं झाडावर/ टोपलीत असली तर ओळखायचे वांधे आमचे..
उंबर म्हणजे फिग का? सिजन मधे
उंबर म्हणजे फिग का? सिजन मधे करता येईल.
फिग म्हणजे अंजीर.
फिग म्हणजे अंजीर.
पहिल्यांदाच ऐकली ही भाजी.
पहिल्यांदाच ऐकली ही भाजी. खाली आहे सोसायटीत उंबराचे झाड. लहानपणी पिकलेली उंबरे खायचो. जुन्या घराच्या रस्त्यावर होतं. पण कधी कधी किडे असायचे मग नाही खायचो.
प्रथमच ऐकली. कधी योग येईल काय
प्रथमच ऐकली.
कधी योग येईल काय माहीत!
>> दोड्या (स्त्री.अ.व. स्मित )
याला म्हणतात हाडाचे ते हे!
आमच्या शेजारच्या बंगाली बाईने
आमच्या शेजारच्या बंगाली बाईने खूप वर्षापुर्वी केले होती.
ओल्या नारळाचा कीस मसाल्यात घातला की अजुन छान होते.
त्यानी उंबराचे चार तुकडे करुन डायरेक्ट भाजी केली होती.
फिग म्हणजे अंजीर. < ओह ओके तर
फिग म्हणजे अंजीर. < ओह ओके
तर अशीच भाजी कच्च्या अंजीराची करता येईल का?
अहो गजाननराव, फोटो द्या ना...
अहो गजाननराव, फोटो द्या ना...
ज्यांनी पहिल्यांदा ऐकली
ज्यांनी पहिल्यांदा ऐकली त्यांनी एकदा जरूर करून खा. भाजी चांगली होते.
बाजारात विकायला ठेवलेली कोवळी उंबरे मीही आजवर पाहिली नाहीत. कोवळ्या उंबरांत किडे/पाखरे नसतात.
कुकरमध्ये मऊ शिजतात. फोडायची म्हणजे फक्त अख्खी ठेवायची नाहीत अन्यथा तिखट-मीठ नीट लागणार नाही. पण चेचून अगदी "चेचल कांदा अन् भरीत रेंदा"ही करायचा नाही.
फोटू माझ्याकडे नाहीत. मिळाले की टाकतो.
अंजीरांचीही अशी भाजी करता येईल की नाही कुणास ठाऊक.
पहिल्यांदाच बघितली ही
पहिल्यांदाच बघितली ही भाजी
मागे झाड आहे पण ........
जावूदे झाल
उंबराची भाजी पहिल्यांदाच
उंबराची भाजी पहिल्यांदाच ऐकली.
स्त्री.अ.व.>>>> म्हणजे काय?
स्त्रीलिंगी अनेकवचन (असावे
स्त्रीलिंगी अनेकवचन (असावे बहुदा.)
गजाभौजी, छान रेसिपी. उंबरे मिळाली तर करून बघणेत येईल.
माझ्या कुंडीतल्या उंबराला २-३
माझ्या कुंडीतल्या उंबराला २-३ उंबरे लागलीआहेत.
मटणासारखी भाजी करतात असेही ऐकले होते.
हं... नवीन आणि छान रेसिपी.
हं... नवीन आणि छान रेसिपी.