
सारण :
1. ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
२. १ बारीक चिरलेला कांदा
३. २ चमचे लाल मिरची पाऊडर किंवा ३-४ हिरव्या मिरच्या
४. २ चमचे धणेपूड
५. मीठ चवीनुसार
६.१ चमचा कसूरी मेथी
७. १ चमचा ओवा
८. ३ चमचे कोथिंबीर
पारीसाठी:
पानी,तेल/ तूप घालून मीठाशिवाय भिजवलेली कणिक .
१. उकडलेले बटाटे सोलून हातानेच कुस्ककरून घ्यावेत.
२. सारण ह्या शीर्षकाखाली असलेले सर्व साहित्य बटाट्यात मिसळून मिश्रण एकजीव करावे. मी शक्यतो बटाटे जास्त कुस्करत नाही. पुरणासारखे एकजीव केलेल्या सारणामुळे पराठा पीठूळ लागतो.
३. कणकेची अत्यंत छोटा तुकडा घेवून त्यास पोळी लाटतो त्या प्रमाणे पातळ लाटावे.
४. पोळीच्या मधोमध कणकेचा तुकडा घेतला त्याच्या दीडपट आकाराचा सारणाचा गोळा ठेवावा.
५. सगळ्या बाजूने पारी बंद करावी.
६. ज्या बाजूने पारी बंद केली ती बाजू पोळपाटावर येईल असे बघून पुन्हा पारी जितकी बारीक लाटता येईल तितकी लाटावी.
७. तवा व्यवस्थित तापल्यावरच पराठा तव्यावर टाकावा. तव्याचे अचूक तापमान साधण्यासाठी आमच्याकडे त्याच तव्यावर आधी २-३ फुलके/ पोळी करण्याची पद्धत आहे.
८. एका बाजूने पराठा थोडाफार शेकला की लगेच उलटावा. शेकलेल्या बाजूला चमच्याने तूप लावावे. तूप सगळीकडे नीट पसरले जाईल याची काळजी घ्यावी.
९. तूप नीट पसरले गेले की पुन्हा एकदा पराठा उलटावा व दुसर्या बाजूला नीट तूप लावावे.
१०. पराठा मध्यम आचेवर खमंग भाजला जातो.
१. एक पराठा साधारण २-३ चमचे तूप पितो
२. घरचे लोणी/ लोणचे/ पुदिना चटणी/ दही यापैकी एक गोष्ट सोबत हवीच.
३. कुठल्याही परठ्याचे सारण ओले असले तर पराठा लाटतांना त्रास होतो. पराठा चिकटतो किंवा फाटतो.
4. ३ - ४ पराठे झाले तवा कापडाने/ टिशूने पुसून घ्यावा. सुक्या पीठाचे कान जळून पराठा कडसर होण्याची शक्यता असते.
हा हा हा प्राची
हा हा हा
प्राची
प्राची, मुद्दाम सांगितला
प्राची,
मुद्दाम सांगितला नव्हता...उगाचच त्यांना त्रास. पोस्ट टाकल्यावर निनाद यांची पोस्ट बघितली 
काय चाललंय काय???
काय चाललंय काय???
मामी मस्त टिप्स आणि
मामी मस्त टिप्स आणि पराठा.
आरती पराठा मस्त.
सारणात तेल घालून बघेन. मी चक्क उकडीच्या मोदकासाठी पारी हाताने करतो तशी करून भरते. नीट होतात.
इथे कांदा लिहिलाय पाकृमध्ये, एकदा कांदा घालून करून बघेन.
प्यार के पराठे आणि पराठे का
प्यार के पराठे
आणि पराठे का प्यार
आलू, कोबी, मेथी .. बरेच पराठे
आलू, कोबी, मेथी .. बरेच पराठे माझ्या आवडीचे आणि हे आमच्याकडे बनतातही मस्त .. पद्धत काही नेमकी मला सांगता येणार नाही पण ऑफिसमध्ये त्यांचे कौतुक आणि कसे करतात घरी हे विचारून सांग असे सारखे चालू असते..
मी सारणातच कणीक मिसळून
मी सारणातच कणीक मिसळून त्याचेच पराठे करायचो.
मामीन्ची टिप ( तेलाची) भारी
मामीन्ची टिप ( तेलाची) भारी आहे, आवडली. करुन बघते. मला यात हि. मिर्ची आवडते. लसुण मस्ट. एकवेळ आले नसले तरी मला आणी लेकीला चालते. पण हे पराठे गरमच मस्त लागतात. वरुन बटर.
पण ह्या रजवाडी मसाल्याचे काय
पण ह्या रजवाडी मसाल्याचे काय करु मी. इथे पुण्यात मिळाला नाही. आता मुम्बईच्या नातेवाईकान्कडुन मागवेन.
बादशहा चा रजवाडी गरम मसाला
बादशहा चा रजवाडी गरम मसाला मिळतो की ...
वा वा! सगळ्यांच्या पद्धतीने
वा वा! सगळ्यांच्या पद्धतीने करुन पाहिले पाहिजेत प्रांठे!
मस्त!!
बा चि को
Pages