गरज विवेकी धर्मजागराची
[दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]
(नरेंद्र दाभोलकर)
धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.
आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्वराची आज्ञा म्हणून ईश्वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.
आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.
आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.
न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.
- नरेंद्र दाभोलकर
सेक्युलर शब्द काढता येणार
सेक्युलर शब्द काढता येणार नाही कारण न्यायालयाने तो बेसिक स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट केला आहे. >>> ओके आले लक्षात. थॅन्क्स रॉहू.
ढांचा ( किती स्ट्रॅटेजिक शब्द >>>
वास्तविक घटनेचे स्वरूप
वास्तविक घटनेचे स्वरूप आर्टिकल २५ (धार्मिक स्वातंत्र्य) अनुसार पहिल्यापासून सेक्युलर होतेच. नानी पालखीवाला म्हणतात की प्रिअॅम्बल हे कॉन्स्टित्यूशनचे आयडेंटिटी कार्ड आहे. 'मल्ल' प्रत्येक पिढीत असतात. ह्या 'मल्लां' चे म्हणणे असते की सेक्युलॅरिझमचा थेट उल्लेख कोणत्याच कलमात नाही. सबब हे धोरण अधिक व्हिजिबल करण्यासाठी व तसा थेट मेसेज देण्यासाठी बहुधा ही ४२ वी अमेन्डमेन्ट आली असावी अर्थात त्यानन्तरही ४०-४५ वर्षांनन्तर काही मल्लांना तो प्रश्न पडतो हा भाग वेगळा....
आणि ह्या मल्लांचे 'साहेब' तर सूर्य उजाडल्यावर कोम्बडेच काय पण तो उगवलाच नाही हे दाखवण्यासाठी सूर्य देखील झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात.... हे त्याचे उदाहरण...
http://www.firstpost.com/india/republic-day-blunder-modi-govt-ad-omits-s...
येथे मुतू नका असा बोर्ड नसला
येथे मुतू नका असा बोर्ड नसला की लोकाना ती मुतण्याची हक्काची जागा वाटते..
त्यामुळे खबरदारी म्हणुन बोर्ड लावायचा उपद्व्याप करावा लागतो.
लबाड कोल्हया, तू घे मग तुझ्या
लबाड कोल्हया, तू घे मग तुझ्या गळ्यात बोर्ड टांगून. लोकं करायचं ते करतील.
आ.न.,
-गा.पै.
रॉबीनहूड, १. >> मुळात बेसिक
रॉबीनहूड,
१.
>> मुळात बेसिक स्त्रक्चरचा कन्सेप्ट मुळी न्यायालयाने आणला आहे. त्यामुळे तो जजमेन्ट्स्मधूनच स्थिर होत
>> चालला आहे.
मूळ ढाच्याची कल्पना न्यायालयाने आणली कारण शासनाकडून नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत होता म्हणून. भारत एक प्रजासत्ताक राहायला हवं असेल तर नागरी स्वातंत्र्ये अबाधित राहिली पाहिजेत.
२.
>> सेक्युलर शब्द काढता येणार नाही कारण न्यायालयाने तो बेसिक स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट केला आहे.
हा सेक्युलर शब्द शासनाने नागरिकांशी कसे वागावे याच्याशी संबंधित आहे.
३.
>> ह्या 'मल्लां' चे म्हणणे असते की सेक्युलॅरिझमचा थेट उल्लेख कोणत्याच कलमात नाही. सबब हे धोरण
>> अधिक व्हिजिबल करण्यासाठी व तसा थेट मेसेज देण्यासाठी बहुधा ही ४२ वी अमेन्डमेन्ट आली असावी
सेक्युलर या शब्दाचा मनमानी अर्थ लावून हिंदूंची धर्मांतरं करायचा सपाटा लावण्यात आला आहे. तसेच याच सेक्युलर नावाखाली अल्पसंख्यांकांच्या नावाने भरघोस सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे सेक्युलर म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायचा हिंदूंना हक्क आहे. केवळ कुठलीतरी संकल्पना मूळ ढाच्यात आहे म्हणून ती अपरिवर्तनीय ठरंत नाही.
अर्थात, ४२ व्या दुरुस्तीत कुठल्या अर्थाने सेक्युलर शब्द घुसडला यावद्दल मतांतरे असू शकतात. पण तो हिंदूंचा प्रश्न नाही.
आ.न.,
-गा.पै.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ
सेक्युलर या शब्दाचा अर्थ इहवादी असा घ्यावा. बर्याचदा तो धर्मनिरपेक्ष वा सर्वध्रर्म समभाव असा घेतला जातो. राजीव सानेंचे गल्लत गफलत गहजब या पुस्तकात त्याचे विश्लेषण आहे. राजीव सानेंचा ब्लॊग ही आहे http://rajeevsane.blogspot.in/
मी गामाच्या मतांशी सहमत.
मी गामाच्या मतांशी सहमत.
मुळात समाजवादाच्या नावाखालील निधर्मी/साम्यवादाचा आग्रह होता, तोवर असले काही शब्द घुसडवायची गरज भासली नाही, पण नंतर मतांच्या बेगमीच्या ताकदीचा अंदाज येऊ लागल्यावर मूळचा समाजवादी निधर्मी/साम्यवाद अडचणीचा ठरू लागल्याने मग "सर्वधर्मसमभाव" आणावा लागला व त्याकरता "सेक्युलर" घुसडविण्यात आला असे माझे मत.
२००७ च्या वरील मूळ लेखासंदर्भाने परत कधीतरी वेळ मिळाल्यास नक्की!
प्रकाश घाटपांडे, >> सेक्युलर
प्रकाश घाटपांडे,
>> सेक्युलर या शब्दाचा अर्थ इहवादी असा घ्यावा.
राजीव सान्यांना इहवादी हा अर्थ का घ्यावासा वाटला हे माहीत नाही. त्याबद्दल वाचायला आवडेल.
थोडा इतिहास चाळला तर सेक्युलर हा शब्द ख्रिश्चन रिलीजस पार्श्वभूमीचा आहे : https://en.wikipedia.org/wiki/Secularity#Etymology_and_definitions
पूर्वी युरोपात जेव्हा लोकं सेक्युलर असा शब्द वापरायचे तेव्हा त्या विधानाचा संदर्भ आपोआप रोमन कॅथलिक बनत असे. मग आज या शब्दाला ओढूनताणून वेगळा अर्थ प्रदान करून भारताच्या घटनेत घुसवावाच कशाला? भारतीय तत्त्वदर्शनांत संज्ञावैपुल्य भरपूर आहे. रोमन कॅथलिक संदर्भाविना जीव जाऊ घातला नाहीये आजून तरी भारताचा.
आ.न.,
-गा.पै.
सर्वधर्मसमभाव अथवा
सर्वधर्मसमभाव अथवा धर्मनिरपेक्षता हे देशी शब्द का रोमन कॅथॉलिक आहेत ? संज्ञा वैपुल्यातच गवसलेले हैत.
रॉबीनहूड, मग धर्मनिरपेक्षता
रॉबीनहूड, मग धर्मनिरपेक्षता किंवा सर्वधर्मसमभाव यांना सेक्युलारिझम म्हणू नका. दुसरा शब्द योजा.
आ.न.,
-गा.पै.
हाच घोळ रॅशनल शब्दाचा अर्थ
हाच घोळ रॅशनल शब्दाचा अर्थ बुद्धीप्रामाण्यवाद, विवेकवाद कि चिकित्सावाद असा घ्यायचा याबाबत होतो. पुर्वी बुद्धीप्रामाण्यवाद घ्यायचे पण मग कुणाची बुद्धी प्रमाण मानायची? त्या पेक्षा विवेकवाद हा शब्द सर्वसमावेशक वा ऐसापैस व्याप्तीचा वाटतो. त्यामुळे अनेक माणसे जोडता येतात. अर्थात कट्टर वाद्यांना सश्रद्ध लोकांचा विवेक देखील मान्य नसतो. चालायचच.
आणि ह्या मल्लांचे 'साहेब' तर
आणि ह्या मल्लांचे 'साहेब' तर सूर्य उजाडल्यावर कोम्बडेच काय पण तो उगवलाच नाही हे दाखवण्यासाठी सूर्य देखील झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात.... हे त्याचे उदाहरण...
http://www.firstpost.com/india/republic-day-blunder-modi-govt-ad-omits-s...
ह्याबद्दल कोणी काहीच बोल्ले नाही? ::अओ:
हा लेख "त्यांना" वाचायला दिला
हा लेख "त्यांना" वाचायला दिला तर दाभोलकर हे देवा धर्माविरोधी नाही हे सहज लक्षात येईल याच लेखाच्या अनुषंगाने डॉ दाभोलकरांनी त्यावेळच्या वसंत व्याखानमालेत मांडणी केली होती. आम्हीच खरे धर्मश्रद्ध असा तो विषय होता. आज पुन्हा या लेखाची सार्वत्रिक गरज अधोरेखित होते
कमाल आहे, असा कोणाचा लेख
कमाल आहे, असा कोणाचा लेख जसाच्या तसा कसा काय देता येतो माबोवर ?

मागे मी एकदा एक लेख दिला होता तर मला तो काढायला लावला होता.
प्रकाशजी - हे जनरल दु:ख व्यक्त करणे आहे. तुमच्याबद्दल किंवा या लेखाबद्दल काहीच आक्षेप नाही.
Pages