ओपनिंग सेरिमनी -
फोटो: rmd
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फोटो: rmd
३ जुलै २०१५:
ओपनिंग सेरिमनी मधे भाग घेतल्याने सकाळी सात पासून रेडी राहून बॅक्स्टेज हजेरी, प्रॅक्टीस वगैरे.
आम्हाला सकाळी कन्व्हेम्शन ला जाताना आम्हाला गणेश वंदना डान्स च्या गेटप मधे पाहून व्हॉलेंटीअर्स नी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे केले, अगदी योगायोग.. आम्ही तिथुन जाण्याची आणि मुख्यमंत्र्यांची येण्याची वेळ एकच म्हणून , नाहीतर आम्ही स्वागताला उभे रहाणे काही प्लॅन्ड नव्हते..
नंतर बॅकस्टेज जाताना ललित प्रभाकर पण भेटला स्मित, जास्तं काही बोलायला वेळ नव्हता म्हणून आटोपशीर २-४ काँप्लिमेंट्स देउन त्याला टाटाबायबाय केलं.
भाषणं नाही ऐकायला मिळाली त्यामुळे आरतीने सांगितलेला धमाल किस्सा मिस केला स्मित.
बाकी स्वतःच पार्टीसिपेट केल्याने ओपनिंग सेरिमनी बद्दल लिहित नाही , इतरांचे प्रामाणिक फीडबॅक येतीलच फिदीफिदी , पण आय होप आमचा पहिलाच डान्स असल्याने पन्लिक निदान भुकेने कंटाळून अॅरीना सोडुन गेले मसाबेत स्मित.
ओपनिंग सेरिमनी नंतर लंच हॉल मधल्या रांगा पाहून पोटात गोळा आला, बराच वेळा नंतर बहुदा फुड स्टेशन वाढवली आणि रांगा हलु लागल्या , पण जे पदार्थ हवे ते संपलेले असणे ही रडारड होतीच.
इन जनरल राजभोग (न्यु जर्सी)चं जेवण मला अजिबात नाही आवडलं अरेरे. कुठलच मिल नाही आवडलं , या शिवाय मधेच मेक्स्किकन पदार्थ ठेवायची आयडीआ अतिशय फ्लॉप.. लोक वैतागले होते..
मराठी / भारतीय पदार्थ सुद्धा काही खास जमले नव्हते, फणसाची भाजी अळणि सपक, ना कोकणी स्टाइल्ने नारळ घालून केलेली ना विदर्भ स्टाइल नॉन व्हेज स्टाइल तर्रीवाली, पांचट गोडसर काळे चणे घालून काहीतरी केलं होतं , सोलकढी पण चुकीची.. घट्ट पिठल्या सारखी काहीतरी अरेरे., जिलेबी डालड्याचा वास येणारी, हिरव्या रंगाचं पंचामृत ..
छोले म्हणजे लसणाची ग्रेव्ही नुसतीच.. काही मसाल्यांचा स्वादच नाही !
आमरस म्हणजे फ्रोजन डब्यातल्या चवीचा, प्रिझर्वेटिव ची आंबट चव वाला.. पुर्या संपलेल्या.. त्या साठी रांगा ताटकळलेल्या .. जेवण इन जनरल ब्रेकफास्ट ते डिनर फारच निराशा.. मोक्याचे पदार्थ. संपून जातात अर्ध्याहून अधिक लोकं उरले असताना , त्यामुळे जेवणात टॅको आणि ब्रेकफास्ट ला सिरिअल्स खावे लागतात जे फ्र्स्ट्रेटींग आहे.
तिन दिवसां पैकी अवडलेल्ले पदार्थ म्हणजे फक्त नॉन व्हेज आयटम्स, ते बहुदा राजभोग नी आउटसोर्स केले असावेत...
असो, पहिल्या दिवशीची अजुन एक घोर निराशा म्हणजे ' गोष्ट तशी गमतीची' , खूप आपेक्षा होत्या पण जनरेशन गॅप नावाखाली अजिबात रिलेट न करता येणारी नुसतीच डॉयलॉग बाजी.. काही कथानक नावाची भानग्डच नाही, अर्ध्यातून उठुन आले !शशांक केतकर लोकांना का इतका आवडतो माहित नाही , अनाहाएम च्या डिस्नीलँड ला जशा मिकि माउस बरोबर फोटो काढायला रांगा लागतात तशा अनाहाएम कन्व्हेन्शन सेंटरला बायकांच्या केतकर बरोबर फोटु साठी लागायच्या !
त्याची सिरियल पाहिली नाही पण नाटकात काही खास काम नाही.. लीना भागवत मस्तं काम करते पण काहीच स्टोरी नसलेलं नाटक एकटी ती तरी किती पेलणार !
असं वाटलं कि अशा प्रोग्रॅम ला काट मारून जेवणाचं बजेट वाढवा आणि लोकांना पोटभर जेवायला घाला !
(क्रमशः )
डीजे छान लिहीत आहेस ..
डीजे छान लिहीत आहेस ..
जेवणाच्या बाबतीत दीपांजली
जेवणाच्या बाबतीत दीपांजली म्हणतेय ते १००% खरं आहे. एकतर सगळ्या दिवशी जेवणांना उशीर झाला. आणि पदार्थ बर्यापैकी गंडलेले होते. तरी अगदी सगळ्यालाच नावं नाही ठेवणार. पहिल्या दिवशीची पुरणपोळी, दुसर्या दिवशी ब्रेकफास्टला दिलेल्या सांजोर्या आणि तिसर्या दिवशीचा दुधी हलवा मस्त होता. नॉनव्हेज आयटम्स खरंच चांगले होते विशेषतः प्रॉन्स बिर्याणी. मटण करी बरी होती पण जरा मिळमिळीत होती. फिश फ्राय चांगलं होतं पण लवकर संपलं. प्रॉन्स चटणी नावाचा प्रकार पण चांगला होता. पण पोळ्या नावाखाली रोज जे काही मिळत होतं ते काय होतं याचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. साबुदाणा खिचडीत भिजवलेल्या साबुदाण्यावर फोडणी ओतून दिली होती बहुतेक. कच्चे साबुदाणे जाणवत होते. त्यात निदान बटाट्यांचा आधार होता. स्मित बाकी पदार्थ दीपांजलीच्या पोस्ट मधे आले आहेतच. सोलकढी विशेष बकवास होती.
ओपनिंग सेरिमनीचे सुरूवातीचे काही डान्स पाहीले. ते चांगले झाले. त्यात दीपांजलीच्या ग्रूपचा परफॉर्मन्स होता. त्याशिवाय एक परफॉर्मन्स खास झाला ज्यात भरतनाट्यम, कथक (बहुधा) आणि लॅटिन डान्स असे तिन्ही एकत्र होते. प्रत्येक नृत्यप्रकारासाठी डान्सर्सची एकेक जोडी होती. आणि त्यांची जुगलबंदी चालू असतानाच एकीकडे एक आर्टीस्ट त्यांचा कलाविष्कार पेंट करत होती. ते नाच आणि ती पेंटिंग्ज अफलातून झाली.
सेरिमनीची भाषणं अधूनमधून गमतीदार झाली. स्मित सीएमच्या भाषणात दोन वेळा 'तारूण्याने मुसमुसलेला भारत देश' ऐकून खूप गंमत वाटली. बाकी सगळ्याच गमती इथे लिहीण्यासारख्या नाहीत. स्मित अजून कोणाच्यातरी भाषणात 'बनवा कशी' सोनं असा उल्लेख ऐकून तमाम पब्लिक वेड्यासारखं हसलं. पण तरीही एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण खूप छान आणि उस्फूर्त होतं.
अजून एक जाणवलेली आणि न आवडलेली गोष्ट म्हणजे मेन अरिना मधे होणार्या कार्यक्रमांसाठी सिनीअर सिटिझन्सचा विचार करायला हवा होता. दुसर्या आणि तिसर्या लेव्हलला कष्टाने चढून जाणारे वयस्क लोक पाहून त्रास होत होता. शिवाय या दोन्ही लेव्हल्सवर रेस्टरूम्स नसल्याने त्यासाठी पुन्हा खाली उतरून यावं लागत होतं. वयस्क लोकांची बसण्याची सोय पहिल्या लेव्हलवरच करायला हवी होती असं वाटलं.
शशांक केतकर = मिकी माउस ?!
शशांक केतकर = मिकी माउस ?! हाहा
जेवणाचे मेनू उत्सुकता म्हणून पाहिले होते. ते मस्त वाटले होते वाचायला.
र्म्द, तुझं आधीचं पोस्ट
र्म्द, तुझं आधीचं पोस्ट वाचलंच नाही ..
आता दोन्हीं वाचली .. छान लिहीते आहेस अनुभव ..
(पण प्रेत्येक बी एम् एम् चे वृत्तांत पाहून नवनविन कन्सर्न्स समोर येतात .. इव्हेन्ट मॅनेज करायला सरळ कोणा प्रोफेशनल बॉडी ला का बोलवत नाहीत?)
इव्हेन्ट मॅनेज करायला सरळ
इव्हेन्ट मॅनेज करायला सरळ कोणा प्रोफेशनल बॉडी ला का बोलवत नाहीत?) >>
कारण कार्यकर्त्यांनी हे सर्व करावे हे अपेक्षित असते. ह्यातून त्या त्या मंडळासाठी नवनवीन कार्यकर्ते मिळतात.
त्याला मिळालेल्या तथाकथित वागणुकीबद्दल अजून काही आले आहे का माहीत नाही. काहीतरी नक्की असेल >>
फारएंडा त्याला मिळालेल्या नाही, त्याने आम्हाला दिलेल्या त्रासाबद्दल होतं ते. दुसरी बाजू / तिसरी बाजू असते हे मान्य पण . .. असोच तिकडे जात नाही मी परत.
आमच्या वेळेस लोकांनी जेवणाबद्दल अजिबात तक्रार केली नव्हती, आमचा उद्देश क्लियर होता, आनंदी ठेवण्याच्या मार्ग पोटातूनच जातो. खायला प्यायला भरपूर द्या, मग लोकं तक्रार कमी करतात. फिदीफिदी
ओव्हरलॅप मुळे नेहमीच गोंधळ होतो.
वर कार्यक्रमाबद्दल तक्रार पण वाचली. जनरली इथून तिथे गेलेले बरेच पब्लिक रतिब म्हणून ते नाटक किंवा कार्यक्रम उरकतात असे मला अनेकदा जाणवले. स्पेशली विनोदी म्हणविले जाणारे क्रार्यक्रम हे अत्यंत बकवास असतात. ( मे बी त्या विनोदाची पातळी मला आवडत नाही, पीजे टाईप वाटते )
बी. एम. एम. २०१५ विषयी
बी. एम. एम. २०१५ विषयी उत्सुकता होतीच. तुमच्या लेखांमुळे आँखों देखा हाल आमच्यापर्यंत घरबसल्या पोहोचतोय. छान लिहिताय.