Submitted by मया on 31 December, 2015 - 23:55
प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा …
माझ गेल्याच आठवड्यात लग्न झाल आहे तरी मला तुमच्या कडून हि माहिती हवी आहे कि आता मला कुठली certificate काढावी लागतील बायकोची आणि कुठून. कुठली certificate online करून सुद्धा मिळू शकतात त्याची माहिती द्या. खूप खूप मदत होईल काहीच माहिती नाही आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लग्नाबद्दल उभयतांचे
लग्नाबद्दल उभयतांचे अभिनंदन.
जन्ममृत्युच्या नोंदणीप्रमाणेच लग्नाची नोंदणी करणे आवश्यक असते, व ती तुम्ही वा वधू लग्नापूर्वी जिथे रहात होती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार क्षेत्रात नोंदणी करता येते.
याबाबत ऑनलाईन वगैरे सोय मोठ्या महानगरपालिकात असते, पण ती माहिती भरण्यापुरती, प्रत्यक्ष भेट द्यावीच लागते.
रजिस्ट्रेशन करतान तिन (की चार?) साक्षिदार लागतात. सक्ति नाहीये, पण शक्यतो वधु व वर पक्षाकडील एकेके जबाबदार व्यक्ति साक्षिदार म्हणून निवडावी. लग्न धार्मिक पद्धतीने झाले असल्यास लग्न लावणार्या ब्राह्मण/अन्य धर्मातील धर्मगुरुचे नाव पत्ता सही लागते.
तुम्ही सध्या कुठे रहाता, लग्न कुठे झाले वधूचे माहेर कुठले, यातिल सोईस्कर जागा निवडुन रजिस्ट्रेशन करावे.
लग्नाचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर, बँक अकाऊंट, प्रॉपर्टी, इंश्युरन्स क्लेम्स वगैरे बाबत वापर करता येतो.
तुमच्या इन्श्युरन्स अगेन्स्ट बायकोची डिलीव्हरी वा अन्य वैद्यकीय खर्चाचा क्लेम करायचा असल्यासही, इन्श्युरन्स कंपन्या मॅरेज सर्टिफिकेट मागतात.
रजिस्ट्रेशन करताना "नावाचे" (बायकोचे नाव बदललेले असल्यास्/बदलायचे असल्यास) काळजीपूर्वक भरावेत.
साहेब तुम्ही दिलेल्या माहिती
साहेब तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद परंतु मला असे काहीतरी सोयीस्कर सांगा जेणे करून मला एक तरी certificate मिळवता येईल (उदा. वोटिंग कार्ड, पैन कार्ड, आधार कार्ड, लग्न प्रमाणपत्र)
आजून काही माहिती देऊ शकता तर द्यावी .
हि घ्या लिस्ट : १) marriage
हि घ्या लिस्ट :
१) marriage certificate
if you are going to change the name -->
1) gazette
2) PAN with new name
3) Passport with new name
4) Aadhar Card : you can apply the change on-line too
5) Name change at Bank
पुण्यात आहात का? असल्यास विपु करा.. एजंट चा पत्ता देते
साहेब मी मुंबईत राहतो इकडच्या
साहेब मी मुंबईत राहतो इकडच्या कोणी agent चा पत्ता द्या .
रेशन कार्डात पत्नीचे नाव अॅड
रेशन कार्डात पत्नीचे नाव अॅड करावे लागेल
>>>> परंतु मला असे काहीतरी
>>>> परंतु मला असे काहीतरी सोयीस्कर सांगा जेणे करून मला एक तरी certificate मिळवता येईल (उदा. वोटिंग कार्ड, पैन कार्ड, आधार कार्ड, लग्न प्रमाणपत्र) <<<<<
आता तुम्हाला कित्ती "सोईस्कर" हातात आणुन हवय त्यावर हे नियम नसतात हो.
लग्न केलेत तर सर्वप्रथम मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट हवेच हवे. सर्वात पहिल्यांदी ते "एक तरी" सर्टीफिकेट मिळवा, नंतर बाकीच्या बाबी, जशा वर अवनी यांनी दिल्यात. त्यात अजुन भरही पडू शकते.
लिंबु काका + १
लिंबु काका + १
प्रथम मॅरेज सर्टिफिकेट काढ़ा
प्रथम मॅरेज सर्टिफिकेट काढ़ा महापालिकेतून
त्याच्यासाठी लागणार कागद
१ वधु-वरांचे रंगीत फोटो (पासपोर्ट साइज़)
२ लग्न प्रसंगाचा एक फोटो (कलर फोटो, हार घालतानाचा किंवा रिसेप्शन मधला)
३ दोघांच्या वयाचा दाखला (टीसी)
४ दोघांच्या रहिवासाचा दाखला (पत्नी साठी आधार चालते पती ने आपल्या राहत्या घराची लेटेस्ट घरपट्टीची पावती किंवा भाड्याने राहत असल्यास भाड़ेकरारनामा)
५ लग्नाची पत्रिका
विवाह नोंदणी चा एक फॉर्म मिळतो त्यात समस्त माहीती साग्रसंगीत भरायची अन ३ साक्षीदार + लग्न लावलेला धर्मगुरु (आपापल्या धार्मिक मान्यतेनुसार) चे नाव भरायचे , भटजीबोवाना वेळ नसल्यास त्यांची नुसती सही आणली फॉर्म वर तरी चालते, मात्र साक्षीदार मंडळीने तुमच्या सोबत येऊन महापालिकेतल्या कार्यालयात विवाह नोंदणी आयुक्तासमोर सही करणे गरजेचे असते, त्याच वेळी तुमचे अन पत्नीचे अंगठा ठसे सुद्धा घेतले जातील, समग्र पूर्तता करून कागदपत्रे दाखल केल्यास त्या तारखेपासुन सातव्या दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र हाती मिळते
लग्नाबद्दल अभिनन्दन. वर अवनी
लग्नाबद्दल अभिनन्दन. वर अवनी यान्नी सान्गितले आहे... सर्वप्रथम मॅरेज सर्टिफिकेट घ्या... मग पॅन, आधार कार्ड... पासपोर्ट...
सोन्याबापु, अगदी बरोबर
सोन्याबापु, अगदी बरोबर सांगितलेत.
(वर सोन्याबापुंना एक लाईक दिलेला दिस्तोय, तो मीच दिलाय, अजुन कुणीतरी अवनीलाही दिलाय
)
हो, अन मयाभौ, तेव्हड तपशीलात मिळालेल्या उत्तराला कडेच्या + चिन्हावर क्लिकुन "आवडल्याचे" कळविण्याची तसदीही घ्या....
वेळच्यावेळेवर, जिथल्यातिथे "आवडल्याचे" कळविणे ही सवय दांपत्यजीवनात फार महत्वाची आहे बर्का..... उपयोगी पडेल
अहो आमच्या लग्नाला नोवेंबर
अहो आमच्या लग्नाला नोवेंबर मधे १ वर्ष झाले अन तेव्हाच बायको न "प्रोबेशन उर्फ़ परिविक्षा कालावधी उमेदवारांनी व्यवस्थित पुर्ण केल्याचे" प्रमाणपत्र दिले तस्मात् ७ दिसंबर ला सर्टिफिकेट काढता झालो
एलओएल सोन्याबापू, तरीच,
एलओएल सोन्याबापू, तरीच, तुमच्याकडची माहिती ताजी ताजी आहे....
आमच्या वेळेस असले ऑनलाईन वगैरे काही नव्हते, पुण्यात बंडगार्डन रोडवर मोबोस हॉटेलमधे जाऊन नोंदणी करावी लागायचि.
बापरे एवढी सर्टीफिकेटंस
बापरे एवढी सर्टीफिकेटंस काढावी लागतात...
त्यापेक्षा डिव्होर्स सर्टिफिकेट घेऊन मोकळे झालेले बरे..
धागाकर्त्यांनू मी माझे बोलतोय हा. तुम्ही मनावर घेऊ नका. लग्नाच्या बीलेटेड शुभेच्छा.
हे २०१६ तुमच्या आयुष्यातील सर्वात बेस्ट वर्ष असणार,
आणि पुढे याच वर्षाच्या आठवणींवर जगावे लागणार
if you are going to change
if you are going to change the name -->
1) gazette
2) PAN with new name
3) Passport with new name
4) Aadhar Card : you can apply the change on-line too
5) Name change at Bank
पुण्यात आहात का? असल्यास विपु करा.. एजंट चा पत्ता देते
मला पाठवाल का? क्रुपया विपु कराल का?
राजेंद्र देवी
नाव बदलावयाचे असल्यास शासकिय
नाव बदलावयाचे असल्यास शासकिय राजपत्रामधे तशी नोंद घेणे आवश्यक !
आपल्याला हवी असलेली माहिती वर
आपल्याला हवी असलेली माहिती वर इतरानी दिलेली आहेच. मीं तुम्हाला आणखी कांहीं बाबींबद्दल जागरूक रहायला सांगतो-
१] माझ्या मुलीच्या लग्नाच्या दाखल्यांत नांव, तारिख इ. इतक्या गिचमीड अक्षरांत लिहीलेलं आहे कीं धड वाचतांही येत नाही. म्हणून, दाखला मिळाला कीं सर्व तपशील बरोबर आहे व नीट वाचतां येतो याची खात्री करून घ्या;
२] अधिक पैसे पडत असले तरीही दाखल्याच्या अधिकाधीक मूळ प्रति मागून घ्या;
३] कांहीं ठिकाणीं 'लॅमिनेट' केलेला लग्नाचा दाखला स्विकारार्ह समजला जात नाहीं [उदा. पासपोर्ट कार्यालय]; दाखल्याच्या कांही मूळ प्रति 'लॅमिनेट' न करतां ठेवा.
सोन्याबापू >>+१ joint account
सोन्याबापू >>+१
joint account काढ़ा bankमधे किंवा तुमच्या account मधे पत्नीचे नाव जोडा ...पासपोर्ट साठी सोपे होइल...
परदेशी जायचे असल्यास ( अगदी
परदेशी जायचे असल्यास ( अगदी हनिमूनसाठीही ) तरी काही देशात मॅरेज सर्टीफिकेट लागते. त्याशिवाय हॉटेलमधे एका रुममधे राहता येत नाही. मागाहून पासपोर्ट वर पत्नी म्हणून नाव नोंदवले तर चालते.
कधी कधी मॅरेज सर्टीफिकेटच्या ( किंवा कुठल्याही सर्टीफिकेट्च्या ) मागे काही शिक्के मारून घ्यावे लागतात. त्यासाठी लॅमिनेशन केलेले चालत नाही. हवे तर असे सर्टीफिकेट चांगल्या फोल्डरमधे ठेवा. तसेच या सर्टीफिकेटच्या प्रती मुलीच्या माहेरी व तूमच्या घरी पण देऊन ठेवा. उपयोगाला येतात.
अरे धागाकर्ते कुठे गेलेत? ते
अरे धागाकर्ते कुठे गेलेत? ते का नाही काही बोलत?
किमान लग्नाची नोंद्णी एजंट
किमान लग्नाची नोंद्णी एजंट मार्फत होत नाही. तुम्हाला महानगरपालिका किंवा तत्सम कार्यालयात जावेच लागते. तिथे सहायक आयुक्त दर्जाचा माणुस तुमची आणि नातेवाईक यांची एकाच वेळी उपस्थिती असताना कागदपत्रांची छाननी करुन तसे प्रमाण पत्र देतो. हा दाखला फक्त तुम्ही विवाहीत असल्याचा निदर्शक आहे.
लग्न झाल्यावर लग्नाचे प्रमाणपत्र मिळवले म्हणजे लग्नाआधीचे नाव बदलले असे होत नाही. या करता वेगळे अॅफिडेव्हीट करुन ते गॅझेटमध्ये प्रसिध्द करावे लागते. हीच पध्दत इतरवेळी पुरुषांना सुध्दा आई- वडीलांनी ठेवलेले नाव पसंत नसेल किंवा काही आडणावे ( जातिवाचक वाटतात म्हणुन / उच्चारताना काही हिणकस शब्द प्रयोग वाटतात अशी असतील ) बदलायची असतील तर वरील पध्दत कायदेशीर आहे.
हे झाल्याशिवाय आधारकार्ड/ पॅन कार्ड किंवा तत्सम ठिकाणी नावबदल करणे शक्य नाही.
हो नितिनचंद्र, महाराष्ट्राचे
हो नितिनचंद्र, महाराष्ट्राचे गॅझेट मराठी आणि इंग्रजी अश्या दोन भाषात ( लिप्यात ) प्रसिद्ध होते. महाराष्ट्राबाहेर जर ती जाहिरात वापरायची असेल, तर इंग्रजी मधे छापून आणावी.
किमान लग्नाची नोंद्णी एजंट
किमान लग्नाची नोंद्णी एजंट मार्फत होत नाही. तुम्हाला महानगरपालिका किंवा तत्सम कार्यालयात जावेच लागते. तिथे सहायक आयुक्त दर्जाचा माणुस तुमची आणि नातेवाईक यांची एकाच वेळी उपस्थिती असताना कागदपत्रांची छाननी करुन तसे प्रमाण पत्र देतो. हा दाखला फक्त तुम्ही विवाहीत असल्याचा निदर्शक आहे.>>>>>> + १०००
मुम्बईत बान्द्रयाला जाउन लग्न नोन्दणी करावी लागते .
अगोदर जाउन फॉर्म घेउन या . भटजीच्या वगैरे सह्या लागतात .
लग्न पत्रिका प्रूफ म्हणून देताना , त्यावर मुहुर्त असेल पहा. आम्ही रिसेप्श्न ची पत्रिका नेली होती .आम्हाला अडवले होते. आम्हाला वाटले , आता परत जावे लागणार . पण नशिबाने झाल काम.
मॅरेज सर्टिफिकेट मिळाल्यावर मग बाकीच्या ठिकाणी पत्नीचे नाव बदलावे.
माझा यु. एस वीजा होता म्हणून मी पास्पोर्ट नविन बदलला नाही .
लेकाच्या पासपोर्ट वर ही माझे जुने नाव होते.
मॅरेज सर्टिफिकेट बर्याच टिकाणी प्रूफ म्हणून चालले.
आता ईतके वर्शानी सगळी कडे हळू हळू नाव बदलून घेत आहे.
मेरे लगीन का फोटू नही है मेरे
मेरे लगीन का फोटू नही है मेरे पास , फिर भी मॅरेज सर्टफिकेट मिलेंगा क्या ?...
अब बायको का वोटींग कार्ड और आधार कार्ड भी आयेला है नये नाम वाला लेकीन वो मॅरेजवाला सर्टफिकेट नही है
थोडासा कामात व्यस्त होतो
थोडासा कामात व्यस्त होतो कालच online gazette साठी apply केल झालं सुधा ते सकाळी घरी येउन पैसे आणि कागदपत्र घेऊन गेले. पंधरा दिवसात घरी येईल म्हणाले. आता हे झाल्यावर लग्नाचा प्रमाणपत्र काढीन म्हणतो.
थोडासा कामात व्यस्त होतो कालच
थोडासा कामात व्यस्त होतो कालच online gazette साठी apply केल झालं सुधा ते सकाळी घरी येउन पैसे आणि कागदपत्र घेऊन गेले. पंधरा दिवसात घरी येईल म्हणाले. आता हे झाल्यावर लग्नाचा प्रमाणपत्र काढीन म्हणतो.
>>
प्रथमनाव बदलले आहे का? तसे नसल्यास आडनावात चेंज सगळीकडे चालतो लग्नानंतर, लग्नाचा दाखला जोडावा लागतो.
प्रथमनाव बदलले असल्यास आधी सर्टिफिकेट घ्यावे मग ग्याझेट ते मध्ये द्यावे. माझ्यावेळी अशी प्रोसिजर सांगण्यात आली होती. अर्थात ग्याझेटचा नंतर काहीही उपयोग नसतो. पासपोर्टला २ वर्तमान पत्रात जाहिरात आणि अफेडेव्हीट द्यावे लागते ग्याझेट चालत नाही. एकदा पासपोर्ट आला की नंतर कसल्याच गोष्टीची गरज रहात नाही., म्हणजे, पासपोर्टनी काम होऊन जात.
तात्या लग्न झाल तेव्हा रिती
तात्या लग्न झाल तेव्हा रिती प्रमाणे नाव बदलायचा कार्यक्रम पार पाडला पण नाव तेच ठेवल आहे पूर्वी श्वेता होता आता पण श्वेताच ठेवले आहे.
gazette साठी apply केल आहे.
पुढचा मोर्चा कुठ्ये वळवू तेच कळत नाही आहे कारण pan कार्ड , aadhar card काढायला गेल तर त्यांचे जे प्रूफ साठी documents मागत आहे.
pan card काढायला गेलो tar आधार card प्रूफ मागत आहेत
आधार कार्ड काढायला गेलो तर pan कार्ड प्रूफ साठी मागत आहेत
कोणाला माहित असेल तर सांगा मॅरेज सर्टीफिकेट काय प्रूफ असावे लागते
online gazette ची लिंक
online gazette ची लिंक हवीय.अथवा मुंबई / पुण्याचा पत्ता.
प्रथम नावात बदल नसल्याने
प्रथम नावात बदल नसल्याने तुम्हाला पासपोर्ट काढणे सोपे जाईल. ह्या लिंक वर आपली माहिती भरा, कोणते डॉक्युमेंटस लागतील ते कळेल.
http://passportindia.gov.in/AppOnlineProject/docAdvisor/attachmentAdvFre...
आधीचे आयडेंटीटी कार्ड आहे का कोणते? ते + लग्नाचा दाखला जोडून काम होऊ शकते. पासपोर्टसाठी तेवढेच लागते. तेव्हा पहिले पासपोर्ट काढा.
लग्नाच्या दाखल्यासाठी
१. लग्नाआधीचे आयडेंटीटी कार्ड
२. लग्नाआधीचा रहिवासाचा पुरावा
३. शाळा सोडल्याचा दाखला () अथवा बर्थ सर्टीफिकेट. (जन्म ८९ नंतरचा असेल तर बहुधा शाळा सोडल्याचा दाखला जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालत नाही)
४. लग्न पत्रिका, फोटो, फोर्मवर गुर्जींची सही आदी गोष्टी लागतात.
जर लग्नाआधीच आयडेंटीटी कार्ड नसेल तर एमएलए किंवा राजपत्रित अधिकारीचे सही शिक्क्यानुसार पत्र लागते. त्या पत्राचा मसुदा आधार किंवा PAN कार्डाकरिता वेगळा असतो. तेव्हा वेबसाईटवर बघून पत्र तयार करा.
इथे PANसाठीची पूर्ण माहिती मिळेल.
https://tin.tin.nsdl.com/pan/Instructions49A.html#instruct_documents
PAN कार्ड साधारण ६० दिवसात येते. राजपत्रित अधिकारीचे सही शिक्क्यानुसार पत्र जोडून PAN कार्डसाथि अप्लिकेशन करून टाकता येईल.
तात्या तुम्ही दिलेल्या माहिती
तात्या तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद …….
ग्रामीण भागातल्या लोकांसठी
ग्रामीण भागातल्या लोकांसठी सूचना :
मॅरीज सर्टीफिकेट इंग्रजी मधून सुध्दा घ्या .