
३ कोंबडीची अंडी, १० मिनिट उकडलेली.
१ मोठा कांदा
२ मध्यम टोमॅटो
८-१० लसुण पाकळ्या
अर्धा इंच आले
धणे पूड १ चमचा
जिरे पूड अर्धा-पाऊण चमचा
मूठभर चिरलेली कोथिंबीर
खडा मसाला :
लवंग ३
दालचिनी छोटा तुकडा
३-४ मिरे
(वरील तिन्ही गोष्टी खलबत्त्यात थोड्या भरड कुटून घ्याव्यात)
२ तमाल पत्रे
फोडणीसाठी चिमूटभर जिरं
दीड टेबलस्पून (सुमारे ३० मिली) तेल.
लाल तिखट, गरम मसाला, मीठ : चवीनुसार. रफली अर्धा चहाचा चमचा प्रत्येकी.
१. अंडी उकडणे.
जाड बुडाच्या भांड्यात अंडी बुडतील इतके पाणी घेऊन त्याला उकळी काढा.
चमच्यात कच्चे अंडे (न फोडता, सालासहित) घेऊन हलकेच उकळत्या पाण्यात टाका. यामुळे अंडे ट्ण्णकन भांड्याच्या बुडाशी आपटून फुटत नाही.
सगळी अंडी सोडून झालीत, की गॅस कमी करून झाकण ठेवा.
घड्याळ लावून १० मिनिटांनी गॅस बंद करा.
अंडी थंड पाण्यात ट्रान्स्फर करून सोलून घ्या.
२. अंडी तळणे.
सोललेली हार्ड बॉईल्ड एग्ज तळायची आहेत.
यासाठी जाड फ्राइंग पॅनमधे (नॉनस्टिक चालेल) १-दीड मोठा चमचा (टेबलस्पून) तेल गरम करा.
सोललेल्या अंड्याला सुरीच्या टोकाने २-३ छोट्या चिरा द्या. याने अंडी तळताना फुटणार नाहीत. साधारण डार्क तपकिरी रंग येईपर्यंत अंडी तळायची आहेत. थोड्या थोड्या वेळाने उलटवत रहा. याला सुमारे ५-७ मिनिटे पुरतात.
हवा तसा बदामी रंग आल्यावर अंडी तेलातून बाहेर काढा, व बाजूला ठेवा. कढईतले तेल एका वाटीत काढून घ्या. अंडी पुन्हा कढईत टाकून त्यावर थोडे तिखट, मीठ व गरम मसाला भुरभुरवून थोडा वेळ परतून घ्या. अंड्याला तिखट्/मीठ/मसाला सगळीकडून लागला पाहिजे.
आता अंडी बाजूला काढून ठेवा.
३. करी.
त्याच पॅनमधे, मघाचं तेल पुन्हा टाका. त्यात जिरं टाकून फोडणी टेंपरेचर आलं, की खडा मसाला टाकून थोडं परता.
यात बाऽरीक चिरलेला कांदा घालून परता. त्याचा कचवटपणा गेला, की त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून पुन्हा परता.
जिरेपुड, धनेपूड घाला.
नंतर थोडं मीठ, तिखट घालून परतून घ्या.
बाजूने तेल सुटायला लागले, की बारीक चिरलेले टमाटे, वा टमाटे उकडून मिक्सरमधून फिरवून केलेली प्यूरी त्यात घालून पुन्हा परता.
मला यात टेक्स्चर आवडते म्हणून मी कांदा/टमाट्याची पेस्ट केलेली नाही. तुम्हाला हवी तर दोन्ही गोष्टी बारीक पेस्ट केल्यात तरी चालतील.
टमाट्यांचा कच्चेपणा गेला असे जाणवले, की त्यात अर्धा पेला गरम पाणी घालून एक उकळी काढा व झाकण ठेवा.
५-६ मिनिटांनी यात गरम मसाला अॅड करा. कोथिंबीर घाला. थोडावेळ झाकण ठेवून मग रश्शाची चव घेऊन पहा. चमच्यात थोडा रस्सा काढून गार होऊ द्यावा, अन चव पहावी. आपल्याला हवी तशी तिखट मिठाच्या चवीची अॅडजस्टमेंट करावी. त्यात पुन्हा हवे तसे थोडे पाणी घालून एक उकळी काढा. झाकण ठेवून गॅस बंद करा.
खायला देताना अंडी चिरून दोन भाग करून प्लेटमधे ठेवा, व त्यावर करी घालून सर्व करा.
या जेवायला.
आवडत असेल तर हवी तशी बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा फ्राय करताना त्यासोबत घालावी.
मसाला तेलावर परतून झाला, की तो मिक्सरमधून फिरवला तरी चालेल. त्याआधी तेजपत्ता(तमालपत्र) काढून घ्यायला विसरू नका.
फोडलेल्या अंड्याचे पिवळे रश्शात मिक्स झाले की वेगळी छान चव व घट्ट कन्सिस्टन्सी येते. त्यामुळे थोडे पाणी जास्त ठेवावे. माझ्या सारख्या टेक्स्चर्ड करीत पाणी थोडे वेगळे दिसले तरी बलक मिसळून छान होते.
नेहेमीप्रमाणे फोटो मी केल्याचा पुरावा म्हणून आहेत
कैलासवासी ईब्लिस, उद्देश,
कैलासवासी ईब्लिस, उद्देश, मंदार यांना श्रद्धांजली !
अॅडमीन ने किती वेळा समजावल तरी सुधरले नाहीत ,
आता तरी मबोवरची भाषा सुधरेल अशी आशा आहे !
धन्यवाद इब्लिस ह्या अप्रतिम
धन्यवाद इब्लिस ह्या अप्रतिम पाकृ बद्दल. कालच करून पाहिली आणि पहिल्याच प्रयत्नात मस्त झाली . रेसिपी फॉलोड टू द टी म्हणतात तशी केली. अंडी उकडून तळल्याने फारच चविष्ट लागली! पुन्हा धन्यवाद!
दीमा या पाककृतीतल्या
दीमा या पाककृतीतल्या फोटोंचाही रिव्ह्यू होऊ शकेल
बी रेडी
Pages