असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
स्मित
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. डोळा मारा इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला लाइक करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
अरे कुठे गेले सगळे
अरे कुठे गेले सगळे चारोळीकार?
आत्ता तर फक्त अर्धशतक झालय!
Bee mast Swati ambole, bharat
Bee mast
Swati ambole, bharat Dada,surya Kiran : I m eager to read ur posts
एक गाव दिसेल निळ्या तंद्रीत
एक गाव दिसेल निळ्या तंद्रीत
पत्ता ठेवशील ना तू लक्षात,
विचारशील खुळ्या होडयांना
त्याही बुडल्यात दिवास्वप्नात
अलगद तोलुन धरतोस रोज, तुझ्या
अलगद तोलुन धरतोस रोज,
तुझ्या प्रेमाने होते मी ओलीचिंब |
हळूहळू हिंदकळत पाहाते,
तुझ्यातल आकशाच प्रतिबिंब ||
घर सागर नौका
घर सागर
नौका पाणी
आणि
गर्लफ्रेंड
घननिळा अवतरला या सागरी निळाई
घननिळा अवतरला या सागरी
निळाई लेऊन नौका सल्लज किनारी
दाटे नितळ निळी व्याकुळता उरी
जाग नाही तीरावरल्या एकाही कौलारू घरी
वृथा तुझा अभिमान गं नौके; सोड
वृथा तुझा अभिमान गं नौके;
सोड तुझा अभिमान
जाशील जरी तू क्षितिजापार;
बंध तुझे या सदना-द्वार
...
.. कै च्या कैच नाही ?
घरकुल चिरेबंदी, निळाई ही
घरकुल चिरेबंदी,
निळाई ही शांत,
किनाऱ्यावर विसावून,
नौकाही निवांत.
किनारा हवा, एक घरटे हवे, वाट
किनारा हवा, एक घरटे हवे, वाट न्याहाळणारे हवे दारही
हवी जागती ज्योतही पायरीशी, हवासा क्षमाशील अंधारही
मनाला असे रोज समजावतो नाव बांधून घेता किनार्यास मी
सकाळी चमकते निळाईत सोने, पुन्हा लोटतो नाव पाण्यात मी!
काय सुंदर विचार आहेत
काय सुंदर विचार आहेत स्वातीताई! सकाळ एकदम प्रसन्न केलीत!
बी, भुईकमळ एकसे बढकर एक!
स्वाती...ताई?? आशूडी, ये क्या
स्वाती...ताई?? आशूडी, ये क्या हो रहा है?!
बुरखा कुठलाय ते बघायचं
बुरखा कुठलाय ते बघायचं विसरले!
पाण्याचे बदलते रंग घराला
पाण्याचे बदलते रंग
घराला कौलारू अंग..
पाण्याचा आगळाच ढंग
अन् शिडाला जहाजाचा संग..
निळ्यानिळ्या सागरी नौका घालती
निळ्यानिळ्या सागरी
नौका घालती गस्त
प्रदुषण हे अस्ताव्यस्त
म्हावरं झालंय फस्त
शांत निळाई सागराची लालिमा
शांत निळाई सागराची
लालिमा कौलारू घरांचा
शांत पहुड्ल्या नौका
आधार किनार्याचा
Ahaha Sagalech mast
Ahaha
Sagalech mast
माझ्या ओलेत्या शिडाला खार्या
माझ्या ओलेत्या शिडाला
खार्या कौलांची ये साद
कसा किनारा सुटेना
जरी सागराचा नाद
सगळ्यांच्याच चारोळ्या मस्त
सगळ्यांच्याच चारोळ्या मस्त आहेत
स्वाती, कमाल.... केवळ कमाल!
सकाळी चमकते निळाईत सोने, पुन्हा लोटतो नाव पाण्यात मी!........ किती वास्तव आणि किती अर्थपूर्ण वर्णन आहे हे!
बीच्या प्रत्येक चारोळीवर एक
बीच्या प्रत्येक चारोळीवर एक स्वतंत्र धागा काढता येईल....
Pages