१ बॉक्स फ्रोजन पालक, १ कॅन (१४ oz ) आर्टिचोक हार्ट्स, लसूण बारीक तुकडे करून, बेसीलची पानं- बारीक चिरून, १/४ कप प्रत्येकी- रोमानो चीज, श्रेडेड मोझर्रेल्ला आणि पार्मेजान चीज, २/३ कप सावर क्रीम, ८ oz क्रिम चीज, १/३ कप मेयोनीज, ऑऑ- परतण्यापुरतं, सुकी लाल मिरची- चवीपुरती. मीठ.
ऑलिव्ह ऑईलमध्ये लसूण परतून त्यावर लाल मिरची परतावी. त्यावर थॉ केलेला फ्रोजन पालक आणि आर्टिचोक घालून नीट मिक्स करावं. हे थोडं शिजत असताना एकीकडे बेकींग डिशमध्ये बाकी सगळी चीज, आणि इतर जिन्नस मिक्स करून घ्यावेत आणि त्यात हे पालकाचं मिश्रण घालून, मीठ वगैरे घालून पुन्हा मिक्स करावं. तत्पूर्वी अवन ३७५ फॅ. ला प्रीहीट करत ठेवावा. ही बेकींग डिश त्यात टाकून साधारण १५,२० मिनिटं किंवा वर किंचीत ब्राऊन कलर येईस्तोवर बेक करावं.
वर्षूनीलच्या रेसिपीमुळे ही डीप हल्लीच केल्याचं लक्षात आलं म्हणून इथे रेसिपी टाकली.
गरम पीटा ब्रेड किंवा गार्लिक नानबरोबर स्टार्टर म्हणून सर्व करायला मस्त प्रकार आहे.
हा फोटो जुना आहे पण सध्या हाच
हा फोटो जुना आहे पण सध्या हाच एकमेव आहे.
अरे वा .. ह्यात हालापिनो ही
अरे वा .. ह्यात हालापिनो ही छान लागेल का बेसिल वगळून?
मेयो पण घालतात का बेक करताना? (अशासाठी विचारतेय कारण मेयो डिसैंटिग्रेट होत नाही का बेक वगैरे केलं की .. की इतर पदार्थांबरोबर त्याचं जे काय डिसइंटिग्रेशन व्हायचं ते होऊन परत नविन इंटिग्रेशन होतं?)
अरे देवा, हे इंटिग्रेशन/
अरे देवा, हे इंटिग्रेशन/ डिसैटिग्रेशन बद्दल कल्पना नाही. मेयो घालायचं सगळी चीज वगैरे मिक्स करताना आणि बेकही करायचं. १/३ कपच आहे, फार नाही. नको असल्यास स्कीप करू शकतेस.
घाल की हालापिनो. वाईट कशाला लागेल? ते ऑऑवर परतणं, लाल मिरची वगैरे माझी अॅडिशन आहे.
ओके .. मला असं वाटत होतं की
हे डिप जरा वॉर्मच मस्त लागत ,
हे डिप जरा वॉर्मच मस्त लागत , फुरसतिने करुन बघेल.
अरे हे पाहिलेच
अरे हे पाहिलेच नव्हते!मस्स्स्स्त!!
आह्हा.. माझं महा आवडतं डिप..
आह्हा.. माझं महा आवडतं डिप.. तू केलेले फेरबदल मस्त आहेत...
सुपर लाईक!!!
मस्त आहे. सशल, मेयो फाटेल
मस्त आहे.
सशल, मेयो फाटेल असं म्हणायचे आहे का तुला?