स्मार्टफोन वापरत नसल्याने दिला लग्नाला नकार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 July, 2015 - 13:30

शीर्षक वाचून संध्यानंद मधील बातमी तर वाचत नाही ना, असा फील आला ना.
पण बातमी खरी आहे, पक्की आहे. जवळच्याच एकाच्या अनुभवातील आहे.

माझ्या घराजवळच राहणारा, माझा ऑफिसमधील मित्र. गेल्या शनिवारच्या रात्री अचानक घरी आला आणि म्हणाला, "रुनम्या एका दिवसासाठी तुझा फोन मिळेल का?"

फोन ??? मी किंचाळलोच !!

ते सीआयडी मालिकेत नाही का साध्या गणवेषातील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन वगैरे आपली ओळख उघड करतात तेव्हा समोरचे लोक "सीआयडी!!" करत दचकतात. बस्स सेम त्याच टाईपमध्ये.
आणि साहजिकच आहे म्हणा, एकवेळ एखाद्याला आपल्या बॅंक अकाऊंटचे डिटेल आपण सहज सांगून जाऊ, पण फोन कोणाच्या हातात देताना मात्र शंभर वेळा विचार करू.. तो जेव्हा हरवतो तेव्हा किती हजारांचा फटका बसला हा विचार नंतर मनात येतो, त्या आधी फोनसोबत काय काय गेले आणि ते आता कोणाच्या हातात पडेल, त्याचा तो दुरुपयोग कसा करेल याचीच चिंता जास्त सतावते.. जणू फोन नव्हे आपला जीव अडकलेला जादूचा पोपटच असतो तो.

"दे ना यार, फक्त एका दिवसासाठीच हवाय.. तू तोपर्यंत माझा वापर.." माझी मनस्थिती ओळखून मित्र म्हणाला.

तसेही त्याला आपला फोन मला द्यायला काय हरकत होती म्हणा!.. ईसवीसन स्मार्टफोनपुर्व ६ वर्षे काळातील कसलासा दगडी मोबाईल तो वापरत होता. त्याचा मी काही दुरुपयोग करायचा ठरवलेच तरी रिंगटोन बदलणे वा चुकीचा अलार्म सेट करणे यापलीकडे फारसा खोडसाळपणा करणे शक्य नव्हते.
गेले दीड ते दोन वर्षे एकाच तालासुरात वाजणारी त्याची रिंगटोन पुर्ण ऑफिसात चर्चेचा विषय होती. ना कॅमेरा, ना म्युजिक प्लेअर, ना ईंटरनेट, ना व्हॉटसप., बोलण्याव्यतिरीक्त वापरशून्य असलेली ती वस्तू मोबाईल फोनच्या गोंडस नावाखाली वापरून तो आपल्या दैनंदिन जीवनातल्या भौतिक आणि सामाजिक गरजा कश्या पुर्ण करतो हे अख्या ऑफिसला पडलेले एक कोडे होते !.

तसे नाही म्हणायला त्याच्या ईतिहासात डोकावले असता, कॉलेजात असताना, त्याने आपला पहिला फोन म्हणून नोकिया एन-७३ तब्बल २५ हजारांना खरेदी केल्याच्या आठवणी सापडतात. पण तो फोन घेतल्यानंतर अल्पावधीतच त्या फोनचे ७-८ हजारांनी उतरलेले खरेदीमूल्य, हा धक्का त्याला सहन झाला नव्हता. आज एखाद्या फोनची किंमत पंचवीस हजार आहे, तर उद्या वीस हजार, तर परवा पंधरा हजार, यालाच एकमेव शाश्वत सत्य तो समजू लागला होता. त्यामुळे कुठल्याही महागड्या फोनमध्ये पैसे आणि मन न गुंतवता, ‘जुनं फोन तेच सोनं’ म्हणत स्मार्ट फोन पासून नेहमी दूर राहत होता.

पण .. मग .. आज.. अचानक.. त्याला स्मार्टफोनची काय गरज पडली असावी?

तर,
उद्याच्या दिवशी, म्हणजे रविवारी, त्याला एका मुलीला लग्नासाठी म्हणून भेटायला जायचे होते. भेट घराबाहेरच कुठल्याश्या मॉलमध्ये होणार होती आणि त्याला सोबत शायनिंग मारायला म्हणून माझा स्मार्टफोन हवा होता.
आता माझा फोन देखील फार काही महागडा आणि अत्याधुनिक होता अश्यातला भाग नाही, पण त्याच्या दोनचार हजाराच्या स्मार्टलेस दगडी फोन पेक्षा कित्येक पटींनी सरस होता. स्मार्ट होता. म्हणून त्याला तो सोबत हवा होता, ज्यामागे कारणही तसेच होते.

तर झाले असे होते, आदल्या रविवारी देखील तो असाच विवाहेच्छुक बनून एका मुलीची भेट घ्यायला गेला होता. आलिशान हॉटेल, भारीतले कपडे, गळ्यात हलकासा टाय, त्यावर शिंपडलेले ऊंची अत्तर, हातापायात गोळे यावेत ईतक्या वजनाचे ब्रांडेड घड्याळ आणि पादत्राणे.. सारे काही समोरच्याला, स्सॉरी समोरचीला, ईम्प्रेस करण्यासाठी सेट होते.. पण काहीही एक्स्प्रेस करायच्या आधीच, अचानक त्याचा फोन वाजला आणि क्षणार्धात सारे फुस्स. जणू काही आतापर्यंत जे काही ऊंची ऊंची होते तो सारा दिखावा होता आणि त्याची खरी लायकी त्याच्या फोनने दाखवली होती.

दुसर्‍याच दिवशी त्या मुलीने आपली नापसंती कळवली आणि खोदून खोदून कारण विचारण्यात आल्यावर आज अखेर तिने स्पष्टच सांगितले होते की, "नो स्मार्ट फोन मीन्स नो स्मार्ट पर्सन !" खेळ खल्लास!!

या आधी आमच्या ऑफिसात कैकवेळा दोन्ही बाजूने ही चर्चा झाली होती.

* पहिली बाजू - जे स्मार्टफोन वापरतात ते स्मार्ट असतात ‘किंवा’ जे स्मार्ट असतात ते स्मार्टफोन वापरतात.

* दुसरी बाजू - जे स्वत: स्मार्ट असतात त्यांना स्मार्टफोन वापरायची गरज नसते ‘किंवा’ जे स्वत: स्मार्ट नसतात त्यांना स्मार्टनेससाठी फोन स्मार्ट वापरावे लागतात.

मी नेहमी या चर्चेत तटस्थ राहायचो आणि हा मित्र अर्थातच दुसर्‍या बाजूने एकटाच लढायचा.
तो एकटा लढू शकायचा कारण ऑफिसच्या ईतर कामात तो दाखवत असलेल्या स्मार्टनेसबद्दल कोणालाही शंका घ्यायचे कारण नव्हते ईतका तो चोख होता. ईतका तो स्मार्ट होता.

पण आज मात्र कुरुक्षेत्रावरच्या लढाईत हेच युद्ध तो स्वत:चा बचाव करायची संधीही न मिळता हरला होता.
फक्त फोन स्मार्ट वापरत नसल्याने ईतर सर्व गोष्टी नजरेआड करत त्याच्यातील स्मार्टनेसवर शंका घेत नाकारला गेला होता.

आणि म्हणूनच त्याने ठरवले होते की उद्याच्या पहिल्या भेटीत मुलीला आपला खरा फोन न दाखवता त्या आधी तिला आपले खरे रूप, जे पुरेसे स्मार्ट आहे, ते दाखवावे आणि त्यानंतरच आपण कोणता फोन वापरतो हे उघड करावे.

अर्थात, यात तो त्या मुलीची कुठलीही फसवणूक करत नसल्याने मी त्याला माझा फोन द्यायचे कबूल केले आणि त्यानुसार त्यांची ती भेट सुखरूप पार पडली.

आता माझ्या त्या फोनच्या पायगुणाने त्याचे लग्न जमले की नाही हा या धाग्याचा विषय नाहीये, म्हणून ते तुर्तास गुलदस्त्यात.
तसेच, असे मित्राचा फोन वापरून पहिल्या भेटीत मुलीपासून आपल्याबद्दलची एखादी गोष्ट लपवणे ही फसवणूक तर नाही ना, या प्रकारची चर्चा देखील इथे शक्य असल्यास टाळा..

आणि एवढेच सांगा, विवाहेच्छुक मुलगा वा मुलगी फोन कोणता वापरतो / वापरते यावरून त्यांच्या विषयी अंदाज बांधणे हे कितपत योग्य आहे? तीस-पस्तीस हजाराचा फोन घेऊन त्यावर दिवसातले अडीज तास कॅन्डी क्रश व व्हॉटसप व्हॉटसप खेळत बसणारे, आणि त्यातील हाय मेगापिक्सल कॅमेरा वापरत तासाला चार सेल्फी काढणारे, यांचा स्मार्टनेसचा दर्जा तो असा काय असतो?

- टिंब टिंब ऋन्म्या

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्येकवेळेस लोक स्वतःचे प्रश्न, मित्रमैत्रिणीच्या नावावर खपवून उत्तरे/सल्ले शोधतात, तशागतच तुला काही म्हणायचे नाही ना केदार?
पूर्वी (२५/३०/३५ वर्षांपूर्वी) (उषा)वहिंनीचा सल्ला की कायसासा विषय असायचा सकाळमधे... त्यातिल बहुतेक सर्व प्रश्न मित्र/मैत्रीण/नातेवाईक अशा तिर्‍हाइतांसंदर्भात विचारलेले असायचे.

काल्पनिक तर काल्पनिक.... विचार मांडायला काय हरकत आहे?

आपल्याला बुवा तो मुलगा स्मार्ट फोन वापरत नाही यात काही एक आश्चर्य वाटल नाही पण ते न वापरण्यामागचे त्याचे कारण काही जमल नाहीये... स्मार्टफोनला कंटाळून बेसीक फोनवर आलेली काही मंडळी बघीतलीयत मी पण स्मार्टफोनच्या किमती उतरतात म्हणून न घेणारा पहीलाच बघतोय.... बर नको घेउस मग नवा फोन पण घेतला होतास तो कुठला 25 हजाराचा तो तरी वापर की!

तुम्ही जसे लिहीले आहे त्याप्रमाणेच हल्ली मोबाईल हा तुमच्या निवडीचं, तुमच्या गरजांचं प्रतीक असतो. जसं की एखाद्याला सतत ईमेल कनेक्टेड राहावं लागत असेल तर त्याला तो जुनाट दगडी फोन वापरून उपयोगच नाही. म्हणजे तो स्वत: स्मार्ट असो वा नसो. आता एकदा मोबाईल हा तुमच्या प्रोफाईलचा भाग आहे असे गृहीतक धरले की पुढच्या गोष्टी सोप्या होतात.
१. कदाचित असेही असूे शकेल की त्या जुनाट दगडी फोनमुळे तिला तो मुलगा टेकी वाटला नसेल.
२. या मुलाला काही हौसमौजेची आवड नाही, स्वत:ची तत्वं कसोशीने जपणारा वाटला असेल.
३. याला स्मार्टफोन वापरायला लावण्यापासून सुरवात करायची या विचारानेच तिचे हातपाय गळाले असतील.
४. घरचे वातावरणही असेच जुनाट बुरसटलेल्या विचारांचे असू शकते असे वाटले असेल.
५. समजा, मुलीलाच भेटायला जायचे आहे तर कशाला फॉर्मल्समधे जा, त्यापेक्षा झब्बा आणि पीतांबर नेसून, पायात चप्पल न घालता जाऊ असे म्हणून तुम्ही गेलात आणि त्या मुलीने तुम्हाला नकार दिला तर काय म्हणाल? की त्या मुलीने पोशाखावर लक्ष दिले, त्यातल्या माणसावर नाही. अहो, पण पोशाख करायचा कशासाठी? इंप्रेशन जमवण्यासाठीच ना. जेव्हा पहिल्यांदाच भेट होणार असते तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे आहात यापेक्षा कसे दिसत आहात यावरच भर द्यावा लागतो. कसे दिसत आहात हे पटले तर कसे आहात हे समजायला आख्खे आयुष्यं पडलंय की. तुम्हाला तुमच्या फर्स्ट इंप्रेशनची फिकीर नाही तर त्या मुलीने फिरून तुम्ही खरंच कसे आहात हे जोखण्याची तसदी का घ्यावी?
*मला व्यक्तिश: असे वाटते की केवळ हेच कारण नसावे, हे एक निमित्त असावे. तसंही दाखवायला येताना मुलगी जीन्स किंवा साडीत अाली, केस मोकळे सोडून आली, मोठ्ठे कानातले घालून आली म्हणून नकार मिळाल्याचे किस्से फार जुने आहेत.

ऋन्मेष, छान लिहितोस Happy

भविष्यवाणी : एका मुलाला माबोवर शेकड्यांनी धागे काढतो म्हणून नकार आला स्मित >> Lol

"कपडे, घड्याळ आणि ओव्हर ऑल तरी बरा दिसतोय. पण मग स्मार्ट फोन नाही हे कसे काय? की मग आहे पण इथे आणला नहिये. तर मग का आणला नाहीये? अशी लपवा लपवी का? का वापरता येत नाही? पण मग सांगितलेली डिग्री तरी खरी आहे का?
परवा त्या अमुक तमुक मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या भावाला जॉब इन्टरविव्ह मधे तुमच्या कडे स्मार्ट फोन नाही तर तुम्ही सॉ.टेस्टर साठी अपात्र आहात अस सांगुन नाकारण्यात आल. तो हाच तर नसेल? कारण आजच्या जमान्यात २-३ हजारात मिळणारा स्मार्ट फोन नाही यावर विश्वास नाही बसत. जावुदे सगळच संशयास्पद आहे. सरळ नकार द्यावा." >>> :खोखो:. अगदी मराठी सिरियलमधले विचार मांडलेत

हे आज भारतातून इ-मेलमधून आले. भरतातल्या कुणाला तरी हे कुठे छापून आले होते ते शोधावे.

यदा यदा हि मोबाइलस्य
ग्लानिर्भवति सिग्नलः
आउट ऑफ रीच सूचनेन
त्वरित जागृत संशयाः ।

विच्छेदितं संपर्का:
कलहं मात्र भविष्यति।
तस्मात चार्जिंग एवं रिचार्जिंग,
कुर्वंतु तव सत्वरं।।

मनसोक्तम् चॅटिंगं
हास्यविनोदेन टेक्स्टिंगं।
सत्वर सत्वर फाॅरवर्डिंगं,
अखंडितं सेवाः प्रार्थयामि।।

टच स्क्रीनं नमस्तुभ्यं
अंगुलीस्पर्शं क्षमस्वमे।
प्रसन्नाय इष्टमित्राणां,
अहोरात्रं मेसेजम् करिष्ये॥

इति श्री मोबाईल स्तोत्रम् संपूर्णम्

ॐ शांति शांति शांति:
॥शुभम् भवतु॥

"रोज सुबह शाम इसका ३ बार जाप करें तो Internet की सर्विस अखंड बनी रहती है और आपका Mobile सदा निरोगी रहता है।

हा धागाही ऋ ने पावसाळ्यातला टाइमपास म्हणून काढला आहे आणि संध्यानंदसारखा पेपर इकडे काढ़ण्याच्या विचारात आहे हे कळले.

तुमचा मित्र ४५ वयाचा वाटतो आहे हामाझा तर्क आहे भारी कपडे ,वस्तु घालून मुलीस(प्रौढा)इंप्रेस करायला जाणारे अशा वयोगटातले होतकरू असतात.शिवाय तो पंचवीस हजाराचा नोकिया वगैरे.

तिशीच्या आतले साधा टी शर्ट घालतील.भेटल्यावर काय गॅार्जस दिसत्येस या ड्रेस मध्ये !तुला एक छानसा आवडीचा फोन घेऊन देतो.-खेळ खल्लास.

खार्‍या दाण्यांसारखा कुरकुरीत टाइमपास धागा काढला आहेत. छान आहे.

त्या मुलीनं स्मार्ट फोनसाठी मुलाला नाकारावं की नाही हा तिचा प्रश्न आहे. तुमच्या दृष्टीनी तुमचा मित्र महत्वाचा आहे. दुसर्‍या मुलीच्या वेळी तो स्मार्ट फोन मागायला आलेला असताना त्याला फोन देण्याऐवजी मित्र म्हणून त्याला योग्य सल्ला देणं तुमचं कर्तव्य होतं.

पहिल्या भेटीतच ऋण काढून सण करायची वेळ आली म्हणजे आयुष्यभर फरफट होईल. शायनिंग मारण्याच्या भानगडीत पडू नकोस. वगैरे वगैरे.

या आधी आमच्या ऑफिसात कैकवेळा दोन्ही बाजूने ही चर्चा झाली होती.
* पहिली बाजू - जे स्मार्टफोन वापरतात ते स्मार्ट असतात ‘किंवा’ जे स्मार्ट असतात ते स्मार्टफोन वापरतात.
* दुसरी बाजू - जे स्वत: स्मार्ट असतात त्यांना स्मार्टफोन वापरायची गरज नसते ‘किंवा’ जे स्वत: स्मार्ट नसतात त्यांना स्मार्टनेससाठी फोन स्मार्ट वापरावे लागतात.
मी नेहमी या चर्चेत तटस्थ राहायचो आणि हा मित्र अर्थातच दुसर्‍या बाजूने एकटाच लढायचा.

>>>>>>>>>>>>>>>>>>>

मला वाटते त्या हॉटेलमध्ये मुलीबरोबर तिचा स्मार्टफोन पाहुन अस्साच लढ्ला असणार. मुलीने पण विचार केला असावा लग्नाआधीच इतका वाद घालतो लग्नानन्तर काय आपले ऐक्णार म्हणुन दिला असावा नकार.

तात्पर्य : मुलगी आवडली असल्यास लग्न होइपर्यन्त तरी तिचे ऐकत जावे!

भविष्यवाणी : एका मुलाला माबोवर शेकड्यांनी धागे काढतो म्हणून नकार आला
>>>>>>>>>>

ऋन्म्या, तू अनमॅरिड आहेस??? Uhoh
इथला तुझा वावर, धागा काढायची फ्रिक्वेन्सी पाहता तू किमान "लग्नपिडित" असणार असा माझा एक भाबडा कयास होता Proud

धाग्यांवरचे अनमॅरिड असलेले उल्लेख मी जमेस धरले नव्हते हो Wink

हा धागा काढून मी आठवडाभर गायबल्याने लोकांच्या शंका कुशंका प्रतिसाद आभार धन्यवाद राहिले.
आता देतो Happy

निरा: एक्दम सहमत विचार फ्लो शी. >>
+७८६
मात्र स्त्री कसा विचार करते हे ब्रह्मदेवालाही ठाऊक नसते असे म्हणतात. पण कदाचित एक स्त्री कसा विचार करते हे दुसरी स्त्री ओळखू शकत असावी या संशयाचा फायदा देतो.
अवांतर- विचार फ्लो - काय पण शब्द - मराठीभाषासंस्कृतीरक्षक कृपया ईथे लक्ष द्या Happy

@आशूडी, सहमत, पोस्ट आवडली. Happy

@ केदार
ही बातमी काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये आली होती. की स्मार्टफोन वापरत नसल्यामुळे मुलीने नकार दिला. ( टाईम्स ऑफ इंडिया किंवा एनडीटिव्ही वर मी ही बातमी वाचली आहे.) आणि ती मुंबईतली नव्हती हे मला आठवत आहे.
ऋन्मेशने ती बातमी उचलून त्यात स्वतःचा मित्र आणून त्याला कथेची फोडणी देऊन ही चर्चा चालवली आहे.
>>>>>

केदार, मी नाही वाचली ती न्यूज ना आणखी कोणत्या न्यूजला फोडणी देत लिहिलेय.
मात्र आपल्या पोस्टने एक सिद्ध केले की हे काल्पनिक वा अशक्य नसून असे घडलेय, घडते, घडू शकते. मग तो ऋन्मेषचा मित्र असेना वा आणखी कोणी न्यूजमधील पोरगा, काय फरक पडतो.

@ srd
तुमचा मित्र ४५ वयाचा वाटतो आहे हामाझा तर्क आहे भारी कपडे ,वस्तु घालून मुलीस(प्रौढा)इंप्रेस करायला जाणारे अशा वयोगटातले होतकरू असतात.शिवाय तो पंचवीस हजाराचा नोकिया वगैरे.
>>>>
भारी कपडे म्हणजे फॉर्मल वगैरे कारण त्याला एक सेमीनार अटेंड करायचे होते, तिथूनच गेलेला. अन्यथा जीन्स-टीशर्ट घालून गेला असता.
आणि पंचवीस हजाराचा एन ७३ नोकिया फोन माझ्यामते २००६ चा असावा फार तर, त्या आधी नाही. तो मित्राचा पहिला कॉलेजातील म्हणजे तो १८ वर्षांचा असताना, तर आता त्याचे वय २७ झाले ना, फार तर २८. योग्यच आहे की लग्नासाठी.

@ निलिमा,
तात्पर्य : मुलगी आवडली असल्यास लग्न होइपर्यन्त तरी तिचे ऐकत जावे!
>>>
होय Happy
मी स्वत: हे कसोशीने पाळतोय Happy

@ भुंगा,
ऋन्म्या, तू अनमॅरिड आहेस??
>>>
होय पण माझी ग’फ्रेंड आहे आणि मी तिच्याशी प्रामाणिक आहेस. उगाच माझ्या डोक्यात नको तो भुंगा सोडू नकोस Wink

स्मार्ट फोन वापरणे हि आजच्या काळाची गरज आहे खरी , बर्याच गोष्टी या फोनद्वारे सहज शक्य होतात
पण फक्त याच कारणासाठी एकाद्याच्या स्मार्ट लुकिंग पासून त्याच्या स्मार्ट बुधीविषयी पण शंका घेणारी मुलगी स्मार्ट कशी असू शकेल हा मला पडलेला प्रश्नच आहे ?

२००६ साली तो २८ च्या पुढचाच असावा .कारण तेव्हा १८ चा मुलगा एवढा महागडा फोन घेणार नाही.तरुण पिढी "स्वस्तातले स्मार्टफोन घेण्याच्या मागे असते"यावर खल व्हावा.
१८ वयाचा मुद्दा : असहमत.

Srd,

>> तुमचा मित्र ४५ वयाचा वाटतो आहे हामाझा तर्क आहे भारी कपडे ,वस्तु घालून मुलीस(प्रौढा)इंप्रेस करायला जाणारे
>> अशा वयोगटातले होतकरू असतात.शिवाय तो पंचवीस हजाराचा नोकिया वगैरे.

वयाच्या अंदाजाशी सहमत. मात्र तर्काशी असहमत. माझा तर्क वेगळा आहे. पंचेचाळीसाव्या वर्षी माणूस सभ्य झालेला असतो. भारी कपडे घालून पोरीवर छाप पाडणे (इम्प्रेशन मारणे) सभ्यपणाचे लक्षण आहे. कपडे काढून पोरीचे लक्ष वेधून घेणे असभ्य कृत्य असून केवळ हिंदी सिनेमातच शक्य आहे.

आ.न.,
-गा.पै.

कारण तेव्हा १८ चा मुलगा एवढा महागडा फोन घेणार नाही.
>>>>>
त्या १८ वर्षे मुलाचा ४८ वर्षांचा बाप धनाढ्य असू शकत नाही का?
एकाच फटक्यात टोकाचे उदाहरण घेऊन समजवायचे झाल्यास श्री मुकेश अंबानी यांच्या मुलाने आपला पहिला मोबाईल कितव्या वर्षी आणि किती हजारांचा घेतला असावा याचे ऊत्तर आपणच मला द्या Happy

तरुण पिढी "स्वस्तातले स्मार्टफोन घेण्याच्या मागे असते"यावर खल व्हावा.
>>>>>>
आजची तरुण पिढी म्हणाल तर नाय नो नेवर!
मी रोज सकाळ-संध्याकाळ ट्रेनने येता-जाता कॉलेजच्या मुला-मुलींचा ग्रूप पाहतो, प्रत्येकाच्या हातात महागडे फोन वा टॅब असतात, ते देखील बरेचदा एक सोडून दोन दोन.

एवढेच नव्हे तर मध्यमवर्गीय कुटुंबातील नुकतेच कामाला लागलेले युवक ज्यांच्या पगार भले जेमतेम १२-१५ हजार का असेना पण घरी पैसे द्यायचे नसल्यास त्यांच्याकडे देखील २०-२५ हजारांचा फोन सहज असतो.
तसेच जे ८-१० हजारांचे चायना मॉडेल वापरतात ते देखील दर ८-१० महिन्यांनी लेटेस्ट मॉडेल वापरा कॅटेगरीतील असतात. त्यामुळे एकंदरीत यालाही स्वस्तातले म्हणता येणार नाही.

काही काही लोक काही झाले तरी आपला शब्द खाली पडू देत नाहीत..... स्वता पडतील पण शब्द नाही >>
आणि पडलेच तर "मी तर ते उपरोधाने लिहिले होते, तुमच्या लक्षात तो उपरोध आला नाही." असे म्हणुन हात वर करणार.

काही काही लोक काही झाले तरी आपला शब्द खाली पडू देत नाहीत..... स्वता पडतील पण शब्द नाही
>>>

हा हा, हे माझ्यासाठी असेल तर येस्स, मी आहे तसा Wink

आमचे सिंग साहेब (सेक्शन हेड) माझ्याबद्दल नेहमी म्हणतात, ये बंदे के पास हर सवाल का जवाब होता है ..

आताच झी मराठीवर "नांदा सौख्य भरे" या नवीन मालिकेची जाहीरात पाहिली.
त्यातील हिरोईनीच्या तोंडचा डायलॉग ऐका,

"जिथे माणसाची किंमत त्याच्या मोबाईलवरून ठरवली जाते त्या घरात मी लग्न करून कशी सुखी होईन.."

आता बोला Happy

खुसखुशीत खसखस पिकवणारा ऋन्म्या..........अगदी खर्र्य Happy
जणू फोन नव्हे आपला जीव अडकलेला जादूचा पोपटच असतो तो., ईसवीसन स्मार्टफोनपुर्व ६ वर्षे..... हाहाहा

वर आणि वधू दोघेही विचित्रच. असेही महाभाग आहेत तर . फोनवरून परीक्षा ? आणि निकालही ठरवला?

माझा एक भाऊ आहे असाच जुनाट फोन वापरायचा, आत्ता बायको आली तर तिनेच नवीन स्मार्ट फोन घ्यायला लावला खर तर गिफ्ट दिला..... वहिनींची आज्ञा सरकारनि पाळली आणि आत्ता फोन एन्जोय देखील करत आहेत.

Pages