Submitted by दिनेश. on 6 July, 2015 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत:
प्रयोग !
आहार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आला सोमवार आल्या
आला सोमवार
आल्या दिनेश्दांच्या २ रेसिप्या
दिनेशदा, आपण मराठी लोक
दिनेशदा, आपण मराठी लोक गाजराची अशी भाजी करत नाही पण दाक्षिणात्य लोक खूपदा ही भाजी बनवतात. त्यांचे बघून आता मीही महिन्यातून एक दोन वेळा ही भाजी करतो. ह्या भाजीत हळद नसते. तुमची ही कृती जरा वेगळी वाटली.
हल्ली तुमच्या पाककृतींनी अनेकांना वेडे केले आहे. मला तर तुमच्यामुळे बेस्ट कुक व्हायची ईच्छा होते आहे.
मस्तच दिसताय भाजी.. मी सुद्धा
मस्तच दिसताय भाजी..
मी सुद्धा करते पण भाजी म्हणुन भाजीप्रमाणे करते. तिखट मिठ हळद मसाला सगळ काही.. नारळाच दुध नाही..
पण माझ्याकडे एकदम आवडीन खाल्ल्या जात नाही ही भाजी..
सांगा का ?
चव गोडसर लागते ना गाजरामुळे म्हणुन
छोटे गाजर आणुन ठेवले आणि पुर्ण खाण्यात नाही आले तर त्यांना छिलुन त्यांच्या चकत्या करायच्या आणि सोबर मटर चे दाणे.. हिवाळ्यातली भाजी..
त्यांना छिलुन >> सोलून
त्यांना छिलुन >> सोलून
दिनेश, तुम्ही आजतागायत
दिनेश, तुम्ही आजतागायत टाकलेल्या सर्व रेसिप्यात ही भाजी काही मला अपिल झाली नाही
अगदीच सो सो वाटली. सॉरी
धन्यवाद. दक्षे, डायेटसाठी (
धन्यवाद.
दक्षे, डायेटसाठी ( नारळ वगळला तर ) योग्य भाजी आहे ही. गाजर शक्यतो शिजवूनच खाल्लेले चांगले.
सध्या इथं बाजारात मिळणारी
सध्या इथं बाजारात मिळणारी केशरी गाजरं चवीला अतिशय बेचव आणि ज्येनांना चावायला महाकठीण अशी स्थिती आहे. त्यामुळे गाजरं शिजवून त्याचे भाजीसदृश प्रकार केले तरच ती खाल्ली जात आहेत. फोडणीला बडीशेप, तीळ वापरायची कल्पना आवडली. स्वाद व चव बदलेल जरा तेवढीच! मी ही भाजी केली तर गाजर व भिजवलेली मूगडाळ घालून करून बघेन. थोडं आलं, कढीपत्ता घातला तर बडीशेप व तिळाचा खमंग स्वाद कमी होईल का?
गाजरं चांगल्या चवीची मिळणं
गाजरं चांगल्या चवीची मिळणं म्हणजे फक्त नोव्हेंबर्/डिसेंबर नंतर, इतर वेळेस तीच ती बेचव :(.. मी गाजराची भाजी करते आणि लेक आवडीने खातो.. माझ्या एका मावसबहिणीच्या सा.बा. अशी करायच्या.. तेलावर जिरं, मोहोरी, हिंग, कढिपत्ता फोडणी, त्यात पांढरे तीळ टाकून ते तडतडले की हिरवी मिरची व मध्यम चिरलेला कांदा परतायचा, लालसर परतला कि गाजराच्या चकत्या टा़कून वाफेवर भाजी शिजवायची. चवीप्रमाणे मीठ, साखर हवी असल्यास चिमूट्भर, वरून खोवलेला नारळ व कोथिंबीर.. चांगली लागते.. आज खाल्ली की लेक दुसर्या दिवशीही डब्यात तीच दे असा हट्ट करतो.
अ.कु. बंगलोर ला नोकरीला असताना कॅंटीन च्या जेवणात भिजवलेल्या मुगाच्या डाळीची कोशिंबीर असायची त्यात किसलेलं गाजर टाकलेलं असायचं. चांगलं लागायचं.. भाजीतही डाळ चांगली लागायला हरकत नाही.
मस्त!! मसाले न वापरता नुसती
मस्त!! मसाले न वापरता नुसती हिरवी मिरची फोडणीत घालूनही छान होते ही भाजी. जरा कोथिंबीर सढळ हाताने आणि ओले खोबरे घालायचे.पण ते स्लायसर ने मस्त तुकडे झालेत. आता अशी करून पहाते.
गाजर भाजीसाठी कधी वापरला
गाजर भाजीसाठी कधी वापरला नाही. पण सॅलाड मधे ही शक्यतो एक वाफ काढुनच आवडतो. अशी भाजीकरुन बघेन.