Submitted by मंजूताई on 5 October, 2015 - 02:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
- हिरवे टमाटे पाव किलो
- डाळव दोन टेबल स्पून
- तीळ दोन टेबल स्पून
- जिरे एक टेबल स्पून
-हिरव्या मिस्पून, मीठ, गूळ, कोथिंबीर, कढीपत्ता चवीप्रमाणे
फोडणीच साहित्य
क्रमवार पाककृती:
टमाटे धुवून फोडी करुन घ्या. एका कढईत जिरे,तीळ व डाळवं भाजून काढून घ्या. त्याच कढीत अर्धा चमचा तेल घालून फोडी, हिरव्या मिरच्या टाका. झाकण ठेवून फोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या त्यात चिरून कोथिंबीर घाला. मिश्रण गार होऊ द्या. सगळे जिन्नस एकत्र करुन चटणी वाटा. वरुन खमंग हिंगाची फोडणी घाला.



वाढणी/प्रमाण:
आवडीप्रमाणे
अधिक टिपा:
ज्वारी, बाजरीच्या भाकरी बरोबर चांगली लागते. ब्रेडला लावून छान लागते.
ह्या चटणीत लसूणही छान लागतो मग गूळ घालायचा नाही
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा मंजुताई मस्त
अरे व्वा मंजुताई मस्त रेसीपी...
पण फोटो दिसत नाही आहेत...
(No subject)
छान चटणी, हिरवे टोमॅटो मिळाले
छान चटणी, हिरवे टोमॅटो मिळाले तर हमखास करतो मी.
मस्त वाटतेय रेसिपी . अजून
मस्त वाटतेय रेसिपी .
अजून १०-१५ दिवसात बागेतले सर्व टॉमेटो काढावे लागतील. हिरवे टॉमेटो इतके निघतील की हापिसात आणून वाटावे लागतात. या रेस्पीने थोडी चटणी करुन ठेवता येईल
वाह, मस्तं पाककृती.
वाह, मस्तं पाककृती.
अरे वा .. छान सोपी रेसिपी आहे
अरे वा .. छान सोपी रेसिपी आहे ..
आणि डाळवं म्हणजे डाळं की कच्ची चणा डाळ ते ही प्लीज सांगाल का?
छान चटणी.
छान चटणी.
डाळवं म्हणजे डाळं >>> +१ पातळ
डाळवं म्हणजे डाळं >>> +१ पातळ पोह्यांच्या चिवड्यात वापरतो ते
मस्तं वाटतेय. अश्या
मस्तं वाटतेय.
अश्या पद्धतीनेही करून बघेन एकदा.
वा खमंगपणा जाणवला.
वा खमंगपणा जाणवला.
मस्तं वाटतेय करुन बघेन.
मस्तं वाटतेय करुन बघेन. हि.टो. ची भाजी लेकीच्या आवडत्या भाज्यांपैकी एक, तिला चटणीही आवडेलच त्यामुळे
माझ्या साबा पण करतात पण
माझ्या साबा पण करतात पण रेसिपी थोडी वेगळी आहे. घटक पदार्थ बरेचसे सारखे. फक्त डाळं नाही, आणि सुकं खोबरं वापरतात. प्रथम थोड्या तेलात जीरे, तीळ, खोबरं, हिरवी मिरची (ह्याच क्रमाने) तळून घेणे. मग उर्वरित तेलात (साधारण १ छोटा चमचा तेल सुद्धा पुरतं) हि.टो. परतून घेणे. आणि गार झाल्यावर तळलेले सर्व पदार्थ+कोथिंबीर+थोडा लसूण +मीठ+ साखर घालून मिक्सर मधून काढून घेणे. आणि हि चटणी केली कि फाफडा (पापडी) पाहिजेच!
सध्या हिरवे टोमॅटो बाजारात
सध्या हिरवे टोमॅटो बाजारात भरपुर दिसत आहेत. आम्ही फक्त भाजी करायचो आतापर्यन्त.
आज आणतेच, चटणीसाठी.
या रेसिपीनं चटणी केली. मस्त
या रेसिपीनं चटणी केली. मस्त झाली आहे.
मस्त वाटतेय.
मस्त वाटतेय.