फोडणीच्या कण्या

Submitted by मुग्धा केदार on 30 July, 2015 - 05:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाताच्या कण्या १ वाटी,
ऊकळते पाणी ३ वाट्या,
फोडणीचे साहित्य,
अर्धे लिम्बु किंवा कैरीचे बारिक तुकडे,
लसूण पाकळ्या ३-४ ठेचुन,
मिरच्या २ ( तुकडे करुन )
कढिपत्ता,
ओलं खोबरं,
कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

कढईत खमंग फ़ोडणी करुन त्यात लसूण, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालावे. लसूण छान परतला गेला पाहिजे.
नंतर त्यात कण्या घालुन चांगल्या भाजुन/ परतुन घ्याव्या. वरुन लिम्बुरस किंवा कैरी घालावी.
त्यात उकळते पाणी घालुन झाकण ठेवुन छान १-२ वाफा येउ द्याव्या. कण्या छान शिजल्या की पाणी पुर्ण आटुन मोकळ्या होतात.
वरुन खोबरं कोथींबीर घालुन गरम गरम खाव्या.

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी
अधिक टिपा: 

१. अतिशय रुचकर वेगळा प्रकार नाश्त्याला होतो.
२. कण्या छान भाजायला हव्यात नाहितर गोळा होइल.
२. लसुण न घालता कांदा घालुन पण छान होतात. मला लसुण घालुनच आवडतात. जास्त खमंग लागतात.
३. साबा एकदाच भरपुर कण्या आणुन निवडुन, धुवून, वाळवुन ठेवतात.
४. वरी तांदुळ किंवा गहू दलिया वापरुन पण हीच कृती करता येइल.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. छान होतो हा प्रकार. माझ्या साबा नेहेमी करतात. पचायला पोह्यासारखा जड नाहीये. वरतुन कच्चा कान्दा घातला तरी छान लागतो.

वा! माझी काकू या अशा कण्यांचे मस्त फोडणीचे पोहे करते. तिची टिप ही की भरपूर तेल वापरायचे. कण्यांवर पाण्याचा हबका मारत मारत मंद आंचेवर कण्या फुलवायच्या. वेळ लागतो, पेशन्स लागतो, पण कण्यांचे असे पोहे फार मस्त लागतात चवीला. Happy

लिंबु घालून परतून मग शिजवायचे.

त्यापेक्षा आधी शिजवुन मग लिंबू घालावा का ?

( शिजवल्याने लिंबवातील क जी. स . जाते.. अर्थात असा पदार्थ चवीसाठी असतो. हे मान्य. पण चवीत फरक पडेल का ? )