मायबोलीकर नंदिनी देसाई यांचा २२ तारखेच्या लोकसत्तामधील लेख

Submitted by संदिप एस on 23 November, 2015 - 05:52

http://www.loksatta.com/vishesh-news/heavy-rain-in-chennai-1162504/

मायबोलीकर नंदिनी देसाई यांचा २२ तारखेच्या लोकसत्तामधील लेख.. नंदिनी पत्रकारिते मध्ये कार्यरत आहेत हे माहिती आहेच पण तरीही आपल्या सगळ्यांच्या माहिती साठी हा धागा... अनावश्यक वाट्ल्यास उडवला तरी चालेल
काल हा लेख मी घरी आईला आणी सौ. ला दाखवला एक मायबोलीकर म्हणून छान वाटते वेगवेगळ्या क्षेत्रातील मायबोलीकरांबद्दल असे काही वाचले की.. अभिनंदन नंदिनी!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.

लोकसत्तामध्ये शब्दसंझ्येचं बंधन असल्यामुळे त्यांना लेख उडवणे ग्रजेचेच होते. मी ब्लॉगसाठी लिहिला असल्यानं निवांत पसरट लिहित गेले होते. Happy

आता परिस्थिती नॉर्मल आहे, मी रत्नागिरीला आली आहे. चेन्नईमधला पाऊस थांबला आहे आणि सर्वत्र पाणी कमी होत चालले आहे.

आशू, कामवाली आणि ते सर्व लोक सुखरूप आहेत. इन फॅक्ट, दुसर्‍या दिवशी कामावर ती नेहमीप्रमाणेच आली. त्यांनी वस्तू सर्व गुंडाळून सुरक्षित्र ठिकाणी नेऊन ठेवल्यामुळे त्यांचे नुकसान फारसे झाले नाही असं ती म्हणाली. पण झोपड्या मात्र परत बांधाव्या लागणार आहेत.

बरेच दिवस टिकलेल्या तेथील भयानक परिस्थितीकडे इतर देशवासियांचे पुरेसे लक्ष गेले नाही ही त्यांनी बोलून दाखवलेली खंतही योग्य होती.

बापरे हे सर्व वाचून मन सुन्न झाले अगदी. पण नंदिनी तू खूप खूप धीराने आणि बुद्धीचा वापर करुन ह्या प्रसंगाला पुढे गेली. मी इथे तूनळीवर अनेक क्लिप्स पाहिल्यात आणि काय तो जलप्रवाह आणि साचलेले पाणी. तिथे एक प्राण्यांंना वाचवण्याची क्लिप आहे ती बघून डोळे पाणावले.

https://www.youtube.com/results?search_query=chennai+rain+today

इथे एके ठिकणी बस पाण्यात पुर्ण बुडून वर काही लोक आहेत.
https://www.youtube.com/watch?v=JjOSGpqiV3k

चहुकडे पाणीच पाणी:
https://www.youtube.com/watch?v=LyNvNKB9how

हे बोटीच दृश्य फारच मजेशीर वाटल :
https://www.youtube.com/watch?v=Lh_SnlG4JRE

ह्यात एक फार करुण दृश्य आहे. गाय थकून उपाशी राहून खाली कोलमडली आणि तिचे वासरु धावत तिच्या भेटीला आले..
https://www.youtube.com/watch?v=LyNvNKB9how

अशा परिस्थितीमधे खरेच कुठल्याही देशाला सामोरे जाणे अवघड आहे.

काल रात्रीपासून घरात परत पाणी चढले आहे. किमान दोन फूट तरी पाणी असावे. बेड आणि बेडमधल्या सर्व वस्तू भिजल्या आहेत. इतर सामानाचे काय नुकसान झाले असेल याची मला काहीच कल्प्ना नाहे.ए नवर्‍याच अफोन दुपारपासून लागत नाहीये. पाणी अजून कमी होत नाही आणि पाऊस कोसळतोच आहे.
प्रे फॉर चेन्नई.

तूम्ही सर्व सुखरुप आहात ना, मग झाले. सामानाची काळजी करू नका. सर्व चेन्नेवासीयांसाठी मनोमन प्रार्थना करतोच आहोत. लवकरच सर्व सुरळीत होईल.

Pages