Submitted by मया on 3 June, 2015 - 07:50
माझी आई सकाळी ७ वाजता चपाती बनवून देते गहू पण ३७ रुपये किलो चे वापरते परंतु १ वाजेपर्यंत त्या चपात्या कडक होतात काही तरी मार्ग सुचवा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१ वाजेच्या आत चपाती खा. पोटात
१ वाजेच्या आत चपाती खा. पोटात कडक होणार नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25385
हा पोळी-चपाती-फुलके इत्यादी संदर्भात चर्चा अशाच नावाचा धागा आहे. तो वाचून पहा. काही उपाय सापडेल.
@prafullashimpi :तुम्ही
@prafullashimpi :तुम्ही दिलेल्या पर्याया बद्दल धन्यवाद. चांगल सांगत येत नसेल तर फुकटची लुडबुड कशाला करता.
काही वेळेस गव्हाची प्रत
काही वेळेस गव्हाची प्रत चांगली नसते.
चपाती भाजताना फुगते का?
रुमालात गुंडाळून बंद डब्यात ठेवली की पोळी मऊ रहाते.
कणीक भिजवुन फुगु द्यायला जरा
कणीक भिजवुन फुगु द्यायला जरा वेळ द्यावा लागतो, भिजवल्या भिजवल्या केलेली पोळी कडक होइल, कणीक फार सैल भिज्वली तरि पोळी वातडी होइल, कणकेत किचित मोहन आणि मिठ घातल तर कणिक चान्गली भिजते,
सकाळी फार घाई होत असेल तर कणीक आदल्या रात्री भिज्वौन एअरटाईट डब्यात घालुन ठेवा.
रूमालात किंवा पेपर टॉवेलमधे
रूमालात किंवा पेपर टॉवेलमधे गुंडाळून ठेवा. शक्यतोवर गार झाल्याशिवाय डब्यात भरू नका. तसेच कणीक भिजवून अर्धा तास तरी झाकून ठेवा.
<<रुमालात गुंडाळून बंद डब्यात
<<रुमालात गुंडाळून बंद डब्यात ठेवली की पोळी मऊ रहाते.>> सहमत
कुठला गहू वापरता?
चंदोसी,सिहोर जातीच्या चपात्या मऊ राहतात असा अनुभव आहे.
लोकवान, १४७, बन्सी, शरबती, नर्मदा ह्या थोड्या कडक राहतात. त्या मऊ राहण्या साठी त्यात मळतांना थोडे थंड तेल टाकले तर मऊ राहतील.
तव्यावरून काढल्यावर लगेच बंद
तव्यावरून काढल्यावर लगेच बंद डब्यात ठेवणे गार होईपर्यंत. नंतर अॅल्युमिनियम फॅाइलमध्ये गुंडाळून नेणे.घरी जेवणात खाण्यासाठी चपात्या थोड्या खरपुस भाजतो त्यापेक्षा थोड्या कमी शेकून डब्यासाठी न्यायच्या .नक्की फरक पडतो.
३७ रुपये किलो ऐवजी जरा महाग
३७ रुपये किलो ऐवजी जरा महाग वाले गहू वापरुन पहा.
भिजवतांना अर्धे दुध अर्धे
भिजवतांना अर्धे दुध अर्धे पाणी वापरले तर पोळी मऊ राहण्याची १००% खात्री.
पूर्ण दुध वापरले तरी चालेल पण ते फुल क्रीम नसावे
आम्ही अमेरिकेत रहाणारे
आम्ही अमेरिकेत रहाणारे सोमवारी केलेल्या पोळ्या शुक्रवारी खातो. चांगला १२० रु. किलो वाला आटा वापरतो. (स्वस्तात स्वस्त म्हणून)
पण काय करतो, झिपलॉक बॅगमधे घालून मायक्रोवेव्ह मधे अर्धा मिनिट गरम करतो. गरम गरम मऊऊऊऊ सूऊऊत पोळ्या!!
करून पहा.
आईला सांगा की कणीक मळवताना
आईला सांगा की कणीक मळवताना त्यात चमचाभर तेल घाला. आणि शक्यतोवर घडीची तेल लावून केलेली पोळी न्या. अशा पोळ्या कडक होत नाही. पिठ मळवताना अर्धा कप दुध घालायला सांगा.
पोळी लाटताना काही विशेष काळजी
पोळी लाटताना काही विशेष काळजी घ्यावी का
माझ्याही पोळया कड़क होतात..काठ नेमके किती जाड़ वा पातळ लाटावे.कृपया मार्गदर्शन करा
(No subject)
तव्यावरुन काढल्या काढल्या
तव्यावरुन काढल्या काढल्या किंचित पाण्याने भिजवलेला तळहात त्यावरुन फिरवुन लगेच डब्यात भरल्या तरी दुपारपर्येत मऊ रहातात.करुन बघा.