Couscous - कुसकुस

Submitted by साहिल शहा on 26 July, 2015 - 16:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुसकुस , ऑलिव्ह तेल , बटर
भाज्या : हिरवी मटार , श्रावणी घेवडा , कांदा , मका , टॉमेटो (आणि घरात ईतर भाज्या असतिल त्या पण चालतिल)
मसाला : जीरा , बासिल आणि ओरेगॉनो पान (नसल्यास कडीपत्ता कोथींबिर पण चालेल), लाल तिखट, काळी मिरी पुड
चवीला मिठ

क्रमवार पाककृती: 

गॅस वर एक वाटी कुसकुस साठी दिड वाटी पाणी ह्या प्रमाणात पाणि उकळायला ठेवणे. त्यात चवीला मिठ आणि थोडेसे बटर घालणे. पाणी उकळायला लागल्यावर गॅस एकदम बारिक करुन त्यात कुसकुस घालणे. काटे चमच्याने ३० सेकंद हलवणे. त्यानंतर गॅस बंद करुन भांडे ५ मिनिट झाकुन ठेवणे. कुसकुस तयार.

भाजी करण्यासाठी एक पॅन घ्या. त्यात ऑलिव्ह तेल गरम झाल्यवर कांदा परतुन घ्या. त्यात जिरे, बासिल ओरेगामी leave, तिखट- मिठ, भाज्या टाकुन ते एकजिव करा. मग पॅन वर झाकण ठेउन बारिक गॅस वर २-३ मिनिटे वाफऊन घ्यावे.
नंतर ताटात कुस्कुस आणि भाज्या बाजुबाजुला वाढावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

दोन वाट्या कुसकुस मध्ये चार जणाचे जेवण होते.

IMG_0723.JPG

कुसकुस
IMG_0724.JPG

भाजी
IMG_0725.JPG

जेवण तयार आहे. जेवायला या Happy

माहितीचा स्रोत: 
एपकॉट ( डिसनी ) मधील मोरक्कन उपहारग्रुह
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुस्कुस हा, चवीला व दिसायला भारतातील वरी/ भगरीच्या आसपास, गव्हाचा विशिष्ट पध्दतीने केलेला उत्तर आफ्रिकन रवा आहे.
तळाटीपः मात्र याचे लाडू करता येत नाहीत. Wink

कुसकुस हे अमेरिका , युरोप , आफ्रिका आणि आखाती देशातिल बर्याच ग्रोसरी स्टोअर मध्ये मिळते. भारतात मोठ्या किंवा online ग्रोसरी दुकानात मिळेल.

ही भाजी आणि कुसकुस एकत्र खायची आयडिया छानच आहे. फोटो मधे तुम्ही केलेली भाजी टेंप्टिंग दिसतेय.
कुसकुस फार पौष्टिक असतं पण मला त्याची ब्लॅंड चव नाही आवडत. आता असच करून पाहते. या रेसेपिने ने कुसकुस चवदार लागेल अस वाटतय.

सगळ्याना धन्यवाद.
तुम्ही जर मांसाहार घेत असाल तर भाजीच्या एवजी मटन किंवा चिकन करुन कुसकुस बरोबर वाढु शकता.