किनवा टिक्की/ कटलेट आणि सांबार

Submitted by सुलेखा on 27 August, 2015 - 14:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

किनवा टिक्की साठी चे साहित्य:--
१/२ कप किनवा
१/२ कप ओट्स
१ मोठे रताळे
स्वीट कॉर्न/कणीस दाणे,मटार दाणे,ब्रोकोली,कोबी,गाजर ,बीन्स,गवार,शिमला मिरची ह्यापैकी उपलब्ध असलेल्या भाज्या.साधारण सर्व मिळुन एक कपभर.
लसुण एक पाकळी बारीक चिरुन व एक इंच आले किसलेले
चवीप्रमाणे श्रीरिंचा सॉस किंवा तिखट
बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीपुरती,
मीठ चवीनुसार
२ चमचे तूप किंवा बटर.
आणि तूर डाळीचे तयार सांबार.

क्रमवार पाककृती: 

कृती:--
एका पॅन मध्ये एक कप पाणी उकळायला ठेवा.पाणी उकळायला लागले कि त्यात अर्धा कप किनवा घाला पॅन वर झाकण ठेवुन मध्यम आचेवर साधारण ५ मिनिटे किनोवा शिजवा.
दुसर्‍या पॅन मधे थोड्याशा पाण्यात मिश्र भाज्या अर्धवट शिजवुन घ्या.अगदी मेण होऊ द्यायच्या नाहीत.भाज्या सूप गाळणीत ओतुन त्यातले सर्व पाणी काढुन टाका.
प्रेशर कूकर मधे थोड्या पाण्यात एक रताळे, एक शीटी येईपर्यंत उकडुन घ्या.रताळ्याचे साल काढुन किसुन घ्या,
एका मोठ्या पॅन मध्ये किसलेले रताळे, भाज्या, आले-लसूण-हिरवी मिरची-सॉस /लाल तिखट ,चवीनुसार मीठ आणि शिजवलेला किनवा व ओट्स घालुन सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा.
गॅसवर तवा/पॅन तापायला ठेवा,एकत्रीत मिश्रणाच्या एकसारख्या आकाराच्या गोल टिक्की करा व तव्यावर अगदी थोड्या तूप /बटर/तेलावर खरपूस भाजा.
mmmmmm.jpg
तयार सांबार व टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.
IMG_20150827_050027.jpg
इथे मी सांबार असे केले.:-- मेथीदाणा-हिंग-मोहोरी-जिरे-कढीपत्ता -हळद ह्याचीफोडणी करुन त्यात शिजवलेली तूरडाळ घातली.मिक्सरमधे ओले खोबरे .एक मोठा टोमॅटो, एक पाकळी लसुण,थोडासा कांदा व थोडेसे पाणीअसे एकत्र वाटुन घेतले.हे वाटलेले मिश्रण उकळत्या तूर डाळीत घातले व सांबार मसाला[दुप्पट प्रमाणात] ,चवीनुसार मीठ घातले व छान उकळले.
इथे रताळे [तसेच भाज्या थोड्या पाण्यात] मायक्रोव्हेव भाजुन घेता येईल.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किनवा कटलेट मस्त वाटत आहे. ते सांबाराबरोबर कसे लागेल ते इमॅजिन नाही करता येत आहे पण.
पुन्हा कराल तेव्हा फोटो पण टाका!

दिनेशदा ,झंपी धन्यवाद .
मैत्रेयी किनवा कटलेट सांबार बरोबर छान लागते.पोटभरीचे होते.हे कटलेट इडलीसारखे एकसंध नसते.लगेच तुकडा पडतो.म्हणुन इडली वर सांबार घालुन खातो तसे न खाता चमच्यात येईल तितके कटलेट सांबारात बुडवुन खाता येते
फोटो संध्याकाळ पर्यंत टाकते.,

छान आहे. वेगळा प्रकार.

किन्वा पदार्थ इथे मिळतो का? मुंबईच्या आसपास. मी कधीच बघितला नाहीये हा प्रकार. इथेच वाचलंय.

जबरी. वाचूनच भूक लागली. बाकी यात २ चमचे तेल म्हणजे हे सगळे बर्‍यापैकी हेल्दी असेल ना? Happy (सांबार सोडून धरा पाहिजे तर)

सांबार सोडले तर टेबलक्लॉथ, खुर्ची, सोफा इत्यादी बैठक व्यवस्था खराब होईल. आणि पुन्हा ते धरण्याच्या नादात स्वतः घातलेल्या कपड्यानही सांगावे लागेल की सर्फ एक्सेल है ना!!

रच्याकने, सांबारही पौष्टिक वर्गातच मोडते बरं का. हवंतर बोगातु घाला म्हणजे मनालाही पौष्टिकता लाभेल.

सुलेखा, फोटो पाहिजे.

किनवा, कधीच नै खाल्ल याच कै बनवून..
कराव का ? हरकत नै.. बाकी कटलेट बाइंडींग साठी रताळ आणि सांबार ची कृती आवडली Happy

सुलेखा,

तुम्ही अमेरिकेत राहता का? मग तुम्हाला नक्कीच किन्वा परवडत असेल.

मी भारतात रहात असल्याने गरीब आहे. त्यामुळेच, भारतात किन्वा महाग मिळतो म्हणून तो वापरू नये असा सल्ला मला एके ठिकाणी दिला गेला होता. तेव्हा किन्वा ऐवजी वरीच्या तांदुळाचे कटलेट केलेत तर चालतील हे तुम्ही सांगितलेत ते बरे केलेत. तुम्हाला खूपखूप धन्यवाद!

दीड मायबोलिकर, किन्वा ऐवजी तुम्ही तयार भात [हातसडीचा किंवा रोजच्या वापरातला तांदुळ ]किंवा दलिया, मका पिठ वापरु शकता. पिठ वापरले तर त्यात हि.मिरची आले पेस्ट घालुन गरम पाण्याचा शिबका देवुन मुटका वळेल इतपत घट्ट भिजवावे.बाकी साहित्य व कृती वरील प्रमाणे करावी.
पर्याय उपलब्ध आहेत .असे कटलेट तितकेच पौष्टीक आहे,

सायो ,अगदी खरे,बिनातेलाचे /तेलाची फोडणी न घालता केलेले सांबार मी नेहमी करते.कढीपत्ता, सांबार मसाला व टोमॅटो,खोबरे घालुन छान उकळले कि जाणवत ही नाही.