गणेशोत्सव २०१५ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 21:16

maayaboli Ganesh 2015.jpgगणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

नमस्कार,

मायबोली गणेश उत्सवाचे हे सोळावे वर्ष! गणेशोत्सव २०१५ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरवे निळे डोंगर मस्त आहेत.
उजवीकडे २०१३चा दुवा आहे अजून. तो दुरुस्त होत नाही का?

नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः| नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः।|
विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे | भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक॥
मंगलमूर्ती मोरया !! बाप्पा सुरेखच...!

मोरया! Happy

1111.pdf (122.12 KB)
माघ चतुर्थी महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सांगतेचा दिवस
भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या आजच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.
'विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. हे यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली 'सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।... संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता. १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. 'याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, 'समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥' हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते. ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे 'दास रामाचा वाट पाहे सदना।' यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला. यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.

गजाननम् भूतगणाधि सेविततम्
कपित्थजंबू फलसार भक्षितम् |
उमासूतम् शोकविनाशकारणम्
नमामी विघ्नेश्वर पादपंकजम् ||

Pages