इडली रवा, १ वाटी
पाणी, एक ते सव्वा वाटी (अधिक टिपा पहा.)
ताक, १ वाटी (अधिक टिपा पहा.)
हिरवी मिरची (आवडीनुसार)
कढीलिंब, ४-५ पानं
मीठ (चवीनुसार)
तेल, फोडणीचं साहित्य
- मावेसेफ काचेच्या भांड्यात इडली रवा, पाणी, ताक, मीठ सर्व व्यवस्थित एकत्र करावं.
- छोट्या कढल्यात तेल-मोहरी-हिंग-कढीलिंब-मिरच्या यांची फोडणी करावी. ती इडली रव्याच्या मिश्रणावर ओतून मिश्रण लगेच चांगलं ढवळावं.
- मावेला झाकण टाकून हाय पॉवरवर आधी ३ मिनिटं मिश्रण शिजवावं.
- भांडं बाहेर काढून मिश्रण व्यवस्थित ढवळून पुन्हा हाय पॉवरवर झाकण टाकून ३ ते ४ मिनिटं शिजवावं.
- कोथिंबीर टाकून गरमागरम उपमा चापावा.
- अक्षरशः १० मिनिटांत उपमा तयार होतो.
- काचेचं भांडं आणि मावे यांच्यानुसार शिजवण्यासाठीचा वेळ थोडा इकडेतिकडे होऊ शकतो. करताना तितपत अंदाज घ्यावा.
- मऊ, गुलगुलीत उपमा आवडणार्यांनी वर दिलेलं पाणी-ताकाचं प्रमाण घ्यावं. ज्यांना मोकळा उपमा आवडतो त्यांनी ते प्रमाण कमी करावं.
- ताक खूप आंबट असल्यास ताक कमी आणि पाणी जास्त घ्यावं.
- इतर पदार्थांना फोडणीसाठी जितकं तेल वापरता त्यापेक्षा यात थोडं जास्त घ्यावं.
- फोडणीत हळद घालू नये.
- आंबट ताकाचा, बिनताकाचा, कांदा घालून इ. व्हेरिएशन्स करून खाऊन बघण्यात आलेली आहेत. पैकी हा प्रकार मला सर्वाधिक आवडला. ज्याने-त्याने आपापल्या जबाबदारीवर व्हेरिएशन्स करायला हरकत नाही.
(No subject)
इडली रव्याचे राईस बुलेट्स
इडली रव्याचे राईस बुलेट्स नेहमी केले जातात, पण ते शिजवून पुन्हा वाफवले नाहीत तर फार सुके सुके लागतात. हे मावेतलं प्रकरण एकदा करून बघायला पाहिजे.
रच्याकने, ते हाय पॉवरवर झाकण कसं ठेवायचं त्याचं एकदा प्रात्यक्षिक द्या बाई... आम्हाला फक्त भांड्यावर झाकण ठेवता येतं
हाय पॉवरवर झाकण कसं ठेवायचं
हाय पॉवरवर झाकण कसं ठेवायचं >>>
'प्रतिसाद तपासा' स्टेजला मला ते लक्षात आलं होतं. पण बदलायचा कंटाळा केला.
मस्त रेसिपी. मी पण करते पण
मस्त रेसिपी. मी पण करते पण मावेमध्ये नाही. करुन बघायला पाहिजे मावेत.
मस्त रेसिपी! मला मावेत जेवण
मस्त रेसिपी!
मला मावेत जेवण गरम करणे यापेक्षा अजुन काही करता येत नाही.. आता हे ट्राय करेन
तांदुळाच्या पिठाच्या उकडीटाईप
तांदुळाच्या पिठाच्या उकडीटाईप चव येते का?
मस्त ! करून पाहण्यात येईल
मस्त ! करून पाहण्यात येईल उपमा
लले तू चक्क अजून एक रेस्पी!
लले तू चक्क अजून एक रेस्पी!
मावे नसल्याने, कढईत करून पाहाणेत येईल ही रेस्पी
उलट मंजू राईस बुलेट्स ओले
उलट मंजू राईस बुलेट्स ओले ओलेच राहतात मी केलेले
आंबट ताकाची चव मस्त येत असेल. मी आलंही घालेन जरा. सोप्पी रेसिपी वाटतेय.
या दिवसात करताना उपम्यात गाजर-मटार घालायचे, की पौष्टिक उपमा तयार!
मी फॉलो करतो ती रेसिपी आणखी
मी फॉलो करतो ती रेसिपी आणखी झटपट आहे. (मूळ रेसिपी रवा इडलीची आहे. त्यातंच उपम्याचं व्हेरिएशन दिलंय) मावेमध्येच तुपावर फोडणी करून रवा हाय पॉवरवर एक मिनिट भाजायचा. मग पाणी+ लिंबाचा रस /ताक घालून ३-४ मिनिटे मायक्रोवव्ह केलं की उपमा तयार.)
इडल्या करायच्या असल्या तर रवा भाजून झाला की पाच मिनिटांनी दही, ओलं खोबरं, कोथिंबीर, पाणी , सोडा घालून नीट ढवळून दहा मिनिटे ठेवायचं आणि मग इडल्या करायच्या. .
मसाला रवा इडलीला सुरुवातीला काजू तुकडे तर व्हेजिटेबल रवा इडलीला गाजर्/फरसबी बारीक चिरून.
छान प्रकार आहे.
छान प्रकार आहे.
मी एकदा ओटमीलसारखा पण जरा
मी एकदा ओटमीलसारखा पण जरा जास्त वेळ असाच ताकात भिजवून शिजवून बघितला होता. पण कुछ जम्या नही ! शिजलाही नीट नाही आणि चविष्टही झाला नाही कढईतल्यासारखा. आता परत तुझी पद्धत फॉलो करुन पाहायला हवी.
उपमा आवडतो त्यामुले या
उपमा आवडतो त्यामुले या प्रकारे पण ताक न घालता करून बघेन नक्की. घरून काम करत असलं की काय जेवायचं हा प्रश्नच असतो, हा उपमा चांगला पर्याय आहे.
मस्त प्रकार आहे.
मस्त प्रकार आहे.
आंम्ही करून पहाण्यात
आंम्ही करून पहाण्यात येइल..असे म्हणू शकत नाही. कुणी करुन दिला
तर खाऊन पहाण्यात येइल..असं म्हणू शकतो.
आयडिया आहे. प्रयत्न करणेत
आयडिया आहे.
प्रयत्न करणेत येईल. (मला मायक्रोवेव्ह रेसिप्यांची भिती वाटते. :P)
आशू, चव किंचित वेगळी लागते.
आशू, चव किंचित वेगळी लागते. (उकडीत लसूण असतं नॉर्मली, यात नाही.)
चनस, उपमा, उकड क्याटेग्रीतले सर्व प्रकार मावेत अगदी पटकन होतात. करून पाहा.
अरे वा छान ग प्रिती. माझी
अरे वा छान ग प्रिती.
माझी सासू म्हणते की गावाला तांदूळाचा खास रवा काढून उपमा करतात.
ओक्के..
ओक्के..
उकडीत लसूण असतं नॉर्मली, यात
उकडीत लसूण असतं नॉर्मली, यात नाही. >>> बरोबर
मी आज लगेच केला गाजर,
मी आज लगेच केला
गाजर, कांदा, मटार घालून केला. हे सगळं फोडणीत परतून घेऊन ताक- पाणी- रवा- मीठ-साखरेच्या मिश्रणात घातलं आणि मावेत ३+१+१ मिनिटासाठी हाय पॉवरवर ठेवलं. छान झालाय उपमा. ताक+पाणी मिळून जवळपास तिप्पट होतं पण रव्याचा एखादा दाणा मधूनच कच्चट वाटला. पुढच्या वेळी इडलीरवा कोरडाच भाजून घेऊन बघेन.
छान प्रकार आहे.
छान प्रकार आहे.
केला. मस्त झाला. कोथिंबीर न
केला. मस्त झाला. कोथिंबीर न घालता पुदिना चटणी घेतली. मस्तच चव आली. थँक्स ललिता.
अरे वा, छान झटपट आणी टेस्टी
अरे वा, छान झटपट आणी टेस्टी दिस्तीये रेस्पी..
वेरिएशन पण छान आहे पुदिना चटणी चं
इडली रवा, उकड्या तांदळाचा
इडली रवा, उकड्या तांदळाचा असतो का ? रवा मिळणार नाही इथे, पण तांदूळ मिळतील.. घरी रवा करायचा म्हणतोय.