Submitted by Adm on 30 August, 2015 - 20:34
वर्षातली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा युएस ओपन उद्यापासून पासून सुरु होते आहे.
त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
स्पर्धेची वेबसाईट :
http://www.usopen.org/index.htm
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ठीक-ठाक पेक्षा चांगली झाली.
ठीक-ठाक पेक्षा चांगली झाली. पेनेत्ताचा गेम आवडला, ३३ व्या वर्षात आहे ती पण. या दोघी बरीच वर्षे दुहेरीमध्ये खेळताहेत त्याहिशेबाने अशा उंचीवर असताना निवृत्तीचा निर्णयपण आवडला. बक्षिससमारंभात विन्चीपण खेळकर वागली.
गो फेडेक्स उद्यासाठी.
बकवास कुठे झाल्या सेमिज?
बकवास कुठे झाल्या सेमिज? चिलिच इन्ज्युर्ड होता पण जोकोनं जोरदार खेळ केला आणि दुसर्या मॅचमध्ये फेडररने पण.
आजची फायनल बघायची होती पण काही अपरिहार्य कारणांनी हुकली. उद्या हिंगिस-मिर्झा मॅच शक्य झाल्यास गाठणार आहे.
सेरेना हरल्यानंतर यु एस ओपनची तिकिटं रेकॉर्ड किमतीनं खाली उतरली म्हणे.
मिर्झा आणि हिंगीस ही पण
मिर्झा आणि हिंगीस ही पण स्पर्धा जिंकल्या....
भारी चालु आहे मॅच. फेडरर
भारी चालु आहे मॅच. फेडरर डिफायिंग हिज एज!
फेडररचा एकदम सर्व्ह अँड
फेडररचा एकदम सर्व्ह अँड व्हॉली प्लॅन दिसत होता आज. पण परतवला ज्योकोने.
प्रेसेंटेशन सेरेमनी किती बोर चालली होती! त्या अँकरला काय बोलावं सुचत नव्हतं आणि खेळडू काही वेळा भलतच उत्तर देत होते !
एनिवे, ज्योकोचे अभिनंदन.
आज मला फेडरर जिंकला असता तरी चाललं असतं खरतर.. (फ्यॅन्स सोकावतात पण मग.. इथे आणि फेसबुकावर.. ;))
मिर्झा आणि हिंगिसचेही अभिनंदन.
आजची फायनल मॅच एकदम भंगार
आजची फायनल मॅच एकदम भंगार झाली. ग्रँड स्लॅम फायनल शोभत नव्हती. दोघांनी मिळून केलेल्या अन फोर्सड एरर्स ९० च्या वर असतील, त्यातल्या ५५ फेडररच्या. वॉरविंका आणि सिलिच चा कचरा करणारे हेच का ते दोघे असा प्रश्न पडला होता.
जोको वाईट खेळला. १७ का १८ ब्रेक पॉईंट दिले. फेडरर त्याच्याहून वाईट खेळला. फक्त ४ का ५ कन्व्हर्ट केले.
नॉट गुड.
रोबर्टा विन्सी चा सेमी आणि फायनल नंतर असे दोन्ही इंटरव्हू मस्त होते. प्रामाणिक.
अधोगती सुरू झालेली आहे असे
अधोगती सुरू झालेली आहे असे म्हणावे का आता?

सलग तीन अपयश, चार-सहा महिन्यांतच प्र्गतीपुस्तकावर लाल शेरे पहायची वेळ येईल असे वाटले नव्हते.
चीटिंगबद्दल पण बोला की
चीटिंगबद्दल पण बोला की
अहो पण रुल्स अब्युज करून
अहो पण रुल्स अब्युज करून जिंकला असता तर ते जास्त वाईट असतं. एव्हढं करून हरलाच ना मग त्याला चिटींग कसं काय म्हणायचं?
बाकी काल ते कामेन्टेटर्स म्हणाले त्यात एकदम तथ्य होतं. स्टॅन द मॅन हा एकमेव वन मॅच डेन्जर असण्याबद्दल. पुरून उरला त्याचा स्टॅमिना, आधी निशीकोरी च्या विरुद्ध आणि मग ज्योको विरुद्ध.
अहो पण रुल्स अब्युज करून
अहो पण रुल्स अब्युज करून जिंकला असता तर ते जास्त वाईट असतं. एव्हढं करून हरलाच ना मग त्याला चिटींग कसं काय म्हणायचं? >> एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं, मग जिंकला तरी कानफाट्या तो कानफाट्याच.
स्विस चॉकलेटं काही सहजा सहजी पचेना झालीयेत, पचली तरी खऊटच चव ठेवून जातात. वय झालं म्हणायचं नी काय.
Pages