मुळ क्रुती प्रमाणेच .
बदललेले घट्क ---३ कप गाजराचा कीस -- खजुर
१ कप चणा डाळ -- शेंगदाणॅ
प्रथम पॅनमधे १ चमचा तुप , बारीक केलेले खोबरे , व साखर घालुन गॅसवर पाकावर येइपर्यंत गरम केले . नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट [ शेंगदाणे भाजून त्याचे सर्व साल काढ्लेत व मिक्सरवर बारीक केले .]
घालून गोळा तयार केला [ . विलायची व थोडे केशर घातले स्वादाला.]
खजूर तुपावर गरम केले व मिक्सरवर बारीक करुन त्यात थोडी साखर घालून गोळा बनवला
दोन्ही गोळ्यांचे २-२ भाग केलेत . व प्लॅस्टिकच्या कागदावर त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या .
आता प्रथम खजुराची पोळी प्लॅस्टिक कागदावर घेऊन त्यावर शेंगदाण्याची पोळी ठेवली व प्लॅस्टिकच्या
सहाय्याने रोल बनवला.
नंतर शेंगदाण्याची पोळी खाली व खजूराची वर ठेवून रोल बनवला.
काही वेळ फ्रीजमधे ठेवले व त्याचे सारखे तुकडे केलेत. रोल तयार.
चव छान आहे . उपवासालाही चालेल. फोटो टाकते .