Submitted by अमोल सूर्यवंशी on 4 August, 2015 - 05:40
हल्लीच नरेंद्र मोदींनी पोर्नोग्रफीवरती बंदी आणली आहे. तर तुमचे मत काय आहे या निर्णयाबद्दल ?
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
ता.क. अमेरिकास्थित लोकांनी या
ता.क.
अमेरिकास्थित लोकांनी या विषयावर (चाईल्ड पोर्न) अधिक माहिती मिळविण्यासाठी नुसतं गुगलूनही पाहू नये ही नम्र विनंती. नुसत्या त्या शब्दांच्या वापरानेही नसतं झेंगट पाठी लागू शकते. देवनागरीतली अक्षरे कदाचित स्कॅन-बॉट्सना समजणार नाहीत.
बंद केलेल्या कुठल्या
बंद केलेल्या कुठल्या साइटींमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी आहे, हे सरकारलासुद्धा नक्की माहीत नाही, कारण ती राजरोसपणे कशी कुठल्या वेबसाइटीवर असेल?
त्या याचिकाकर्त्याने ज्या वेबसाइटींची यादी कोर्टाला दिली होती, त्या सगळ्या साइटी सरकारने बंद पाडल्या. त्यात काही नॉन-पॉर्न साइटीही होत्या. त्या सुरू करू, असं सरकारने सांगितलं आहे. कोर्टानं चाइल्ड पोर्नोग्राफीबद्दल चिंता व्यक्त केली होती, जी अगदी योग्य आहे. घरच्या चार भिंतींमध्ये पोर्नोग्राफी पाहणं हा नागरिकांचा हक्क आहे, हेही कोर्टानं सांगितलं होतं. उन्मादात सरकार त्या साइटी बंद करून मोकळं झालं. शिवाय अजून साइटींवर बंदी घालू, असंही सांगितलंय. ज्यांच्याकडे व्हीपीएन आहे ते या साइटी बघू शकतात, असंही एका सरकारी अधिकार्यानं म्हटल्याचं आजच्या इकनॉमिक टाइम्सात आहे.
एकंदर सगळी मजा आहे. किंवा आता नाही. कसंही.
त्यात काही नॉन-पॉर्न साइटीही
त्यात काही नॉन-पॉर्न साइटीही होत्या. त्या सुरू करू, असं सरकारने सांगितलं आहे.
<<
यक्झ्याक्टली.
मॅगीवरची बंदी उठणार. आक्षेप
मॅगीवरची बंदी उठणार. आक्षेप निराधार सिद्ध झाले.
>>>एकंदर सगळी मजा आहे. किंवा
>>>एकंदर सगळी मजा आहे. किंवा आता नाही. कसंही.<<<
प्रतिसाद समजला.
+१
पण मग एकंदरीत काय मत आहे असे विचारू का?
खजुराहो मंदीर कधी झाकले जाणार
खजुराहो मंदीर कधी झाकले जाणार आहे?
आणि सौ. सनी लियोन नामक प्रकाराची घरवापसी कधी करणार आहे?
जाणकारांनी परकाश टाकावा
कालपासून पोर्न फिल्म्स आणि
कालपासून पोर्न फिल्म्स आणि खजुराहोची तुलना केलेल्या अनेक इरीटेटींग पोस्टी पाहण्यात आल्या. तुलना कशाला असं विचारणं म्हणजे आ बैल मुझे मार होऊन जाईल .
पोर्न कधीतरी करमणूक म्हणून पाहणे हे ओके आहे. पण त्यात मूर्खात काढण्याचा भाग जास्त असतो.
>>पोर्न कधीतरी करमणूक म्हणून
>>पोर्न कधीतरी करमणूक म्हणून पाहणे हे ओके आहे. पण त्यात मूर्खात काढण्याचा भाग जास्त असतो.<<
ओ खडी साखर, असं बोलुन आंबटशॉकिनांच्या उत्साहावर तुरटी फिरवु नका.
प्रोनोग्राफी चांगली का वाईट
प्रोनोग्राफी चांगली का वाईट या वादात सध्या शिरत नाही. पण कुठल्यातरी वकिलाने न्यायालयात सादर केलेली यादी न तपासताच सरसकट सगळ्या साइट्स तडकाफडकी बंद करायची सरकारला इतकी काय आणि का घाई झाली होती? नेहमीच्या प्रथेप्रमाणे आधी यादी तपासायला एक समिती नंतर त्याच्या अहवालावर विचार करायला आणखी एक उपसमिती यासारखे सोपस्कार पार पाडुन मग योग्य त्या साइट्स बंद केल्या असत्या तर कदाचित इतकी बोंबाबोंब झाली नसती. गरज नसलेल्या नॉन-पॉर्न साइट्स बंद केल्यामुळे हा सगळा प्रकार झाला. आता म्हणे जनक्षोभापुढे! नमुन! सरकारने हि बंदी मागे घेतली.
ख.सा., काय मॅगीवरची बंदी
ख.सा.,
काय मॅगीवरची बंदी उठली?
आपल्या तोंडात खडीसाखर!
बंदीचे
बंदीचे परिणाम.
http://abpmajha.abplive.in/movies/2015/08/05/article674921.ece/Why-did-K...
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bhus-medical-science-departmen...
ते अप्लिकेशन मोबाईल मध्ये
ते अप्लिकेशन मोबाईल मध्ये टाकणार कोण?
दादा, कॉलेजेस च्या LAN वर
दादा, कॉलेजेस च्या LAN वर टाकणार ते,
म्हणजे कॉलेज चेंफुकात वायफाय वापरून पोर्नो पाहणाऱ्या लोकांना आळा बसेल
एका अर्थी , आपल्या आस्थापणातील लोकांनी कोनट्या साइट्स पहाव्यात हा निर्णय त्या आस्थपनातील लोकांनी घ्यायचा असतो,
त्यामुळे प्रायवेट LaN लोकांनी कसे वापरावेत हा त्यांचा प्रश्न आहे.
भारतात ऑल ओव्हर इंटरनेट वर पॉर्न साईट बंद करण्यावरून ओरड झाली होती.
इथे वरती चाईल्ड
इथे वरती चाईल्ड पोर्नोग्राफीवर काही प्रतिसाद आलेत.
समीर गायकवाड यांची कालच फेसबुक पोस्ट वाचली. त्यातला काही भाग:
या आधी काही लेखांत चाईल्ड सेक्सवर्कर्सची तस्करी आणि त्यांचे शोषण यावर लिहिल्यावर काहींनी याचे पुरावे मागत हे स्वप्नरंजन असल्याची टीका केली होती. मंत्री महोदयांनी उल्लेखलेल्या भागातच मागील महिन्यात पोलिसांनी मोठे सेक्स रॅकेट उघडकीस आणलेय. ज्यात केवळ तीन ते आठ वर्षांच्या मुलींना विकले जात होते आणि तिथून धंद्याला लावले जात होते. एका तीन वर्षीय चिमुरडीच्या अपहरण प्रकरणातून ही धक्कादायक माहिती उजेडात आली होती.
पूर्ण लेख इथे वाचता येईल
https://sameerbapu.blogspot.in/2017/11/blog-post_16.html?m=1
धूम्रपाना वर बंदी, दारूबंदी,
धूम्रपाना वर बंदी, दारूबंदी, वेश्याव्यवसायावर बंदी अश्या कित्येक बंद्या जगभरात बरेचदा येऊन गेल्या आहेत.
पैकी अमेरिकेत निदान सार्वजनिक ठिकाणी तरी धूम्रपान बरेच कमी झालेले दिसते. बाकी कुणिहि कशावरहि बंदी आणली तरी फारसा फरक होत नाही.
मागे एक गोष्ट ऐकली होती-तमिळनाडू मधे एक पक्ष सत्तेवर आला की तो दारूबंदी करत असे. दुसरा पक्ष सत्तेवर आला की घोड्याच्या रेसेसवर बंदी येत असे. काहीहि बंद पडले नाही. कारण दारूबंदी आल्यावर दुप्पट जोराने काळा बाजार होऊन ते पैसे दारूबंदी करणार्या पक्षाला मिळत. तीच गोष्ट दुसर्या पक्षाची.
जगात इतरत्रहि हेच प्रकार कमी अधिक प्रमाणावर होत असणर याची मला खात्री आहे.