सर्वप्रथम आपली या मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
1) अदिती, तुम्ही मुळच्या कोणत्या गावाच्या आहात ?
मी मुळची पुण्याची. पुण्यामधून इंजिनीरिंग ची पदवी घेतल्यानंतर सध्या Charlotte, North Carolina येथे IT Professional म्हणून जॉब करत आहे .
2) तुम्हाला संगीताची गोडी / आवड कशी आणि केव्हा लागली ?
आमच्या घरातच संगीताचे वातावरण आहे . माझी मोठी बहीण संगीत अलंकार आहे, तिच्या प्रोत्साहनाने मी सातव्या वर्षापासून गुरु कै. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे दहा वर्षापेक्षा जास्त काळ शिकले .
3) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्ष घेत आहात ? आणि कोणत्या प्रकारचे संगीत शिक्षण चालू आहे ?
दहा वर्षांपेक्षा अधिक काळ मी शास्त्रीय आणि सुगम संगीत शिकत आहे.
4) संगीतातील तुमचे गुरु कोण ?
कै. मधुसूदन पटवर्धन, सौ . अपर्णाताई गुरव, सौ . श्रुती पेंढारकर ( माझी बहिण)
5) तुमच्या संगीतातली विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?
- शाळेत असल्यापासून सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा (पुणे) , पं . जयराम शिलेदार नाट्यसंगीत स्पर्धा (पुणे) , कृष्णाबाई महोत्सव (वाई) येथे सलग ३ वर्ष प्रथम , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
- Cummins College of Engineering , Pune येथे सुगम संगीत स्पर्धेत २ वर्षे प्रथम आणि द्वितीय क्रमांक
- Charlotte मधील CSMM (Carolina Sanskrutik Maharashtra Mandal) च्या सर्व कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग
- IPAAC (Indian Performing Arts Association of Charlotte) येथे शास्त्रीय संगीतात सहभाग
- Charlotte येथे "Rhy-Dhun" या Bollywood Music कार्यक्रमात सक्रीय सहभाग
- Charlotte येथे नुकताच एप्रिल २०१५ मधे , डॉ . सलिल कुलकर्णी यांच्या "आयुष्यावर बोलू काही " कार्यक्रमात , प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर गाण्याची संधी
6) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?
मला शास्त्रीय आणि सुगम या दोन्ही प्रकारच्या संगीताची आवड आहे. मी जुनी आणि नवीन गाणी खूप ऐकते.पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सवात मला दिग्गज गायकांचे गाणे ऐकण्याची संधी मिळाली . दिवसातून किमान अर्धा तास गाण्याचा रियाझ करावा असा माझा प्रयत्न असतो. जुन्या आणि नवीन गाण्याचा मिलाफ करण्याचा माझा सतत प्रयत्न असतो.
7) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते ? तुमचे आवडते एखादे गाणे ? कोणाचे संगीत ऐकायला तुला जास्त आवडते ?
आवडते गायक / गायिका - आशा भोसले , वीणा सहस्रबुद्धे , पं . जितेंद्र अभिषेकी, बेला शेंडे, सुनिधी चौहान , शंकर महादेवन
आवडते संगीतकार - श्रीनिवास खळे, अजय अतुल, अशोक पत्की
आवडती गाणी - युवतिमना (आशा भोसले) , अवघा रंग एक झाला ( किशोरी अमोणकर) , नभ उतरू आलं (आशा भोसले) , मोरया मोरया ( अजय - अतुल)
पं . हृदयनाथ मंगेशकर , आनंदघन यांचे संगीत मला जास्त आवडते .
8) आपल्या बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?
माझा रोजचा रियाझ चालू आहे. बीएमएम सारेगम 2015 च्या अंतिम स्पर्धेत उत्तम सादरीकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
9) संगीता खेरीज आपले अजून काय काय छंद किवा आवड आहे ?
मी मराठी साहित्य , ललित लेख खूप वाचते. मला प्रवासाची आवड आहे.
10) आपल्या बीएमएम सारेगम २०15 च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?
ऑफिस आणि घर सांभाळून मी जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तशी तयारी केली. खालील दुव्यावर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .
उगवली शुक्राची चांदणी
11) आपला कौटुंबिक परिचय ?
माझे पती - श्री . भूषण काणे ( हे सुद्धा software engineer आहेत. )
मला आद्या नावाची ७ वर्षाची गोड मुलगी आहे.
अदितीला तुम्ही या दुव्यावर जाउन मतदान करू शकता.
अदिती यांना शुभेच्छा!
अदिती यांना शुभेच्छा!
सेमि फायनल पाहिली होती, मस्तं
सेमि फायनल पाहिली होती, मस्तं झालं होतं आदितीचं गाणं !