अंडा घोटाला

Submitted by वर्षू. on 18 June, 2015 - 03:57
anda ghotala
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी, पावभर मटन खीमा, दोन टी स्पून आलं लसूण पेस्ट, पाव चमचा टी स्पून लवंग दालचिनी पावडर, २ लहान कांदे,दोन हिरव्या मिर्च्या, कोथिंबीर, १ टी स्पून कसूरी मेथी, ओल्या लसणाची पात ( ऑप्शनल), ८,१० लसूण कळ्या, २ टीस्पून प्रत्येकी गरम मसाला, काळी मिरी पावडर, धना पावडर, तिखट.
दोन टॉमेटो, हळद, मीठ , एक टी स्पून तेल.

क्रमवार पाककृती: 

तीन पैकी दोन अंडी उकडून , सोलून , किसून घ्या. तिसरं अंड हाफ फ्राय करून ठेवा.
खीमा+ आलंलसूण पेस्ट + लवंग दालचिनी पावडर, कुकर मधे भांड्यात वाफवून घ्या. सुटलेलं पाणी पूर्ण आटवताना खीमा , फ्राय करून घ्या.
हिरव्या मिर्च्या , लसणाची पात आणी कोथिंबीर एकत्र बारीक चिरून ठेवा.
कांदे बारीक चिरून घ्या.
लसूण बारीक चिरून घ्या.
टोमॅटो प्यूरी करून घ्या.

पॅन मधे एक टी स्पून तेल गरम करून , चिरलेला लसूण लाल होईस्तो परता.
त्यावर खीमा घालून थोडा वेळ परता.
आता चिरलेला कांदा घालून तो मऊ होईस्तो परता.
सगळे मसाले, हळद्,मीठ, कसुरी मेथी, कोथिंबीर मिर्ची , घालून जरा परतून टोमॅटो प्यूरी घालून
टोमॅटो चा कच्चट वास जाईस्तो परता.
आता किसलेली अंडी मिसळा, हलक्या हाताने परतताना , थोडे पाणी घाला. मिश्रण दाटसर झालं कि हाफ फ्राय
केलेलं अंड हलक्या हाताने मिसळून, पावा बरोबर सर्व करा.

ठैरो.. अभी घोटाला करना बाकी है

घोटाला केल्याव्र्र

वाढणी/प्रमाण: 
३ जणांकरता पोटभरीचा संडे ब्रंच होईल.
अधिक टिपा: 

मूळ रेसिपीत पॅन मधे भरपूर तेलात(पुर्‍या तळता येतीलश्या प्रमाणात ) हाफ फ्राय बनवलेले आहे.. आणी उरलेल्या तेलात बाकीचे पदार्थ परतले आहेत.
मी हाफ फ्राय मायक्रो मधे बिना तेला/ बटर चे केलंय.पाव ही साधेच घेतले.
चवीत विशेष फरक नाही पडला मात्र कॅलरीज मधे भरपूर पडला असेल..

माहितीचा स्रोत: 
यो रॉक्,मिसेस रॉक्स,'स्मि" आणी नेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेष्ट टायटल आणि कृती. फोटोपण मस्त.

वेळ मिळाला की घोटाळा करणारच Happy

माटुंग्याला कूलारमध्ये यासदृश काही खाल्लं होतं मागे तेही मस्तच होतं

आशु. ये ये... पाव नाहीस आणले तरी चालेल हाँ... Lol

दिनेश... वेज केलंस तर आम्ही रागवणार नाही.. फक्त खाणार नाही अजून काय Proud

मानुषीताई, मी शाकाहारी आहे. मग असं म्हणायला काय जातंय! Proud

जागूच्या माश्यांच्या धाग्यांवर हजेरी लावते तशी इथेही लावली Wink

#####खीमा+ आलंलसूण पेस्ट + लवंग दालचिनी पावडर, कुकर मधे भांड्यात वाफवून घ्या.#####

म्हणजे कसे ??? सुका खीमा कुकर च्या भांड्यात टाकून ते कुकर मधे ठेऊन 2 शिटया काढणे का??

@ सोन्याबापू..
हो.. कोरडा खीमाच घ्यायचा आहे..कुकर च्या भांड्यात वाफवल्यास आपोआप पाणी सुटेल .. शिटी आल्यावर दहा मिनिटे गॅस सिम करून शिजवला. मग खीमा , सुटलेल्या पाण्यासकट एका कढईत घेऊन पाणी आटवलं आणी खीमा ड्राय केला..

हीहीही.. घोट्टाळा करणं नेहमीच सोप्पं अस्तंय.. नंतर निस्तरणं महा कठीण..

उदा. एव्हढा घोळ घातल्यावर मेड ने नेमका फोन करून सुट्टी घेतली तर...

मस्त रेसिपी. पुर्‍या तळण्याइतके तेल !! बाबौ Happy ग्राउंड चिकन वापरून करावी का असा विचार करते आहे..

चालेल.. नं मैत्रेयी.. चिकन खीमा ही चालेल.. पण फार बारीक असला तर चव आनी टेक्शचर सेम नाही येणार बहुतेक... सुपर मधे फार बारीक मिळतो.. तू जर बोनलेस घेऊन घरी केलास तर बरं

मस्त रेस्पी. खिमा अन अंडी दोन्ही आवडते असल्याने नक्की करणार
( फादर्स डे ब्रंच साठी जमवता येईल बहुतेक )

जागूच्या माश्यांच्या धाग्यांवर हजेरी लावते तशी इथेही लावली>>>>>>>>>>>>> केश्वी +१००
हम भी घासफूसवाली हूं!

Pages