चंपाकळी

Submitted by प्रभा on 10 August, 2015 - 11:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मैदा २ वाट्या, तेल पाव वाटी [मोहनासाठी ], चिमुटभर मीठ, तळण्यासाठी तुप, साखर ३ वाट्या. [पाकासाठी ]

क्रमवार पाककृती: 

मैद्यात मीठ व मोहन घालून घट्ट भिजवुन ठेवावा. २-३ तासाने चांगला मळून गोळा मऊ करुन घ्यावा. नंतर छोटी गोळी घेऊन पुरी पेक्षा थोडी पातळ अशी पापडी लाटुन घ्यावी. नंतर त्या पापडीवर कडेला तुटणार नाही अशा बेताने सुरीने उभ्या चिरा द्याव्यात्.व पापडी चिरांच्या दिशेने गुंडाळून तिच्या दोन्ही बाजुची टोके दोन्ही हाताच्या चिमटीत धरुन उलट- सुलट पीळ देऊन कळीचा आकार द्यावा. अशा रितीने सर्व पापड्या [कळ्या ] तयार करुन तळून [तांबुस] घ्याव्यात. नंतर साखरेचा दोन तारी पाक करून गरम असतांनाच त्यात सर्व चंपाकळ्या बुडवुन काढाव्यात..

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

मी आताच नातवाच्या मुंजीत केल्या..फोटो टाकतेच. सप्तरंगी करंज्याही केल्या होत्या. तो पण फोटो टाकते.

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे पाकातल्या पुर्‍यांच्या बहिणी असाव्यात चवीला.
फोटो टाका नक्की म्हणजे आकार कसा ते आम्हाला कळेल. Happy

तुमच्या नातवाला शुभेच्छा! आजी हौशी आहे. Happy

रुचिरात चंपाकळी आणि कमळफूल ह्यांचे फोटो लहानपणी फार आशाळभूतपणे काढून पाहायचे ते आठवले >>>>>>> + १००००००००० Happy

मस्तयत .

प्रभाकाकू, फोटो छान आहेत. माझा आवडता पदार्थ. Happy
आम्ही पीठ थोड घट्ट मळतो आणि २-३ तास भिजवून नाही ठेवत. पीठ मळून लगेच करायला घेतो. पुरीला टोकाला थोड सोडून चिरा देतो. चिरांच्या दिशेने गुंडाळून तिच्या दोन्ही बाजुची टोके दोन्ही हाताच्या चिमटीत धरुन एकाच दिशेने रोल करतो. रोल करताना दोन्ही टोक दाबून घेतो. साखरेच्या पाकात वेलची पावडर घालतो.

शिल्पाराममला मायबोलीकरांच पहिल गटग झाल होत तेव्हा मी चंपाकळी बनवून नेल्या होत्या पण सगळ्याजणांना चंपाकळी माहित नव्हती. पण आवडली होती.

हा माझा झब्बू. Happy

P15-02-12_14.27[1].jpg

हे असले पोकळ गोल/ अंडगोल लोक यंत्राशिवाय कसे बनवू शकतात हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहे.

हे करू शकणार्‍या सुग्रण लोकांसाठी ए.जो.टा.झा.पा.

हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहे. <<<< माधव, हे खूप सोप्प आहे आणि टेस्टीसुद्धा.
ए.जो.टा.झा.पा. <<<<< म्हणजे?
सृ, धन्स Happy

हे असले पोकळ गोल/ अंडगोल लोक यंत्राशिवाय कसे बनवू शकतात Uhoh हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहे.>>> अनुमोदन

.

बाकी सब झुट!!! अरे कसले रसिक नाव आहे राव मिठाई चे ह्या!!! ३ वाट्या साखर रेसिपी मधे आहे अन चौथी वाटी साखर म्हणजे ह्या गोडाचे नाव!!! वाह!!!!

"चंपाकळी"
उत्तर बिहारमधे तराई च्या भारतीय बाजुला एक मिठाई मिळते तिचे नाव पण असलेच भारी "चंद्रकला" खस्त्यासारखी कड़क कुरकुरीत तळलेली पापड़ी मैद्याची ती पाकात बुडवतात अन सर्व करताना त्याच्यावर डबल चीनी वाली लच्छा रबड़ी पसरुन देतात अर्धीवाटी!! अप्रतिम चव असते!!

मस्त पा. कृ..
आरती झब्बु खुपच मस्त.:)

रुचिरात चंपाकळी आणि कमळफूल ह्यांचे फोटो लहानपणी फार आशाळभूतपणे काढून पाहायचे ते आठवले >>>>>>> + १००००००००० स्मित अगदी अगदी...

धन्यवाद देते सर्व मायबोलीकरांना ..अगो, स्वाती, आरती धन्यवाद. आरती तुझे पण फोटो छान आहेत. हाही आकार चांगला वाटतो.आता असेही करुन पाहिन .

अगो Happy मलाही तेच आठवल. रुचिरातले ते पिंक कलरचे लोडाचे चिरोटे आठवतात का ?
आमच्याकडे तर ७०च व्हर्जन आहे रुचिराच. नंतरच्या व्हर्जन मध्ये फोटो जरा जास्त ग्लॉसी होते.

छान दिसताहेत प्रभा चंपाकळी. कौशल्याच काम आहे . पण एकदा ना एकदा करून पाहणार.

हे असले पोकळ गोल/ अंडगोल लोक यंत्राशिवाय कसे बनवू शकतात >>> मलाही पहिला असेच वाटले होते, मग कृती काळजीपूर्वक वाचली आणि सोपे आहे हे समजले, किंबहुना असेही समजायला हवे होते, दिवाळीत कंदिल बनवायचा बराच अनुभव गाठीशी आहे माझ्या..

पाकृचे नाव बाकी पदार्थासारखेच .. मस्त Happy