मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.1) नरेंद्र, तुम्ही मुळचे कुठले ?
माझा जन्म पुण्याचा. म्हणजे मी पक्का पुणेरी!! २००० साली नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत आलो.
2) तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
माझा जन्म सांगीतिक कुटुंबात झाला असल्यामुळे लहानपणापासून किंबहुना कळायला लागल्यापासूनच संगीताची गोडी लागली. माझे वडील श्री. मधुसूदन कुलकर्णी हे आकाशवाणी आणि दूरदर्शन वर मान्यताप्राप्त गायक, संगीतकार आहेत.
3) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
वयाच्या चवथ्या पाचव्या वर्षापासून आतापर्यंत. आता शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. याशिवाय नाट्यसंगीत आणि गझल यासारखे गीत प्रकार सादर करण्यासाठी श्रवण भक्ती चालूच असते.
4) संगीतातील तुमचे गुरु कोण ?
प्राथमिक धडे वडिलांकडून घेतले. आता शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. श्री अरुण द्रविड (गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य) यांचेकडे चालू आहे.
5) तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
लहानपणापासून अनेक स्पर्धांमधे प्रथम क्रमांक. विशेष सांगायचे झाले तर. कॉलेज मध्ये फिरोदिया करंडक संगीत विभागात प्रथम क्रमांक. आकाशवाणीच्या अखिल भारतीय उपशास्त्रीय संगीताच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक. सांगलीच्या संगीत नाटक स्पर्धेत "कट्यार काळजात घुसली" या नाटकात खां साहेबांच्या भूमिकेसाठी प्रथम क्रमांक. सर्व उत्तर अमेरिकेसाठी अटलांटा येथील स्वरगंगा संस्थेने घेतलेल्या शास्त्रीय संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक.
6) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
यासाठी एकतर डोक्यात सतत गाणे चालू असते, नाहीतर विविध प्रकारचे गाणे ऐकणे चालू असते अथवा रियाझ चालू असतो.
7) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?
शास्त्रीय संगीत - पं. भीमसेन जोशी, पं.वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, विदुषी गानसरस्वती किशोरी आमोणकर.
सुगम संगीत - सुरेश वाडकर, वसंतराव देशपांडे, सुधीर फ़डके, लता मंगेशकर, आशा भोसले.
या व्यतिरिक्त कोणाचेही सुरेल आणि कल्पक गाणे मला ऐकायला आवडते.
संगीतकार: श्रीनिवास खळे, ह्रदयनाथ मंगेशकर सुधीर फडके, यशवंत देव, अजय अतुल.
8) आपल्या बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
ठरवलेल्या गाण्याचे सादरीकरण करताना शब्दाचे भाव आणि सूर याना पुरेपूर न्याय देण्याचा सराव चालू आहे. या कामामध्ये मला माझ्या पत्नीची (माधुरीची) बहुमोल मदत होते. रोजचा शास्त्रीय संगीताचा रियाझ तर चालूच आहे.
9) संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
बागकाम, घरामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करणे. प्रवास, मित्रांसमवेत गप्पा मारणे.
10) आपल्या बीएमएम सारेगम २०15 च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
रोजचा स्वरांचा आणि ठरवलेल्या गाण्यांचा रियाझ. माझं उपांत्य फेरीतील गाणं इथे ऐकू शकता.
11) आपला कौटुंबिक परिचय ?
माझी पत्नी, माधुरी ही software professional आहे. तीही चांगली गायिका आणि उत्तम समीक्षक आहे. माझा मुलगा, निषाद नुकताच mechanical engineer झाला. तो चांगला गातो आणि उत्तम गिटार वाजवतो.
नरेंद्र कुलकर्णीना तुम्ही इथे मत देऊ शकता.
बेस्ट ऑफ लक काका...
बेस्ट ऑफ लक काका...