- उपासाची भाजणी (मी ही भाजणी वापरली)
- दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे
- तीन ते चार टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
- दोन ते तीन (किंवा तिखटाच्या आवडीप्रमाणे) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- पाव लहान चमचा लाल तिखट
- चवीप्रमाणे मीठ
- बटाटे सोलून, धूवून किसून घ्यावे.
- यात मिरची, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, मीठ घालावं.
- यात आता हळूहळू भाजणी घालावी. बटाटा + कूट याच्या प्रमाणात पीठ घालावं. मग जरूर पडल्यास थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ तयार करावं.
- तव्यावर तेल किंवा आवडीप्रमाणे तूप घालून थालीपीठं लावावी.
- मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस झाली की गरमच मटकवावी.
- बरोबर टीव्ही वरच्या डेली सोप्स (कारेदु, होसुमीयाघ, नासौभ, पैठणी इ) + नारळाची चटणी, लिंबाचं गोड लोणचं, लोणी इ आवडीप्रमाणे घेता येईल.
फटू -
- मी शक्यतो याबरोबर काहीच घेत नाही, नुसतं खायलाच मस्त लागतं
मस्तच.. मी तयार करताना
मस्तच..
मी तयार करताना शिंगाड्याच पिठ वापरते
भाजणी ने करुन पाहते आता..
आजचा उपवास..सकाळी टा़़आयला हवी होती पाकृ योकु..
साबुदाण्याची उसळ खाऊन कंटाळा आलाय तसापन..असो.धन्यवाद पाकृ बद्दल
साबुदाण्याची उसळ खाऊन कंटाळा
साबुदाण्याची उसळ खाऊन कंटाळा आलाय तसापन>> त्याच पण थालिपिठ लावायच, साबुदाणा वड्याला भिजवतो तस आणी त्यापेक्षा किचित सैल पिठ भिजवायच आणी थालिपिठ लावायच मस्त लागतात.. पातळ लावले तर क्रिस्पी होतात, ..गरमच जास्त चान्गले लागतात.
योकु , मस्तच लागतात. आम्ही
योकु , मस्तच लागतात. आम्ही फक्त उकडलेले बटाटे वापरतो कच्चे नाही.
मस्तच. मी सेम टु सेम असेच
मस्तच. मी सेम टु सेम असेच करते फक्त लाल तिखट घालत नाही.
आम्हीही बटाटा उकडून घालतो.
आम्हीही बटाटा उकडून घालतो. बाकी सेम.
छान. बऱ्याचदा बटाटा उकडून
छान.
बऱ्याचदा बटाटा उकडून घेते, क्वचित किसून घेते. मी थोडे भिजवलेले साबुदाणेपण घालते कधी कधी. कोथिंबीर चालते आम्हाला उपासाला त्यामुळे ती पण घालते.
काल उपासाची केली पण साबुदाणा आणि कोथिंबीर न घालता.
आम्ही कधी कधी बटाटा न घालताच
आम्ही कधी कधी बटाटा न घालताच करतो आणि उपलब्धतेनुसार हिरव्या मिरच्या / कोथिंबीर / लाल तिखट (उपासासाठी केलेले) असे घालतो.
माझ्याकडे पण (बाईंनी दिली तर)
माझ्याकडे पण (बाईंनी दिली तर) केप्रचीच भाजणी असते. पण पीठ भिजवलं की कोरडं पडतं त्यामुळे सुरूवातीला जरा सैल भिजवावं लागतं.
अन्जू, भाजणीच्या थालिपीठात थोडेसे साबुदाणे घातलेले मला पण आवडतात
आम्ही पण कच्चा बटाटा आणि
आम्ही पण कच्चा बटाटा आणि भिजवलेला साबुदाणा असेल तर तो घालतो यात. किसलेली काकडी घालून पण छान होतात ही थालिपीठं.
सिंडरेला . छान होतात साबुदाणा
सिंडरेला :). छान होतात साबुदाणा घालून.
लाल भोपळा, सुरण पण घालते कधीतरी. पण जास्त करून बटाटा आणि साबुदाणा.
बिल्वा, आई करते काकडी घालून. रताळे मला नाही आवडत पण ते घालून पण करता येतं.
योकु थालीपीठाचा वरचा भाग थोडा
योकु थालीपीठाचा वरचा भाग थोडा मोडलेला दिसतोय. शबरीचं थालीपीठ दिसतंय जनू
आणि बाजुला किबोर्ड कशाला? तो तू बडवतोयस ते दिसतंय की इथेच. बरं तो ७ आणि ८ पुसून घे वाईच.
किबोर्ड? मला वाटलं रिमोट आहे
किबोर्ड? मला वाटलं रिमोट आहे तो
मस्त! मी बटाटा किसायचा कंटाळा
मस्त! मी बटाटा किसायचा कंटाळा आला तर बटाट्याचे पीठ वापरते, होल फुड्स मध्ये मिळते. थोडेसे ट्केस्चर बदलते..
टीना, साबुदाण्याची उसळ म्हणजे खिचडी ना? माझ्या सासरचे काही नातेवाईक विदर्भात आहेत, त्यांच्याकडून कळले.
बर्बर रिमोटच्या कीज. आमच्या
बर्बर रिमोटच्या कीज. आमच्या घरचा रिमोट माझ्याकडे कधी येत नाही गं त्यामुळे रिमोट पाहायची सवय गेली. की दिसल्या की फक्त कि-बोर्ड एवढंच पापी पेटला कळतं.
योकु छान रेसिपी. उ.भा.
योकु छान रेसिपी. उ.भा. मिळाली की ट्राय करेन. अन्जू त्यात भिजवलेला साबुदाणा घालायची आयडीया मस्त आहे.
वेका
मस्त. मी असंच करते पण हि.मि
मस्त. मी असंच करते पण हि.मि घालते. साबुदाण्याचं थालिपीठ कित्ती दिवसात केलं नाहीये. करावं आता या वीकेण्डला.. तशीही घरातली भा संपली आहे
वेका, नाही शबरीचं नाहीये
वेका, नाही शबरीचं नाहीये थालीपीठ. मीच केलंय म्हणून मुळात त्याचा आकार गोल गरगरीत नव्हता अन एकाचे दोन अर्धे करतांना ते विचित्रच मोडलं.
बाजूचा रिमोटच आहे टिव्ही + सेट-टॉप बॉक्स + साऊंड सिस्टीमचा; म्हणून कीबोर्ड एवढा वाटतोय बहुतेक
वेके, सगळ्यातल्याच चुका
वेके, सगळ्यातल्याच चुका काढायला कुठून शिकलियेस गं? मॅनेजर झालीस की काय?
आमच्याकडे सेम असच थालिपिठ बनतं, भाजणी मात्र केप्रचीच
मी ओले खोबरे १ मिरची असे
मी ओले खोबरे १ मिरची असे वाटून या मिश्रणात घालते. मस्त चव येते
लोण्याचा एक गोळा ठेवायचा होता
लोण्याचा एक गोळा ठेवायचा होता की.
अय्यो रिया चुका काढणेला
अय्यो रिया चुका काढणेला (आमच्या) आय टीत किवे म्हणतात किवे.
पण स्पिकिंग ऑफ डॅमेजरगिरी आमचे येथे सगळेच हे काम करतात
पण सगळ्यातल्या म्हंजे आणखी कुठल्या गो? विपुत सांग हवंच तर
बस्के , हो.
बस्के , हो.