तडका - कर्माची पावती

Submitted by vishal maske on 27 May, 2015 - 21:16

कर्माची पावती

हाती आलेल्या निकालाने
कुणी सुखावणारे असतात
तर निकालाला पाहून मात्र
कुणी दुखावणारे असतात

अशी निकालाची घूसमट मनात
सुख-दु:खाच्या अवती-भवती असते
पण हाती आलेला निकाल मात्र
आपल्या कर्माचीच पावती असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असले काही लिहिण्यापेक्षा एखादा लेख लिहावा....... या निरर्थक लिहिण्याकडे कुणी ढुंकुनही बघणार नाही इथे.......एकामागे काहीबाही पोष्ट करण्यापेक्षा दोन दिवसातून एखादी चांगली रचना टाका.... इथे पहिल्या पानावर तुमच्याच कविता दिसत आहेत सगळ्या.... बाकी लोकांच्या रचना पुढे ढकलल्या जातात याचाही विचार करा....

माननीय संतोष वाटपाडे साहेब

माझ्या या तुमच्या नजरेतुन असलेल्या निरर्थक लिखाणाकडे आपण रोज ढूंकुन बघत आहात याबद्दल अभिनंदन,...

वाचत रहा रोज नवा दिवस,नवा विचार, नव्या वात्रटिका,...

अजिबात वाचणार नाही. सर्वांना फोन करुन सांगेन वाचू नका . आमचे काय ग्रहब्रिह फिरले का आल्या आल्या तुमच्या अर्थहीन लिखानाला वाचायला.... लोक वैतागलेत इथले तुम्हाला.... सुळसुळाट करुन ठेवलाय नुसता.... कुणी बोलत नाही म्हणून गैरफायदा घेऊ नका..... प्रमाणात पोष्ट करा आणि एकटेच वाचत बसा

प्रशासकांनी त्यांच्या तडका मारुन बनवलेल्या कवितांसाठी एकादा क्लोजग्रुप उघडुन द्यावा आणि तिथे फक्त त्यांनाच प्रवेश द्यावा.

कळस आहे राव.....अरे कोई तो रोको.... १२ लेंड्या पहिल्याच पानावर आहेत.....दुसर्^या पानाचीही तिच तर्^हा आहे..... बाकी इतर विभाग गुण्यागोविंदाने नांदत आहेत. इथंच फक्त पचका झालाय सगळा.... परमेश्वरा काहीतरी कर बाबा.... वाचव आम्हा सर्वांना या घनघोर काव्यसदृश पदार्थांपासून....

संतोष वाटपाडे साहेब शब्दांमध्ये खुप किंमत असते,
परंतु शब्द हे माणसं जोडण्यासाठी वापरायचे की तोडण्यासाठी
हे आपल्या आकलेवर अवलंबुन असतं,

मी मागेही एकदा म्हस्के साहेबांना सुचवले होते कि आपण कृपया एक न वाहणारे पान काढून त्यात आपल्या वात्रटिका लिहाव्यात ..
जेणेकरून त्या एका ठिकाणी राहतील. वाचणार्यालाही वाचता येतील आणि इतर कलाकृती खाली निघून जाणार नाहीत.
माझी पुन्हा आपल्याला विनंती आहे कि आपण यावर गांभीर्याने विचार करावा.
यामुळे आपल्या वात्रटिका तर दिसतीलच शिवाय इतरांचीही गैरसोय होणार नाही ...
कसे.?

म्हणने एकंच आहे.... दमादमाने दोन दिवसाआड टाका..... तुमच्या "कविता" एकवेळ वाचू पण हे तडका प्रकरण अजिबात अजिबात अजिबात झेपत नाही............मेहेरबानी करा आम्हा भाबड्या जीवांवर....

विशाल् भाऊ
शम्भर एक कविता झाल्या असतील तर लवकरात लवकर एक संग्रह काढा ..
त्यास मायबोली शासनाचा पुरस्कार मिळो हीच सदिच्छा

भुईकमळजी,
हजारीक झाल्या आहेत,
परंतु अजुन संग्रह काढण्याचा विचार नाही
भविष्यात विचार करू,...

धन्यवाद,...