१.१वाटी उडीद डाळ
२.मूग डाळ+मसूर डाळ+चना डाळ एकत्र १ वाटी
३.किसलेले खोबरे १वाटी
४.लसूण १०_१२ पाकळया,आलं,कोथिंबीर
५.लाल सुकलेल्या मिरच्या २
६.१चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पावडर, हळद,हिंग,दालचिनी चा छोटासा तुकडा,कढीपत्याची ३-४ पाने.
७ फोडणीसाठी जिरे, राई, १ तेजपान, तेल आणि चवीनुसार मीठ.
१.प्रथम सर्व डाळी एकत्रित धुवून, छोट्या कुकरमध्ये सुटी शिजवून घ्या.
२.खोबऱ्याचा किस,कोथिंबीर, ५-६ लसूण पाकळ्या,आलं,दालचिनी चा छोटासा तुकडा, तिखट,गरम मसाला, धणे पावडर,हळद इत्यादी पाणी न टाकता, मिक्सर मध्ये वाटून घ्या.
३. एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात तेजपान टाका. जिरे,राई टाका. तडतडल्यावर कढीपत्याची पाने टाका.
४.राहिलेलल्या ३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरून टाका, जरा लालसर झाल्यावर लाल मिरचीचे तुकडे टाका.चिमूटभर हिंग टाका.
५.आता मिक्सरमधील वाटण टाकून छान परतून घ्या.
६.त्यात शिजवलेली डाळ टाकून परतून घ्या. चवीनुसार मीठ टाका.
७.आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून उकळी आणा.मिश्र डाळ तयार..!
१.या डाळी मध्ये उडदाच्या डाळीचे प्रमाण जास्त असल्याने थोडी चिगट व घट्टच होते. त्यामुळे पाणी(आपल्या अंदाजे) थोडे जास्त घालावे.
२.डाळी एकत्र असल्याने तिखटच छान लागते. ज्यांना तिखट किंवा झणझणीत आवडते त्यांनी आवडीनुसार अजून तिखट घालावे.
३.भातापेक्षा पोळी बरोबर जास्त छान लागते.
अवांतर टीप: मी माबोवर नवीन असून, माझा हा स्वतंत्र लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे.चु. भू. दे. घे.
मुलांना आवडत असल्याने,मी ही मिश्र डाळ नेहमी करते. आजच केली असल्याने इथे कृती शेअर करत आहे.
छान कृती आहे. माबोवर स्वागत.
छान कृती आहे. माबोवर स्वागत.:स्मित: फक्त मसाला करायला वेळ लागेल.
छान आहे कृती.. मुंबईत असे
छान आहे कृती.. मुंबईत असे मिश्र डाळीचे पाकिट तयारच मिळते.
भावदीप, मायबोलीवर स्वागत
भावदीप, मायबोलीवर स्वागत
डाळीचे खरंच सांगायचं तर अगणित प्रकार करता येतात.
हाही प्रकार मस्तच वाटतोय. करून पाहीनच. वरून साजुक तुपाची चरचरीत फोडणी ( हवं तर लाल तिखट पोळवून) तर अजूनच मस्त लागेल बहुधा.
धन्यवाद
धन्यवाद रश्मी,दिनेश,योकु..
योकु नक्की करून पहा आणि कळवा कशी वाटली..
मिश्रडाळ आवडते. या पद्धतीनं
मिश्रडाळ आवडते. या पद्धतीनं करून बघेन.
खोबरं ओलं की कोरडं ?
खोबरं ओलं की कोरडं ?
भावदीप... मस्तय रेसिपी.
भावदीप... मस्तय रेसिपी. अभिनंदन... पहिल्या वहिल्या प्रयत्नासाठी. छान फोटोसहं अजून पाककृती येऊद्या
खोबरे सुकेच आहे(.ओले खोबरे
खोबरे सुकेच आहे(.ओले खोबरे वापरले तर ,खोबऱ्याच्या गोडवा ने डाळ अजून फिकी लागेल.)
धन्यवाद दाद.