Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04
'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी स्त्रीपात्र करणे हे फॅड
बाकी स्त्रीपात्र करणे हे फॅड झाल्य खरे तर. त्यात लपवायचे काय. उग्गाच काहीतरी. >>>> तो भंडारी स्त्रीलंपट आहे त्याला जर कळलं की हा पुरुष आहे तर तो त्याला हाकलुन देईल आधीसारखं म्हणुन लपवत असेल तो.
आणि स्त्रीपात्र हे थोडेफार नामवंत कलाकर करतात, याच अजुन कशात काही नाही. थोड स्वतःला सिद्ध करु दे मग सांगेल तो. (त्यासाठी अजुन ४ वर्षे वाट बघा)
मला नाही आवडत वैभव मांगले. या
मला नाही आवडत वैभव मांगले. या मधेही नाही आवडला. लक्ष्मी मस्त काम करते. फारच भोळी दाखवली आहे. वैभव खूपच मोठा वाटतो तिच्यापुढे.
मिळेल ते काम - पण अभिनयातलंच,
मिळेल ते काम - पण अभिनयातलंच, करायला तो तयार झालाय. भंडारी सारखा प्रोड्यूसर,.डायरेक्टर आणि हीरोईनचं काम मिळणार असेल तर बक्कळ पैसा हे ही गणित आहेच ना.>>
सासू आणि मेहुण्याच्या टीकेने दुखावलेला वैभव भंडारीकडे लाचार होऊन काम मागत असतो तेव्हा भंडारी वैतागून रिसेप्शनिस्टला त्याला स्क्रिप्ट द्यायला सांगतो आणि दुसर्या दिवशी तयारी करुन यायला सांगतो. भंडारीच्या ओरडण्याने घाबरून ती पण तिथलाच एक कागद न बघता वैभवला देते. ते नेमकं हिराॅइनचं स्क्रिप्ट असतं. वैभव घरी आल्यावर ते बघतो. आधी रडतो आणि नंतर आपलं नशीब म्हणून ती भूमिका करायला तयार होतो.
अनेक वर्ष दारुचा परीणाम आहे.
अनेक वर्ष दारुचा परीणाम आहे. >>>> माहित होत पण खात्री नव्हती म्हणुन लिहील नाही..
हायला हे म्हणजे रब ने बना दी
हायला हे म्हणजे रब ने बना दी जोडी सारखं दिसतंय थोडंसं.
वैभव बाई होणार, गाजणार. सगळे मागे लागणार. बायकोला पण तिचाच (बाईरूपी वैभवचाच) अभिनय आवडणार. सगळीकडे चर्चा होणार. बारूवै घरी भरपूर पैसे आणणार पण तु नक्की काय आणि कोणत्या सिरियल मध्ये काम करतो आहेस हे त्याला कुण्णी कुण्णी विचारणार नाही. अगदी खुद्द लक्ष्मी सुद्धा.
मग बारूवै ला बायकांचे सर्व प्रॉब्लेम्स कळणार आणि मग एक दिवशी अवॉर्ड फंक्शन मध्ये तो जाहिर करणार की तो वैभवी नसून वैभव आहे. यात किमान साडेसात वर्ष खर्ची पडणार.
या सर्व कालावधीत प्रेक्षक मुर्ख ठरणार.
अरे तो वैभव कोणत्या तरी अॅंगलने बाई दिसतो का? (सुंदर तर सोडाच) निदान कोणी तरी कोवळा आणि देखणा नायक (सचिन पिळगावकर सारखा (फक्त देखणा, कोवळा नव्हे ;)) बाई म्हणून शोभला असता शिवाय ओळखू येत नाही यावरही जरा विश्वास ठेवता आला असता.
बारूवै घरी भरपूर पैसे आणणार
बारूवै घरी भरपूर पैसे आणणार पण तु नक्की काय आणि कोणत्या सिरियल मध्ये काम करतो आहेस हे त्याला कुण्णी कुण्णी विचारणार नाही. अगदी खुद्द लक्ष्मी सुद्धा. >>>>> सेम पिंच दक्षे.. मी पण याच अर्थाची भली मोठ्ठी पोस्ट लिहिली आहे
येस दक्षे, वैभवची निवड
येस दक्षे, वैभवची निवड ह्यासाठी मलातरी योग्य वाटली नाही. तो बाईच्या वेषात वैभवंच वाटतो.
अरे वैभव पुरुष म्हणून
अरे वैभव पुरुष म्हणून गुडलुकिंग नाहीच दाखवायचा आहे म्हणून तर उत्तम अभिनय क्षमता असूनही त्याला काम मिळत नसतं. तो जर चांगला दिसत असता तर त्याला खूप काम मिळाले असते. मग सिरियलची स्टोरी अशी कशी दाखवता आली असती?
पण त्याला मेन हिरविण दाखवणार
पण त्याला मेन हिरविण दाखवणार आहेत. त्यात तो बाई मला तरी नाही वाटत.
हाईट आहे. पुरूष म्हणून गुड
हाईट आहे. पुरूष म्हणून गुड लुकिंग नसूनही स्त्री वेषात गेल्यावर त्याला उत्तम भुमिका कशी काय मिळू शकते? wherein सिरियलमध्ये एक्स्ट्रा गुड लुकिंग बायका लागतात. (अभिनय दुय्यम असतो तिथे) एखाद्या पुरूषाने मग तो कितीही देखणा असला तरिही स्त्री रूप धारण केल्यावर राकट आणि उभा आडवा दिसतोच. मग वैभव कुठून बरा दिसणार आहे? एक वेळ काही वर्षांपुर्वी उभा आडव्या हिरॉईनी होत्या. आजकाल त्यांच्या निम्म्या वजनाच्या आणि आकाराच्या सपाट पोटाच्या हिरॉईनी असतात.
अंजूताई, तो बाई वाटत नाही हे
अंजूताई, तो बाई वाटत नाही हे बरोबर आहे. पण तो आपल्या सिरीयल मधल्या सिरीयलमधे हिरवणीच काम करणार आहे. आपल्या सिरीयल मधे तो हिरोच आहे.
हुश्श......
१० वर्ष झाली दोघांच्या
१० वर्ष झाली दोघांच्या लग्नाला असं दाखवलयं...तो अजुन १५०० रुपये आणतो घरी... प्रचंड पेशन्स आहेत बाईच्यात (लक्ष्मी) ...
बघुया काय होतयं पुढे ...
स्निग्धा. द्क्षे करेक्ट मला
स्निग्धा.
द्क्षे करेक्ट मला हेच म्हणायचंय.
एक वेळ काही वर्षांपुर्वी उभा
एक वेळ काही वर्षांपुर्वी उभा आडव्या हिरॉईनी होत्या. आजकाल त्यांच्या निम्म्या वजनाच्या आणि आकाराच्या सपाट पोटाच्या हिरॉईनी असतात. >> फक्त हिरवणीच नाही तर तिची आई , सासू , मामी , काकी आणि व्हॅम्प सुद्धा .
ह्याने काम केलीली भुमिका
ह्याने काम केलीली भुमिका गाजणार, प्रेक्षक सुंदर नायिका म्हणून स्वीकारणार हे समहाऊ प्रोमोमधे दिसतोय तो त्यावरुन तरी पटत नाही. अर्थात लॉजिकचा विचार आपण करतो म्हणा.
मला वैभव मांगले आवडला होता तो
मला वैभव मांगले आवडला होता तो शेजारी शेजारी पक्के शेजारी मधे. म्हणजे वैभव नाही, त्याचे पात्र. पण तोच दिसल्यावर बघायला घेतली सिरियल, त्यातून नवी, म्हणजे पहिल्यापासून पाहिल्यावर कळेल पात्रांचा एकमेकांशी संबंध काय?
आता अजून एक दोनदा बघेन नि मग आपले श्री. गंगाधर टिपरे! ती सिरियल संपली की काय? मला आपली मराठी वर १६२ पर्यंतचेच भाग दिसताहेत.
नाहीतर आहेच जुने मराठी हिंदी सिनेमे. गाण्यांसाठी.
वर कुणि लिहीले आहे टूट्सि बद्दल, मलाहि तसेच वाटते, म्हणून जास्त दिवस बघवणार नाही.
बाकी दारू प्यायल्यामुळे जीभ जड होते हे बरेचदा ऐकले आहे. आता विचारतो माझ्या मोठ्या भावांना की माझी जीभ जड झाली आहे का. बाकी कांदापोहे यांनी असे लिहिले आहे की जणू स्वानुभवच! खरे पण असेल ते. कांदापोहे,
मला वाटले आ़जकालचे मराठी मला कळत नाही त्यातलेच हे एक.
बाकी तुम्ही लोक फारच हुषार हो, बारुवै!
सतत सगळ्या गोष्टींची लघुरूपे केल्याने होणारे घोटाळे यावर शंभर वर्षे चालेल अशी सिरियल करता येईल.
रमेश भाटकर सम्हाऊ नाही आवडते
रमेश भाटकर सम्हाऊ नाही आवडते यात. परवा जिंदगी धूप तुम घना छाया? असं म्हणत होता. घना साया आहे ना?
वैभव मांगले खरेच बाई आणि ती
वैभव मांगले खरेच बाई आणि ती देखील हिरोईनीची भुमिका करणारी सुंदर बाई वाटत नाही.
पण तरी आज त्याने हॉट मटेरीअल वाटायला रमेश भाटकरला गूडबाय करताना ओठांचे की हनुवटीचे चावट हावभाव केले
पण ठिक आहे, रमेश भाटकरला या वयात काहीही आवडू शकते या संशयाचा फायदा देऊ शकतो
बाकी रमेश भाटकर यात कधी ओवरअॅक्टींगने बोअर करतो तर कधी खूप उर्स्फुर्त आणि मजेशीर वाटतो.
काही असो, त्याची पर्सनॅलिटी नेहमीच भावते मला. डॅशिंग वाटतो
खरी स्त्री आणि स्त्रीचा वेष
खरी स्त्री आणि स्त्रीचा वेष घातलेला पुरुष यातला फरक न कळण्याइतके पुरुष मुर्ख असतात का?
वैभव मांगले "चालतो" म्हणुन काहीही [प्रेक्षकांच्या माथी मारायचे का? तो मला तरी "तृतीयपंथी" वाटला.
(हल्लीच्या काळातlला) स्त्री भुमिका कॅरी नीट केलेला फक्त एकमेव नट वासुची सासु मधले दिलीप प्रभावळकर,,,(बाकी सगळे लोक चालण्यात, बोलण्यात स्त्रीची टिंगल करत आहेत असेच वाटते, बनवा बनवी मधला सचिन was close पण त्यानेही त्यात हाताची हालचाल इ. टिपिकल करुन गडबड केली)
लक्षात ठेवा तुम्ही पाहता आणि यांना टी आर पी मिळते म्हणुन असले गार्बेज तुमच्या माथी मारले जाते.
Seinfeld च्या रीरन्स पहा. कुठलाही मेकप, हावभाव, माकडचाळे इ. न करता प्रसंगनिष्ठ विनोद कसा करता येतो हे समजते.
कांदापोहे यांनी असे लिहिले
कांदापोहे यांनी असे लिहिले आहे की जणू स्वानुभवच! खरे पण असेल ते. कांदापोहे>> झक्की
मनस्मी, संपुर्ण पोस्टशी सहमत.
मनस्मी, संपुर्ण पोस्टशी सहमत. खूपच पटली.
मनस्मी अगदी बरोबर. छान
मनस्मी अगदी बरोबर. छान पोस्ट.
मी झीच्या पोस्टवर पण लिहिलं की वैभव बाई म्हणून दिसतंच नाही, त्यामुळे बघणार नाही. त्याला लोक त्या वेषात स्वीकारणार आणि ओळखणार नाही हेच पचनी पडत नाहीये माझ्या.
हुमदांडगी बाई,तिला पाहून सगळे
हुमदांडगी बाई,तिला पाहून सगळे खल्लास होतात.हे वैतागवाणे आहे.मी रविवारी एकदाच या सिरियलचे भाग पाहिले आणि वरच्या निष्कर्षावर आले.
हुमदांडगी बाई,तिला पाहून सगळे
हुमदांडगी बाई,तिला पाहून सगळे खल्लास होतात.हे वैतागवाणे आहे.>> +१
पण कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही.. अगदी माझी सासू म्हणते "किती छान दिसतो ना तो."
लावण्यखणी वैभव वर लोक एवढे
लावण्यखणी वैभव वर लोक एवढे पाघळले आहेत की दिवसाला १०००० देणार आहेत. या रेटने त्या भंडारीला अनेक दांडग्या बायका मिळतील. १००००*३० म्हणजे ३ लाख झाले. लाखात माझे भारतात भागेल का असा विचार करणार्यांनी या क्षेत्रात जावे.
सिरीयसली, वैभव अजिबात बाई
सिरीयसली, वैभव अजिबात बाई वाटत नाही आणि सुंदर हीरोईन तर अजिबात नाही. तो कितीही नाजूक हालचाली, डोळ्यांचे ओठांचे विभ्रम करून समोरच्या पुरूषाला घायाळ करण्याचे प्रयत्न करत असला तरी मूळची पुरषी दांडगट ठेवण तर तशीच दिसते.
सहमत...रोल साठी बारीक होणे
सहमत...रोल साठी बारीक होणे वैगरे गोष्टी मराठी कलाकारांना पटतच नाहीत.
पण मध्यंतरी अस ऐकल की त्याने
पण मध्यंतरी अस ऐकल की त्याने केलय वजन कमी या रोलसाठी. अर्थात मलाही दिसल नाही कुठे आणि मुळात तो जाड या कॅटेगरीत कधी नव्हताच त्यामुळे तो जसा आहे तसाच घेतलाय त्याला या मालिकेत.
ह्याच्या महाएपिसोडमधे काय
ह्याच्या महाएपिसोडमधे काय झाले?
प्रेस कॉन्फरन्स. जिथे फक्त
प्रेस कॉन्फरन्स. जिथे फक्त रमेश भाटकरच बोलत होता.. घरमालक घर रिकाम करायला सांगुन गेले, तीन महिन्याची मुदत देउन. यानंतर एकदा लक्ष्मी आणि तिची मैत्रीण तोंड पाडुन बसलेल्या घराचा सीन आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये अवघडलेल्या वैभवचा सीन १ तासापैकी ५० ते ५५ मिनिट हेच. शेवटच्या पाच मिनिटात मंजुषा गोडसे येउन जाहिरातीत दाखवलेली वाक्य म्हणते आणि महाएपिसोड समाप्त.
Pages