चांगल्या पिकलेल्या, गोड असलेल्या पपईचे तुकडे २ मोठया वाट्या
पाच सहा भाकरी होतील एवढे ज्वारीचे पीठ
२ चमचे डाळीचे पीठ
१ चमचा ओव्याची पूड
२-३ चमचे तीळ
१-२ चमचे धने जीरे पूड
हव्या त्या प्रमाणात तिखट
मीठ
हळद
आवडत असल्यास बारीक चिरून कोथिंबीर
पपईच्या तुकड्यांचा मिक्सरमधे रस करून घ्या.
ज्वारीच्या पिठात सर्व जिन्नस मिसळून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. भिजवताना अजिबात पाणी घालायचे नाही.
भाकरीसारखेच पिठावर थापून घ्या.
भाजताना तव्यावर पीठ लावलेली बाजू येईल अशा पद्धतीनं टाका.
दोन्ही बाजूनं तेलाचा हात लावून भाजून घ्या.
खाताना बरोबर तूप, लोणी किंवा दही, ताक-दूध, दही-दूध घ्या. मिरचीचा ठेचा किंवा दाण्याची चटणी, जवसाची चटणी वगैरे बरोबर मस्त लागतो.
भाजताना पाणी लावायचे नाही. तसेच थेट आचेवर न भाजता तव्यावरच भाजायचे.
धपाटे २-३ दिवस (भारतातल्या हवामानात) सहज टिकतात. इथे ४ दिवस तरी टिकायला हरकत नाही. त्यामुळे जेष्ठ नागरीकांसाठी प्रवासाला जाताना खाण्याच्या पदार्थांसाठी उत्तम पर्याय आहे. लाल भोपळा घालूनही सुरेख होतात. पपई, भोपळा नसेल तर नुसता कच्चा मसाला, भरपूर तीळ, ओवा घालूनही छान होतात.
वेगळाच आहे प्रकार. मस्त
वेगळाच आहे प्रकार. मस्त वाटतोय. गोड-तिखट काँबो कसं लागत असेल? चाखून पाहायला हवं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो बेश्ट. सुरेख दिसतायत धपाटे.
आहा.. मस्तच..भाकरीसारखा पोपडा
आहा..
मस्तच..भाकरीसारखा पोपडा यायला नुसता गॅसवर भाजायचा का ?
अरे वा .. मस्तच ..
अरे वा .. मस्तच ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योकु, किंचीतसं गोड - तिखट
योकु,
किंचीतसं गोड - तिखट काँबो मस्त लागतं. शिवाय बरोबर चटण्या, ठेचा किंवा कुट्टा असेल तर गोड चव एवढी जाणवत नाही.
टिना,
थेट आचेवर भाजायचा नाही. तव्यावरच भाजायचा.
छान आहे पाकृ , आवडलीच.
छान आहे पाकृ , आवडलीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा!! खूप मस्त दिसताहेत
अरे वा!! खूप मस्त दिसताहेत धपाटे!
लाल भोपळ्याचीही प्युरी करून घ्यायची का?
छान आहे पाकृ
छान आहे पाकृ
पाक्रु व प्रचि आवडले.
पाक्रु व प्रचि आवडले. करणेबल...
छानच, रंग आणि चवही
छानच, रंग आणि चवही
काय सुंदर रंग आहे! करून बघेन
काय सुंदर रंग आहे! करून बघेन नक्कीच :).
अंजली प्लेट मस्त आहे.
अंजली प्लेट मस्त आहे. चपाती/पोळे/फुलके वगैरे पाकृ आमचं कंट्रिब्युशन हेच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मंजूडी, लाल भोपळा शिजवून
मंजूडी,
लाल भोपळा शिजवून त्याची प्युरी करून घ्यायची. घारग्यांसाठी करतो तशीच. पण आमच्यात भोपळ्याचे घारगे करत नाहीत, धपाटीच असतात ;).
मला पपईचे धपाटे माहित
मला पपईचे धपाटे माहित नव्हते. उसाचे धपाटे, पडवळाचे धपाटे तर कधी कधी नुसत्या हातानेच धपाटे मारलेले आहेत.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा... मस्त प्रकार
अरे वा... मस्त प्रकार ....
मुलगी पपई खात नाही. ह्या प्रकारात नक्की खाईल....
करण्यात येतिल....
मस्त दिसताहेत. तोंपासु.. पण
मस्त दिसताहेत. तोंपासु..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण मला मुळात भाकरीच धडपणे थापता येत नाही - त्यावर ती उचलून तव्यावर टाकायची... तेव्हा कितपत जमणार हा प्रश्न्च आहे
वरदा... थालिपिठा प्रमाणे करा.
वरदा...
थालिपिठा प्रमाणे करा. मलाही भाकरी येत नाहीत. पण धपाटे येतात.....
टिपबद्दल धन्यवाद, मोकीमी
टिपबद्दल धन्यवाद, मोकीमी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंजली, फोटो छान आहे.
अंजली, फोटो छान आहे.
ओक्के अंजली. घारग्यांपेक्षा
ओक्के अंजली.
घारग्यांपेक्षा हेच आवडेल जास्त. कारण घारगे गोड. कधीतरीच (पक्वान्न म्हणून) खायला छान. मी एरवी कच्चा भोपळा किसून कणीक घालून पराठे करते. आता ज्वारीचं पीठ वापरून हे धपाटे करून बघेन नक्की.
छान रेसिपी.. फोटो मधली प्लेट
छान रेसिपी.. फोटो मधली प्लेट खूप क्यूट आहे !!
छान पाककृती आणि सुंदर फोटो.
छान पाककृती आणि सुंदर फोटो.
अरे वा!! खूप मस्त दिसताहेत
अरे वा!! खूप मस्त दिसताहेत धपाटे!
रंग खुप छान दिसतोय.
रंग खुप छान दिसतोय.
काय झणझणती रंग दिसतो आहे तेही
काय झणझणती रंग दिसतो आहे तेही भाकरीचे पिठ वापरुण. करेनेबल आहे.
वेग़ळाच प्रकार.. छानच
वेग़ळाच प्रकार.. छानच
colour sunderch aalya..
colour sunderch aalya..
थालीपीठ घालणे सोयीचे होईल
थालीपीठ घालणे सोयीचे होईल
जाडी , आकार , रंग रूप काहीही आले तरी ते थालिपीठच होईल
पुढच्या शनिवारी तज्ञ मंडळींना
पुढच्या शनिवारी तज्ञ मंडळींना धपाटे घालणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा ! मस्त दिसत आहेत ! रंग
वा ! मस्त दिसत आहेत ! रंग सुरेख.
इथे आम्ही आणलप्ल्या ज्वारीच्या पिठाच्या भाकर्या अजिबात चांगल्या होत नाहीत. हा प्रकार करून बघितला पाहीजे.
छान. मी पण करून
छान. मी पण करून पाहीन
Pages