Submitted by हर्ट on 29 June, 2015 - 03:55
मी कोकणात कधीही गेलो नाही. इथे असे अनेक जण असतील ज्यांना कोकणाबद्दल काहीही माहिती नसेल. विदर्भातील लोकांना तर कोकण हे फक्त नावापुरतेच माहिती असते.
तर जनहो, ह्या धाग्याचा उद्देश इतका आहे की ज्यांनी कोकण पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांनी कोकण फिरावसं वाटणार्या माबोकरांना मदत करायची.
मी पुण्याहून कोकणात जाणार आहे. होम-स्टे घ्यायचा आहे. सोबत आई आणि पुतणी आहे. आठ दिवस वेळ आहे.
कोकणात कुठली गावे आहेत? किती जिल्हे आहेत? किती सागरतीर आहेत? कुठकुठले समुद्र आहेत? कुठल्या क्रमाने जायचे, कुठल्या क्रमाने परत यायचे? ही सगळी सगळी माहिती हवी आहे.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक सांगते कोकणात फिरायला
एक सांगते कोकणात फिरायला जायचे असेल तर स्वतःचे वाहन गरजेचे आहे. तर थोड्या दिवसात पुष्कळ काही पाहता येईल.
बी, छान धागा आहे. मलाही
बी, छान धागा आहे.
मलाही कोकणविषयी काहीच माहिती नाही. पण कुठे काय फिरायचे, काय बघायचे याची उत्सुकता फार आहे. या धाग्याच्या निमित्ताने मला आणि माझ्यासारख्या कोकणात कधीही न / क्वचित गेलेल्या अनेक लोकांना चांगली माहिती मिळू शकेल. धन्यवाद.
बी, मी कोकणातला असुन सुध्दा
बी, मी कोकणातला असुन सुध्दा आणि वर्षातून किमान पाचवेळा कोकणात जात असून सुध्दा पुर्ण कोकण पाहू शकलो नाही. म्हणूनच कोकणात नक्की कुठे कुठे फिरायचे आहे ते आधी पक्कं करावे लागेल. मनीमोहोर यांनी सांगितल्याप्रमाणे स्वत:चे वाहन असल्यास उत्तमच आणि तज्ञ वाहनचालकसुध्दा सोबतीला हवा. महाराष्ट्रामधील कोकणकिनारपट्टीमध्ये ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. साधारणतः कोकण म्हटल्यावर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचाच विचार केला जातो. तुम्हाला हव्या असणार्या माहितीबद्दल मायबोलीकर अजुन भर घालतीलच.
नरेशजी, धन्यवाद. आमचा
नरेशजी, धन्यवाद. आमचा विदर्भही खूप मोठा आहे.
समजा मी कोकणात दर एक वा दोन वर्षानी आठ आठ दिवस घालवण्याचे ठरवले तर एक एक भाग असा बघायचा म्हंटले तर त्या त्या भागाविषयी सविस्तर लिहिता येईल का कुणाला? धन्यवाद.
येवा कोकण आपलाच असा!
येवा कोकण आपलाच असा!
अरे व्वा.. खुप छान केल बी
अरे व्वा..
खुप छान केल बी धागा काढल्याबद्दल..
आम्ही पण आठ्वडाभराच प्लॅनिंग करत आहो.. स्कॉर्पिओ आहे नविन.. एकुण ७ जण आहोत जाणारे.. ड्राईव्ह दादा करणारे एकटाच त्याहिशोबाने थांबे घेत घेत प्रवास करायचा आहे.. गणपतीपुळे ला जसे काही घरी राहण्याची सोय आहे पैसे देउन तशी अजुन कुठ्ल्या कुठल्या ठिकाणी आहे कोकणात ? सोबत दादाच कार्टून ६ महिने + आणि ताईची मुलगी ३ वर्षे वयाची अशी चिल्लर पार्टी पण असणारे..
बी, कोक्णांत लहानाची मोठी
बी, कोक्णांत लहानाची मोठी होऊनदेखील मी अख्खा कोकण फिरलअय असे म्हणणार नाही. कोकण केवळ एरियावाईज मोठं नाहीये, फिरण्यासाठी गावागावात अनेक ठिकाणं आहेत, प्रत्येक गावात तर जाणं शक्य नाही.
तुला फिरण्यासाठी काही महत्त्वांच्या स्थळांची यादी इथं देऊ शकेन.
कोक्णात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे तीन जिल्हे आहेत. (टेक्निकली ठाणे आणि मुंबई पण कोक्णातच पण टूरीस्ट म्हणून हे तीन जिल्हे महत्त्वाचे. तिन्ही जिल्ह्यामध्ये सुंदर बीचेस आहेत. मंदिरं आहेत. रायगडमध्ये अनेक किल्ले आहेत. सिंधुदुर्गामध्ये आंबोली आणि जंगल स्टे आहेत. रत्नागिरीमध्ये बरंच काही आहे. तुला नक्की काय काय फिरायचे आहे ते ठरवून घे. स्व्तःचे वाहन ठरवून घे- (यासाठी गरज भासल्यास मला संपर्क कर!) . कोकणातली बरीच ठिकाणे एकमेकांपासून लांब आहेत आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या वेळा आणि आपल्या फिरण्याच्या वेळा जुळतीलच असे नाही त्यामुळे स्वतःचे वाहन उत्तम.. शिवाय कोकणातला कुठलाही रस्ता सरळ नसतो त्यामुळे वीसेक किमीला देखील जास्त वेळ लागू शकतो.
कोक्णांत फिरताना टिपिकल टूरीस्टसारखे "चला, आता इथं बसलं की तिथं उतरायचं पुढचा स्पॉट बघाय्ला उतरायचं" असं फिरून उपयोगाचं नाही. कोकणातला प्रत्येक रस्ता हाच एक मेजर टूरीस्ट पॉइन्ट आहे. इथले बरेच टूरीस्ट स्पॉट्स काही भव्यदिव्य वगैरे अजिबात नाहीत. मंदिरं तर लहानशीच आणि घरासारखीच असतात. इथे देवळांतून पैशासाठी फारसे तंगवत नाहीत. जेवणाचेही फारसे हाल कुठे होत नाहीत. त्यामुळे मांसाहारी असाल तर माश्यांची चैन असतेच पण शाकाहारी असाल तरीही बर्याच टूरीस्ट ठिकाणी व्यवस्थित सोय होते. पण रस्तोरस्ती हॉटेल्स असतील असे नाही. त्यामुळे जेवण्याच्या वेळेमध्ये जेवण करून घेणे आथवा बांधून घेणे उत्तम.
रस्ते घाटाघाटाचे असल्याने एरवी गाडी न लागणार्या काही लोकांना गाडी लागताना पाहिलंय, त्यामुळे खबरदारी म्हणून औषधे घेऊनच ठेवावीत. कोकणाचे हवामान दमट असल्यानं घाम प्रचंड येतो, त्यामुळे थकवा आण नॉशिया लवकर येतो, भरपूर पाणी पित राहणे, फळं खाणे आणि पोटभर जेवणे हे मस्ट. घामामुळे कपडे जास्त चिकट होतात, म्हणून एक दोन एक्स्ट्रा जोड सोबत असू द्यावेत; ऊनासाठी टोपी छत्र्या वगैरे हव्यातच. पावसाळ्यात फिरणार असालतर छत्र्या ठेवा आणि सरळ रेनकोट घालून फिरा.
रायगडमध्ये: हरिहरेश्वर, श्रीवर्धन, रायगड किल्ला, किहिम, अलिबाग, दिवेआगार, मुरूड जंजिरा, (अजूनही बरंच काही)
रत्नागिरी: दापोली- हे ठिकाण अजिबात चुकवू नये असे आहे. हे गाव म्हणजे भारतरत्नांचे आगार आहे., दाभोळ, गुहागर, गणपतीपुळे, पावस, थिबा पॅलेस, टिळक जन्मभूमी, जयगड, पूर्णगड, भगवती किल्ला, मार्लेश्वर, लक्ष्मीकेशव मंदिर. संगमेश्वर. भाट्ये सुरूबन. (अजूनही बरंच काही)
सिंधुदुर्गः तारकर्ले, सावंतवाडी, देवगड, सिंधुदुर्ग किल्ला, कणकवली. विजयदुर्ग, आंबोली, दोडामार्ग जंगल्स. (अजूनही बरंच काही)
गणपतीपुळे ला जसे काही घरी
गणपतीपुळे ला जसे काही घरी राहण्याची सोय आहे पैसे देउन तशी अजुन कुठ्ल्या कुठल्या ठिकाणी आहे कोकणात ? >>> पुळ्याला बरीच हॉटेल्स, रीझॉर्ट आहेत. एम टी डीसीचे हॉटेल आहे. पण तिथे घरीच राहायचे असल्यास मी संपर्क नंबर देऊ शकेन. पण तशी सोय फार कंफर्टेबल होत नाही असं काही प्रवाश्यांचं म्हणणं आहे.
बी, ट्रेन नं. 22150 PUNE
बी, ट्रेन नं. 22150 PUNE ERS SUP EX ही रत्नागिरी / सावंतवाडी साठी चालेल. ट्रेन ने जावून नंतर तेथे कार बुक करण सोयीस्कर आहे. घाटामधून कार / बसचा प्रवास आवडत असेल आणि १०-१२ तास किंवा त्याहून जास्त तास बसायची सवय असेल तरच स्वतःच्या गाडीचा विचार करा.
विवेक हॉटॅल रत्नागिरीसाठी भ्रमर ह्यांनी सजेस्ट केल होत आणि हॉटेलकडून कारची सोय होते. किंवा अगोदर सावंतवाडी (आंबोली घाट - सध्या सिझन आहे, मोती तलाव, सावंतवाडी पॅलेस) तिथून पुढे मालवण (किल्ल्यात पावसाळा असल्यामूळे जाता येणार नाही.) - देवबाग- तारर्कली बघत नंतर रत्नागिरीला जाता येईल.
होम स्टे साठी नंतर लिहिते.
रत्नागिरी: दापोली- हे ठिकाण
रत्नागिरी: दापोली- हे ठिकाण अजिबात चुकवू नये असे आहे.......>>>>>>>>>> आणि बरीच रीसॉर्ट आहेत. मुरुड,कर्दे,लाडघर बीच रीसॉर्टेस्, हर्णे किल्ला, इइइ.
नंदिनी बरीच छान माहिती दिली
नंदिनी बरीच छान माहिती दिली आहेस.
नंदीनी, इतकी लांबलचक पोष्ट
नंदीनी, इतकी लांबलचक पोष्ट लिहून जी माहिती दिलीस ती खूपच छान.
आरती धन्यवाद.
मी वेंगुरले बद्दल ऐकले आहे ते कुठे आहे.
आणि माळशेज घाट, नाणे घाट हेही वाचले आहे ते कुठे आहे.
अस्सल कोकणी शाकाहारी जेवण हवे असेल तर कुठे मिळेल. जसे की उकडीचे मोदक, फणसाच्या पोळ्या, काजुची उसळ, आमसुलाची कढी. हे सगळे काही मला खायचे आहे.
नंदिनी, मस्त महिती दिली आहेस.
नंदिनी, मस्त महिती दिली आहेस.
अस्सल कोकणी शाकाहारी जेवण हवे
अस्सल कोकणी शाकाहारी जेवण हवे असेल तर कुठे मिळेल. जसे की उकडीचे मोदक, फणसाच्या पोळ्या, काजुची उसळ, आमसुलाची कढी. हे सगळे काही मला खायचे आहे.<<< काजू उसळ आता मिळणं मुश्किल आहे. बाकी, मोदक वगैरे बर्याच हॉटेलांमध्ये मिळत. सोलकढी तर असतेच. रत्नागिरीत कधी येशील ते कळव, तुला हॉटेल्सचे आणि खाणावळींचे पत्ते देऊन ठेवते. फणसपोळी, आंबापोळी वगैरे सर्व विकतच मिळतं वर्षभरात कधीही खाऊ शकशील.
वॉव. तोपासू अगदी. धन्यवाद.
वॉव. तोपासू अगदी. धन्यवाद.
८ दिवसांत फक्त सिंधुदुर्ग
८ दिवसांत फक्त सिंधुदुर्ग फिरुन ये... बाकीचा कोकण पुढल्या वेळी.. पुण्या वरुन जाणार असशिल तर खालिल प्रमाणे प्लॅन करु शकतोस.
१. कोल्हापुर - निपाणी मार्गे अंबोलीला हॉल्ट - हॉटेल्सची सोय आहे.
२. अंबोली दर्शन करुन आणि सिंधुदुर्ग शहरात उतर... चांगली हॉटेल्स आहेत... नेट वर चेक कर
३. सिंधुदुर्गात थिबा पॅलेस, मोती तलाव पाहुन वेंगुर्ला जा.. होम स्टे किंवा हॉटेलची माहिती नेट वर मिळेल.
४. वेंगुर्ला वरुन देवबागला जा. तारकर्लीला खुप होम स्टे आणि हॉटेल्स आहेत. (जमल्यास सिंधुदुर्ग किल्ल्या वर जाऊन ये)
५. सिंधुदुर्ग वरुन निघुन विजयदुर्गला जा. वाटेत धामापुरचा तलाव, कुणकेश्वर बरिच ठिकाणं आहेत.
६. विजयदुर्ग वरुन गणपती पुळेला जा... पुळ्यात रहाण्याची सोय चांगली आहे.
७. गणपती पुळे वरुन रत्नागिरी, हातखांबा, साखर्पा करत कराड मार्गे पुण्याला ये.
८. बफर डे असुदे.
वेंगुर्ला, देवबाग, तारकर्ली, कुणकेश्वर, विजयदुर्ग, गणपती पुळे ही सगळी ठिकाणं समुद्र किनारी आहेत.
णि माळशेज घाट, नाणे घाट हेही
णि माळशेज घाट, नाणे घाट हेही वाचले आहे ते कुठे आहे >> कल्याण - जुन्नर रस्त्यावर आहेत.
मुरुड,कर्दे,लाडघर बीच रीसॉर्टेस्, हर्णे किल्ला, इइइ. >>> आंजार्ले, तामसतिर्थ, परशुराम भुमी, केशवराज मंदिर
मुरुडच्या किनार्याची चौपाटी झाली आहे.
छान माहिती
छान माहिती इंद्रधनुष्या!!!!
मला जंजीरा किल्ला बघायचा आहे आणि माझ्यामते हा जलदुर्ग असून तो सिंधदुर्गमधे येतो. चुभुदेघे.
जंजिरा म्हणजे पाण्यातला
जंजिरा म्हणजे पाण्यातला किल्ला...
सिंधुदुर्ग किल्ला मालवण बाजारपेठे जवळ आहे. पावसाळ्यात बोटीने जाता येते का ते चेक कराव लागेल.
बी, जंजीरा किल्ला मुरूडजवळ
बी, जंजीरा किल्ला मुरूडजवळ आहे हे मुरूड म्हणजे रायगड जिल्हातील मुरूड. तिथे जाण्याकरीता पुण्याहून ताम्हाणे घाटामार्गे माणगावला उतरावे लागेल आणि तिथून रोहा-मुरूड रस्त्याने मुरूडला जावे लागेल. तिथूनच पुढे अलिबागला जाता येईल. पण इंद्रधनुष्य म्हणताहेत त्याप्रमाणे तु आधी सिंधुदुर्ग जिल्हाच फिर.
नंदिनी, आरती, इंद्रधनुष्य
नंदिनी, आरती, इंद्रधनुष्य मस्त माहिती ..
नंदिनी मला म्हणायचय कि पुळे सारख्याच ठिकाणी घरी वगैरे राहायची सोय आहे का.. इतर ठिकाणी नाही का ?
बी, मुरुड जंजिरा एकदम फर्स्ट
बी, मुरुड जंजिरा एकदम फर्स्ट क्लास आहे. कधी तरी एकदा बघुन घ्याच. समुद्रात असल्याने तुम्हाला अगदी नाविन्य वाटेल. बोटीतून नेतात व आत पूर्ण फिरवून आणतात. तिथे जवळ एक निझामाची कोठी आहे आत जाता येत नाही पण बाहेरूनही छान दिसते.
मुरुडात गोल्डन बीच रिझॉर्ट आहे तिथे राहता येइल. गावात एक टेकडीवर छानसे दत्त मंदीर आहे व जवळ भैरवनाथाचे मंदिर आहे. शांत जागा आहे.
मुरुड जंजिरा एकदम फर्स्ट
मुरुड जंजिरा एकदम फर्स्ट क्लास आहे. > > अमा, पण पावसाळ्यात जाता येईल किल्ल्यावर ?
पुळे सारख्याच ठिकाणी घरी
पुळे सारख्याच ठिकाणी घरी वगैरे राहायची सोय आहे का.. इतर ठिकाणी नाही का ?>>> अगं इतर ठिकाणी म्हणजे नक्क्की कुठं अभिप्रेत आहे ते सांग ना. बर्याच ठिकाणीबीच रीझॉर्ट हॉलिडे रीझोर्ट आहेत. होम स्टे पण आहेत. पण कुठे मुक्काम करणार आहात त्यानुसार पर्याय सांगता येतील.
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>> इंद्रा, एडिट कर
मला जंजीरा किल्ला बघायचा आहे आणि माझ्यामते हा जलदुर्ग असून तो सिंधदुर्गमधे येतो>>> जंजीरा मुरूड, रायगड. सिंधुदुर्ग हाच एक जलदुर्ग आहे -- म्हणून ते जिल्ह्याचे नाव आहे. जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण ओरोस (चुभ्देघे )
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>>
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>> इंद्रा, एडिट कर राग>>> मी अगदी आवरलं होतं
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>>
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>> इंद्रा, एडिट कर राग>>> मी अगदी आवरलं होतं फिदीफिदी>>> अगदी अगदी.
नंदिनी, थिबा पॅलेस रत्नागिरी शहरात आहे हे पण लिहून टाकायचेस ना.:)
बी, जर आठच दिवसांसाठी जात
बी, जर आठच दिवसांसाठी जात असाल तर त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर तालुका कव्हर करा.
दापोलीत पुढील गावे मस्ट सी आहेत:
१. लाडघर बीच- तामसतीर्थ असेही म्हणतात
२. मुरूड आणि कर्दे बीच - रिसॉर्ट आणि वॉटर स्पोर्ट्स साठी. मुरूड ला समुद्रात नेऊन डॉल्फीन्स दाखवतात, पण पावसाळ्यामुळे कदाचित बंद असू शकते.
३. आसूद - केशवराज मंदीर
४. आंजर्ले - बीच + कड्यावरचा गणपती
५. आंजर्ले - आडे रस्ता - हा पूर्ण रस्ता समुद्राला समांतर जातो. बीच वर कुठेही थांबा.
६. केळशी - बीच, महालक्ष्मी मंदीर, त्सुनामी मुळे तयार झालेली वाळूची टेकडी, शिवाजी महाराजांचे गुरू बाबा याकूत यांच दर्गा (खालचे पूर्ण गाव आणि समुद्राचा सुंदर व्ह्यू दिसतो.)
वरील प्रत्येक गावात होम स्टे भरपूर आहेत आणि पावसाळा स्लॅक सीझन असल्याने पटकन सोय होईल.
रिसॉर्ट हवे असेल तर शक्यतो कर्दे किंवा मुरूड ला पहा.
नंतर दाभोळ मधून जेट्टी ने गुहागर ला जाता येते. गुहागर मध्ये:
१. गुहागर - बीच, व्याडेश्वर मन्दीर
२. वेळणेश्वर - बीच, बामणघळ (ही घळ समुद्राजवळच डोंगर कडा तुटून झाली आहे, भरतीच्या वेळी त्यात पाणी येउन ऊंच कारंजी उडतात)
३. हेदवी - बीच आणि दशभूजा गणेश मंदीर
किंवा गुहागर ऐवजी गणपतीपुळे आणि रत्नागिरी असे दोन दिवस सुद्धा करू शकता. (डिटेल्स नंदिनीने दिलेच आहेत)
पुण्याहून जाण्या येण्यात २ दिवस, दापोली ४ दिवस आणि गुहागर/ गणपतीपुळे आणि रत्नागिरी २ दिवस असं प्लॅनिंग करू शकता.
). पावसाळा तसेच अरुंद आणि घाट रस्ते असल्यामुळे ड्रायव्हर चांगला हवाच!! हॅप्पी जर्नी 
शक्यतो स्वतःचे वाहन घेउन जावे (कारण ही गावे खूप रिमोट एरियात आहेत जिथे फक्त S T बस आणि टमटम जातात. पावसाळी S T तच तुम्हाला धबधब्याची मजा मिळेल
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>>
सिंधुदुर्गात थिबा पॅलेस>>> इंद्रा, एडिट कर राग >> माझ पण तसच झालेल.. विचार केला यार मी तर ते रत्नागिरीत पाहिलं होत आता सिंदुदुर्गात कस्काय गेल ..
अगं म्हणजे नंदिनी तु आणि इंद्रधनुष्य ने दिलेल्या यादित.. मी स्वतः गणपतीपुळे आणि रत्नागिरीमधले इतर ठिकाण बघीतली आहेत.. त्यावेळी आम्ही रात्री पुण्यावरुन निघालो.. सकाळी पुळे पोहचलो आणि रत्नागिरी फिरलो. रात्री तिथच मुक्काम करुन मग दुसर्या दिवशी सकाळी हरिहरेश्वर ला भेट देऊन पुणे परत असा तो टुर होता.. पण आठवड्याभराचा प्रवास म्हटल्यावर निदान ६ ते ७ दिवस मुक्काम पडेल ना.. त्या हिशोबानी ठिकाण कुठले ते विचारतेय.
सिंधुदुर्ग शहरात मोती तलाव???
सिंधुदुर्ग शहरात मोती तलाव??? इंद्रा?????
टीना, गणपतीपुळे आणि रत्नागिरी
टीना, गणपतीपुळे आणि रत्नागिरी झालं असेल तर मग दापोलीला जा.. शांत आणि एकांत असलेली बीचेस आहेत. बर्याचदा बीच वर आपण एकटेच असतो, त्यामुळे एकदम पर्सनल बीच सारखं रिलॅक्स फील होतं.
Pages