१ मेथीची जुडी ( फार मोठी नको )
१ वाटी मटार
२ चमचे तूप, कांदा परतण्यासाठी तेल
१ मोठा कांदा, ७-८ काजू, पाव वाटी दूध ग्रेव्हीसाठी
१ मोठा चमचा लसूण पेस्ट किंवा ड्राय गार्लिक पावडर
१ छोटी पोपटी मिरची ( तिखट मिरची नको. मिरचीचा फक्त स्वाद हवा )
अर्धी वाटी स्किम्ड मिल्क पावडर
१ १/२ टीस्पून कणिक
१ चमचा शहाजिरं. नसेल तर साधं जिरं.
जायफळ
थोडासा गरम मसाला
२ चमचे साखर
चवीनुसार मीठ
किंचित तेलावर कांदा परतून घ्यावा. लसूण पाकळ्या वापरणार असाल तर कांद्याबरोबरच घालाव्या. त्यातच काजू घालावे आणि गॅस बंद केल्यावर पाव वाटी दूध घालावे.
गार झाल्यावर कांदा-काजू-(लसूणपाकळ्या)-मिल्क पावडर- कणिक असे सगळे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट करुन घ्यावी.
पातेल्यात दोन चमचे तूप घालून ते गरम झाल्यावर शहाजिरं तडतडवून घ्यावं.
बारीक चिरलेली मेथी - फ्रोझन मटारदाणे- ( वाटणात लसूण नसल्यास ) लसूणपेस्ट / पावडर -चिमूटभर गरम मसाला आणि मीठ घालून भाजी शिजेपर्यंत परतून घ्यावे. पाहिजे तर एक वाफ आणावी. पटकन शिजतात मेथी आणि मटार दोन्ही ( ताजे दाणे वापरल्यास वाफवून घ्यावे लागतील )
बारीक चिरलेली मिरची आणि वाटण घालून एक उकळी आणावी.
ह्यात कणिक असल्याने भाजी दाट होत जाते त्यामुळे थोडे पाणी घालून सारखी करुन घ्यावी.
गॅस बंद करता करता दोन चमचे साखर आणि थोडे जायफळ किसून घालावे.
कच्चा कांदा आणि लिंबू पिळून छान लागते ( लिंबू अगदी खायच्यावेळीच पिळावे. ग्रेव्ही फाटत नाही )
-माझ्या फ्रीझरमध्ये नेहेमीच स्किम्ड मिल्क पावडरचे पाकीट असते. पंजाबी भाज्या उदा. बटर चिकनची ग्रेव्ही, पालक पनीर, शाही पनीर, मेथी मटर मलई आणि सूप्स ह्या सगळ्यात मी ती सढळहस्ते वापरते. क्रीमी चव आणि दाटपणा असे दोन्ही साध्य होते आणि कॅलरीज प्रचंड वाचतात.
- ह्यात आलं नको. फक्त लसूण घाला.
- ही ग्रेव्ही पांढरीच असते. लाल तिखट, हळद शक्यतो नको.
- ह्याच ग्रेव्हीमध्ये मेथी वगळून भाज्या-फळं घातल्यास उत्तम नवरतन कुर्मा होतो.
- ह्यात मटरऐवजी बोनलेस चिकन घालून अतिशय उत्तम आणि वेगळ्या चवीचं मेथी चिकन होतं. फक्त त्यात तुपात शहाजिर्याबरोबर अर्धवट भरडलेले चार-पाच मिरीदाणे घाला. ( तेव्हा साखर वगळा पण जायफळ वगळू नका )
-मेथी-मटर-बारीक चिरलेले पनीर असेही मस्त लागते.
-किसलेला बटाटा ( बटाटा वेगळा उठून दिसणार नसेल तर ) चालेल एकवेळ पण बटाट्याच्या फोडीबिडी घालू नका. वर एवढे समर्थ पर्याय दिले आहेत त्यातला एक वापरा !
मिल्क पावडर + कणकेची आयडिया
मिल्क पावडर + कणकेची आयडिया भारी आहे!
पण त्यामुळे भाजी अधिक आळून येत असेल ना?
मिल्क पावडर + कणकेची आयडिया
मिल्क पावडर + कणकेची आयडिया भारी आहे!>>+१
छान रेसिपी! बटाटा, पनीरचा
छान रेसिपी!
बटाटा, पनीरचा खुलासा आधीच केला. आता पामरांनी काय प्रश्न विचारायचे?! मटर ऐवजी मका चालेल का??
मस्त रेसिपी, लौकरच करणार
मस्त रेसिपी, लौकरच करणार आहे,
ललिता, एकदा पाणी घालून सारखी
ललिता, एकदा पाणी घालून सारखी केली की नाही आळत. फ्रीजमध्ये ठेवून परत गरम करायच्या वेळेस थोडे पाणी घालायला लागेल कदाचित पण लागतेच असे नाही. पाहिजे तर कणिक थोडी कमी कर. एक चमचाच घे. कणकेने ग्रेव्ही हॉटेलमधल्यासारखी मिळून येते.
सीमंतिनी, चालेल की.
सुलेखा, नक्की करुन बघा.
अगो मस्त रेसिपी. अश्या सौम्य
अगो
मस्त रेसिपी. अश्या सौम्य ग्रेवीजसाठी कांदा+काजू+मिल्कपावडर्/दूध याचं वाट्ण छान जमून येतं.
छानच, चव इमॅजिन करतोय.
छानच, चव इमॅजिन करतोय.
मस्त!
मस्त!
मस्त रेसीपी...
मस्त रेसीपी...
मस्त आहे रेसिपी. फोटो छानच
मस्त आहे रेसिपी. फोटो छानच !!!
मस्त फोटो. नक्की ट्राय करेन.
मस्त फोटो. नक्की ट्राय करेन.
छान रेसिपी. फोटो एकदम
छान रेसिपी. फोटो एकदम टेंप्टिंग!
डिश भारीच दिसतेय एकदम
डिश भारीच दिसतेय एकदम :तोंपासु:
सिमंतिनी - मका बहुतेक फॅटी असतो, मग ती डाएट मेथी मलई राहणार नाही.
अगो .. रेसिपी छान आहे आणि
अगो .. रेसिपी छान आहे आणि थोडी वेगळीच आहे (कणिक, लसूण, जायफळ, दुध आणि स्किम्ड मिल्क पावडर इत्यादी साहित्य प्रकार मी पहिल्यांदाच बघतेय मेथी मलई मटार करता ..)
मी इंटरनेट वर फार पुर्वी एका "पंजाबीलोक.नेट" की तत्सम कुठल्या तरी साईट वर रेसिपी बघून एक दोनदा केली होती त्याचे रिझल्ट्स फार आवडले होते मला .. ती डाएट रेसिपी नव्हती .. पण मी क्रीम्/मलई थोडीच घालायचे .. काजू घातल्यामुळे दाटपणा आणि रीच चव असं दोन्हीं साध्य होतंच .. त्या रेसिपीत दही घालायचं सांगितलं होतं वाटणात .. आणि थोडंसं आलं .. (ती साईट नक्की कोणती होती ते आता आठवत नाही .. आणि आठवतंय त्या नावाने सर्च केलं तरी काही मिळत नाही ) ..
जायफळ घालायची आयडिया मात्र एकदम मस्त .. इकडे (अमेरिकेत) क्रीमी, व्हाईट बेस असला की सहसा जायफळ घालतात त्याची आठवण झाली ..
करून बघते ..
कणिक, लसूण, जायफळ, दुध आणि
कणिक, लसूण, जायफळ, दुध आणि स्किम्ड मिल्क पावडर इत्यादी साहित्य प्रकार मी पहिल्यांदाच बघतेय मेथी मलई मटार करता >>> भारतात दोन्ही प्रकारची मेथी मटर मलई खाल्ली आहे. एक सायोच्या रेसिपीसारखी खव्याची चव असणारी, किंचित तिखट आणि एक अगदी व्हाईट ग्रेव्हीतली, गोड चवीची.
दक्षिणा, भाजी चालेल गं कुठलीही. डाएट व्हर्जन म्हणताना खवा आणि हेवी क्रीम नाही असे अभिप्रेत होते मला
मस्त .... करुन
मस्त .... करुन बघते,,,,,,,,,,,,,,,,,,
'कुठलीही' भाजी चालेल नको
'कुठलीही' भाजी चालेल नको म्हणू प्लीज :). आईलोक थेट 'मेथी घोसाळ मलई', 'मेथी दोडके मलई' असल्या व्हर्जन्स काढतील. त्या 'म' शी मॅच भाजी हवी - मेथी मका मलई, मेथी मिरच मलई इ.
दक्षिणा, पॉईंट नोटेड
डाएट व्हर्जन म्हणताना खवा आणि
डाएट व्हर्जन म्हणताना खवा आणि हेवी क्रीम नाही असे अभिप्रेत होते मला >> ओके! कारण मी आत्तापर्यंत प्रत्येकवेळी मेमम अशीच केली आहे. फक्त जायफळाची अॅडिशन नवीन आहे माझ्यासाठी. पुढच्यावेळी जायफळ घालेन.
डाएट किंवा शॉर्टकट मेमम करताना मी परतलेल्या कांदा-मेथीत कोल्हापुरात मिळणारा पांढरा रस्सा मसाला घालते किंवा फक्त मिल्क पावडर घालते आणि गरम मसाला. वरून दूध किंवा पाणी आणि थोडा(च) टोमॅटो सॉस
मध्यंतरी मसाला स्पर्धा झाली तेव्हा त्यातल्या एका एंट्रीत (प्रीतिची एंट्री होती) दिल्याप्रमाणे कांदा दुधात परतून त्याची ग्रेव्ही करते, पण अशी ग्रेव्ही फक्त पनीरच्या भाजीसाठी आवडली, मेममसाठी नाही.
काल एका पॉटलकसाठी ही रेस्पी
काल एका पॉटलकसाठी ही रेस्पी करून बघितली. आयत्यावेळेस लोक वाढले म्हणून पुरवठ्याला बटाटा घातलाच पण किसून घातला त्यामुळे मस्त मिळून आला. कुणाला पत्ताही लागला नाही त्यात बटाटा आहे म्हणून.
एकदम अहाहा झाली होती. शिवाय डाएट आवृत्ती असल्याने बिन्धास्त हादडता आली. सगळ्यांकडून मिळालेल्या कॉम्प्लिमेन्ट्स अगो, तुला साभार पोहोचवत आहे.
बदल एवढेच केले की हाताला लागलेला टोमॅटो आणि मूठभर कोथिंबीर वाटणात घातली आणि जायफळ नव्हतं म्हणून वरून दालचिनी पावडर घातली.
खूप खूप धन्यवाद वरदा
खूप खूप धन्यवाद वरदा
पुरवठ्यासाठी बटाटा किसून घालायची कल्पना भारीच !
अगो, अधिक टीपामधली शेवटची टीप
अगो, अधिक टीपामधली शेवटची टीप बदल
बदलली
बदलली
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मिल्क पावडर + कणकेची आयडिया
मिल्क पावडर + कणकेची आयडिया भारी आहे!>>+११
काल ही डिश केली. अप्रतिम चव
काल ही डिश केली. अप्रतिम चव शिवाय सोप्पी. आधीच का नाही ट्राय केली अशी हळ्हळ वाटतेय जाम.
सहेली, धन्यवाद
सहेली, धन्यवाद
मी आज केली. प्रमाण घेताना
मी आज केली. प्रमाण घेताना ४-५ नीट जेवणार्या मोठ्या लोकांसाठी म्हणून जरा वाढवलं. खूप मस्त झाली! माझ्याकडून गरम मसाला अगदीच माफक घातला गेलाय हे चव घेतल्यावर जाणवलं म्हणून शेवटी तेल गरम करून त्यात गरम मसाला पोळवून ती कढ्त तेलाची फोडणी वर घातली तर अफलातून चव आली.
अगो खूप मस्त आणि कमी कटकट रेसिपीसाठी धन्यवाद! पंजाबी चवीच्या भाज्या फार आवडीने न खाणारे मेंबर्सही 'छान आहे' म्हणाले!
अगो, काल मी ही भाजी केली
अगो, काल मी ही भाजी केली होती. सगळ्यांना खूप आवडली. इतक्या सोप्या आणि चविष्ट पाकृ साठी धन्यवाद
अगो, ह्या पाकृ साठी धन्यवाद.
अगो, ह्या पाकृ साठी धन्यवाद.
आज ही भाजी बनवली होती. बदल म्हणजे जायफळ घालायला विसरले, साखर घातली नाही आणि रजवाडी गरम मसाला वापरला. पण चव उत्तम आली होती. घरच्यांना खूप आवडली.
मस्त पाकृ.. क्रीम घालताना
मस्त पाकृ.. क्रीम घालताना अगदी जिवावर येते, आता बहुतांश वेळेला करणार.
काजू ऐवजी सध्या मी मगज बी चा वापर सुरू केलाय, पालक पनीत्/आलू मतर ग्रेव्हींसाठी!