क्लॅम लिंग्विनी पास्ता

Submitted by रायगड on 14 October, 2015 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. क्लॅम्स (तिसर्‍या ) शिजवून अथवा शिजवलेले तयार मिळाल्यास (मी हे वापरलेत) , कॅन्डही मिळतात - ते वापरूनही करता येईल बहुदा. मी कधीही वापरलेले नाहीत त्यामुळे कल्पना नाही. तिसर्‍या शिजवून घेतल्यास आवडीनुसार शेलसहीत, एका बाजूचे शेल काढून किंवा दोन्ही शेल्स काढून वापरू शकता.
२. लिंग्विनी पास्त्याचे एक पाकिट
३. कुकिंग वाईन - १ कप
४. चिकन ब्रॉथ - १ कप
५. बटर - २ टे. स्पून (लाईटर व्हर्जन करीता - २ टे. स्पून ऑ.ऑ. वापरू शकता)
६. अल्फ्रेडो सॉस - २ टे. स्पून
७. मीरे पावडर (फ्रेशली ग्राऊंड) - १ टी स्पून
८. पार्सले - बारीक कापून
९ . लसूण - ३-४ पाकळ्या - बारीक कापून
१०. रेड चिली फ्लेक्स - १ टी. स्पून
११. मीठ
१२. वरून हवे असल्यास ग्रेटेड पार्मेजाँ चीज

क्रमवार पाककृती: 

पास्ता पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार शिजवून घ्या.

मोठ्या आडव्या भांड्यात बटर वितळवून अथवा तेल तापवून त्यात बारीक चिरलेला लसूण घालून थोडा ब्राऊन होऊ द्यावा.

मग त्यावर कुकिंग वाईन घालून गॅस मोठा करून सुमारे ३ - ४ मिनीटे उकळवून घ्यावी. ह्यामुळे वाईनमधील अल्कोहोल बर्‍याच प्रमाणात निघून जाते. (पूर्णपणे जात नाही)

त्यात चिकन ब्रॉथ टाकून उकळी आणावी. व मग अल्फ्रेडो सॉस घालावा.

आता त्यात शिजलेल्या क्लॅम्स घालावे व मीरेपूड, चिली फ्लेक्स, मीठ घालावे.

IMG_1139_0.JPG
हे शिजवलेल्या रेडीमेड क्लॅम्सचे पाकिट.

एक उकळी आल्यावर शिजलेला पास्ता घालावा. नीट परतून घ्यावा. कापलेली पार्सले घालावी. पास्ता तयार.
IMG_1138.JPG

डीश मध्ये काढून घेतल्यावर वरून हवे असल्यास ग्रेटेड चीज टाकू शकता.

ClamLinguinePasta.jpg

वाढणी/प्रमाण: 
खा हो! संपेपर्यंत!!
माहितीचा स्रोत: 
फूड नेटवर्क
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Cento चे कॅन्ड क्लॅम अन चिकन स्टॉक ऐवजी क्लॅम जूस वापरुनही मस्त होते ही डिश. मी आल्फ्रेडो सॉस घालून कधी केलं नाहीये.

पुढच्या वेळेस घालून पाहीन

व्हय! व्हय! हाच तो...! तेव्हा मेला लगेच गिळलात...जर्रा फोटो काढेस्तोवर धीर धरवेना तुम्हाला...परवा आजू-बाजूला कोणी नसताना बनवला आणि फोटो काढला... Lol