साहित्य :
३ मोठे बीटरूट्स (उकडवलेले)
२ मोठे बटाटे (उकडवलेले) (मला बटाटा जरा जास्तच आवडतो म्हणून आईच्या नकळत एक छोटूला बेबी बटाटा add होतोच :G)
१ मोठा कांदा बाsssरीक चिरलेला
(आधी कांद्याच्या थोड्या गोल पातळ चकत्या कापून घ्या, मग उरलेला कांदा चिरून घ्या)
१ वाटी बेसन
१/२ वाटी कॉर्नफ्लॉर
१/२ छोटा चमचा आलं-लसूण पेस्ट
१/२ छोटा चमचा लाल तिखट
१/२ छोटा चमचा गरम मसाला
१/२ छोटा चमचा धणे-जिरेपूड
२ हिरव्या मिरच्या बाsssरीक चिरलेल्या
बाssssरीक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीनुसार.
कृती :
१. आधी उकडलेला बीट किसून घ्या व किस हाताने दाबून त्यातले पाणी काढून घ्या.
उकडलेले बटाटेही किसून घ्या.
(या बीटाच्या पाण्यात थोडे मीठ टाकून वर सांगितल्याप्रमाणे कांद्याच्या चकत्या बूडवून
ठेवा).
२. मग त्यात आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, गरम मसाला, धणे-जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, बेसन, कॉर्नफ्लॉर घेउन व्यवस्थित एकजीव करून घ्या. मिश्रण थोडे पातळ झाल्यास अंदाजाप्रमाणे बेसनाचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉर add करा. मस्तपैकू लालेलाल मिश्रण तयार होईल.
३. नंतर या मिश्रणाचे आवडीच्या आकारात कटलेटस् बनवून घ्या. हे कटलेटस् तळून घ्या किंवा हेल्थ कॉन्शियस असाल तर तव्यावर थोडे थोडे तेल घालून वर झाकण ठेवून परतून घेवू शकता.
४. मग कटलेटस् प्लेटमधे काढून घ्या, बीटाच्या पाण्यात बुडवलेल्या कांद्याच्या चकत्या एव्हाना रेडीश किंवा पिंकिश झालेल्या असतील, या चकत्या कटल्टस् वर पसरवून गार्निशिंग करून घ्या व पुदीन्याची चटनी किंवा टोमॅटो सॉस किंवा खोब-याच्या चटनीबरोबर सर्व्ह करा. झटपट आणि हेल्दी बीटरूट कटलेस् फस्त करण्यासाठी तयार.
(तुम्हाला हवे असल्यास काकडी, गाजर, शिमला मिर्ची देखील add करू शकता पण नुसत्याच किसून व बाsssरीक चिरून घ्या.)
अरे वा, नव्या डी, स्वागत
अरे वा, नव्या डी, स्वागत तुमचे. रेसीपी पण छान आहे. मी काही बीट खात नाही. गाजर बीन्स घालून करेन. रताळ्या सारख्या लाल श्रीला द्यायला मस्त आहेत ही.
thanku prayatn navin
thanku :p prayatn navin recipee shiknyacha Bit n khanarehi khatil Bit ashi ahe hi recipee :p