Submitted by mansmi18 on 22 June, 2015 - 09:36
नमस्कार,
नुकतच कळले की US Persons (PIO/OCI/Green card holders too) ना भारतीय म्युच्युअल फंडात गुंतवणुक करता येत नाही. (फ्रँकलिन, बिर्ला, आयसीआयसीआय आणि जवळजवळ सगळेच.)
कुठले फंड हाउस allow करते का?
कृपया परत आलेल्या US citizens ना विनंती.. आपले अनुभव शेअर कराल का?
धन्यवाद.
(Per regulation S of securities Act 1933, definition of US person does not include - US citizen not living in US.. can this help?)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खालच्या लिंकनुसार OCI Card
खालच्या लिंकनुसार OCI Card धारकाला गुंतकवणुकीच्या बाबतीत शेतजमीन वगळता सामान्य भारतीय नागरिकासारखेच अधिकार असतात.
https://passport.gov.in/oci/
माधव, आज मी फ्रँकलिन टेंपलटन
माधव,
आज मी फ्रँकलिन टेंपलटन मधे गेलो असता त्यांनी मला सांगितले की यु.एस सिटिझन ना ते फंड्स सेल करणार नाहीत.
माझ्या माहितीप्रमाणे OCI Card
माझ्या माहितीप्रमाणे OCI Card धारक हा NRI सारखाच असतो. वरच्या लिंकवर पण Parity with NRIs असे स्पष्ट म्हटले आहे. आणि NRIs ना म्यु.फंडात गुंतवणूक करता येते.
खाली पण तसेच काहीसे म्हटले आहे.
http://www.hdfcfund.com/nri/
>>आज मी फ्रँकलिन टेंपलटन मधे
>>आज मी फ्रँकलिन टेंपलटन मधे गेलो असता त्यांनी मला सांगितले की यु.एस सिटिझन ना ते फंड्स सेल करणार नाहीत.<<
माहिती बरोबर आहे. काहि फंड्स एनआरआय्ज ना गुंतवणुकिसाठी उपलब्ध नाहित...
राज, कुठले फंड हाउसेस allow
राज,
कुठले फंड हाउसेस allow करतात माहित आहे का?
बिर्ला सन लाइफ, प्रॅमरिका,
बिर्ला सन लाइफ, प्रॅमरिका, रेलगेर इन्वेस्को - या प्रत्येकाचे इन्वेस्टमेंट आॅब्जेक्टिव नुसार वेगळे फंड्स आहेत.
हि लिस्ट एक्झाॅस्टिव नाहि, अजुन बरेच असतील...
हे पहा :
हे पहा :![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
http://ankur-kapur.com/can-a-us-based-nri-invest-in-indiअ
फोन करा, वर दिलेल्या
फोन करा, वर दिलेल्या कंपन्यांना. केवायसी/ॲप्लीकेशन फाॅर्म्स मध्ये एसएसएन घेतात, आयआरएस रिपोर्टिंग साठी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोण आहे हा अंकुर कपुर?
मोतीलाल ओस्वाल मधे काम
मोतीलाल ओस्वाल मधे काम झाले.
Per regulation S of securities Act 1933, a U.S person is the one "resident of U.S". not a US citizen.
एनआरआय आणि यूएस पर्सन यामध्ये
एनआरआय आणि यूएस पर्सन यामध्ये फरक आहे. नॉन यूस पर्सन सुद्धा एनाराय असू शकतो. यूसमधील वगळता इतर एनआरआयना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला परवानगी आहे. यूएस पर्सनना परवानगी का नाही यामागचं कारण म्हणजे अमेरिकन गर्वमेंटला जगभरातील सगळ्या फायनान्शियल संस्थांनी त्यांचे टॅक्स एजंट असल्यासारखं काम करण्याची अपेक्षा आहे. फॉरिन अकाऊंट टॅक्स कंप्लायन्स अॅक्ट (FATCA) बद्दल थोडी माहिती शोधल्यास अमेरिकन एनरायचे पैसे भारतातील म्युच्युअल फंडात का स्वीकारत नाही हे कळेल.
जरी कुठली म्युच्युअल फंड कंपनी अर्ज स्वीकारत असेल तरीही अमेरिकन माणसाने अमेरिकेबाहेरील म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करु नये व पैसा अमेरिकेन कंपन्यांकडेच राहील याची काळजी अमेरिकन सरकारने घेतली आहे. अमेरिकेबाहेरील म्युच्युअल फंड कंपन्या या पॅसिव फॉरिन इन्वेस्टमेन्ट कंपनी समजल्या जातात व त्यामधील गुंतवणूक ही फॉर्म 8621 मध्ये दाखवावी लागते. त्यात तुम्हाला अन-रियलाईज्ड गेन्स (मार्क टू मार्केट) वर टॅक्स भरावा लागतो. तसा कर भरला नाही तर कालांतराने चुकवलेल्या करावर दंड व कमाईपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.
ही माहिती जनरल नॉलेजपुरती मला माहिती आहे. तुमच्या सीएला वगैरे विचारुन निर्णय घ्या.
अधिक दुवे
http://thunfinancial.com/why-americans-should-never-ever-own-shares-in-a...
https://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=26313
https://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=26266
अतिशहाणा , धन्यवाद. सध्या
अतिशहाणा , धन्यवाद.
सध्या Sundaram Mutual and L&T हे दोनच यु एस पर्सन्स कडुन गुंतवणुक स्वीकारत आहेत.
जान २०१४ मधे आलेल्या नियमानुसार de minimis exception प्रमाणे $५०००० पेक्षा कमी गुंतवणुक असेल तर ८६२१ भरावा लागणार नाही. फक्त गेन्स झाले असेल तर ते दाखवावे लागेल आणि त्यावर तुमच्या इन्कम स्लॅब प्रमाणे टॅक्स पडेल.