# Go Home Indian Media !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 May, 2015 - 06:14

एखादा शेतकरी आत्महत्या करत असतो, आणि मिडिया त्याला वाचवण्याऐवजी त्यात एक सनसनाटी न्यूज शोधत असते.

तो मेल्यावर त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याऐवजी मग आता कसे वाटतेय तुम्हाला म्हणत त्यांच्या मुलाखती घेत असते.

एखाद्या ठराविक राजकीय पक्षाला फेव्हर करणे, एखाद्याच्या मागे हाथ धुवून लागणे, तर एखाद्याची ईमेज उजळवायचे प्रयत्न करणे, एखादी ब्रेकींग न्यूज आपल्याच चॅनेलवर कशी पहिला दिसेल हे बघणे तर एखाद्या कार्याचे श्रेय घ्यायला धडपडणे..

प्रसारमाध्यमांचे हे बदलते व्यावसायिक रूप आपल्याला काही आता नवीन राहिले नाही.

हि नक्कीच शरमेची गोष्ट आहे पण तरीही हे असेच चालायचे म्हणून आपण स्विकारले आहे,
पण आज खालील बातमी वाचली, आणि खरेच एक भारतीय म्हणून शरम वाटली.

#GoHomeIndianMedia

भारतीय मीडियावर नेपाळींची टीका

नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या जखमा भळभळत असताना आणि या तीव्र दुःखातून तेथील जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचे कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. रविवारी दिवसभरात सुमारे १ लाख ४४ हजार ट्विट पडले होते.

सविस्तर बातमी इथे वाचा - http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Go-home-Indian-media-Nepal...

मला तरी बातमीच्या विश्वासार्हतेबद्दल जराही शंका नाही एवढा विश्वास आहे आपल्या मिडियावर..
पण याउपर आपण स्वत:ही गूगाळून शोधू शकता.

एक संवेदनशील भारतीय नागरीक म्हणून मी याचा निषेध करतो!

पण तरीही एक प्रश्न उरतोच, या प्रकारांना अंकुश कसा लावायचा!?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुकंपामुळे ज्यांची घरे जमीनदोस्त झाली , सगळी कडे हाहाकार माजलाय आणि इंडीयन मिडीयावले "आपको कैसा लग रहा है?" असा टिपिकल मुर्ख प्रश्न विचारत असतील तर काय वाटेल पीडीतग्रस्तांना, हे म्हणजे एखाद्याला फासावर लटकवले जात आहे आणि मिडीयावाले विचारतायत "आपको कैसा लग रहा है?" काय उत्तर देईल तो? "बहुत अच्छा लग रहा है?"

हे खरे तर भारतीय जनतेनेच याआधी करायला हवे होते.

या सगळ्या मिडीयावाल्यांना घरी बसवायला हवे कारण त्यांना मुळात आपण कोण आहोत आणि आपले कर्तव्य काय आहे याचा विसर पडलाय. आपले चॅनेल चालवणे एवढीच आपली भुमिका आहे असे ते मानुन चालतात. पण तेच जर कोणी त्यांच्यावर आवाज उठवला तर मात्र त्यांना आपण लोकशाहीचा चौथा का पाचवा स्तंभ आहोत हे आठवते. सत्य परिस्थिती ही आहे की भारतीय मिडीया हा केवळ एक बिझिनेस आयटेम आहे. आणि या बिझिनेस आयटेमची भारताला गरज नाहीय. ज्या प्रकारच्या मिडीयाची गरज आहे त्या प्रकारचा मिडीया मिळणे आजतरी अशक्य वाटतेय.

जगभरातल्या मिडीयाचे माहित नाही पण भारतीय मिडीयाला कोणीतरी पैश्यांसाठी शरिरविक्रय करणा-या व्यक्तीची उपमा दिली होती. दुर्दैवाने आजघडीला ते खरे झालेले पदोपदी पाहायला मिळतेय.

साधना आणि ऋन्मेष,

ही ह्यांची गिधाडी प्रवृत्ती आहे. निषेध वगैरे काही नाही, न्यायालयाने ह्यांचे क्लासेस घ्यायला हवे आहेत.

चालायचेच! मीडिया है, उनसे और क्या एक्स्पेक्ट कर सकते हो! वार्तांकनात धंदा आणि टीआरपी शिरला की असे होणारच! सगळीकडे असेच चालते!

भारतीय मिडीयात चिव्चिवाट करणार्या ज्या चिमण्या भरल्या आहेत त्यांना कसलेही तारतम्य नसते.फक्त दीसायला सुंदर आहेत म्हणून चॅनलवाले यांना सामावून घेतात.

आणि काव काव करणारे कावळे? ते तर दिसायलाही सुंदर नसतात.
मिडीयाच्या वर्तणूकीबद्दल नेहमीच खेद वाटत आलेला आहे.

अत्यंत वाईट प्रकार आहे.
या चॅनल्सवाल्यांना आम्ही १०-१२ दिवसांमधे कंटाळलो तर भारतीय कसे ३६५ दिवस यांचे माकडचाळे सहन करत आहे? असे प्रश्न आजकाल ट्विटरवर विचारले जात आहेत

ऋन्मेष सहमत तुम्हाला!! कोणे एके काळी वार्ताहर हा व्यवसाय उदात्त मानला जात होता. आज खरच ह्या व्यवसायची इतकी अधोगती झाली आहे!! पण इतकी वाइट अवस्था होण्यास थोडेफार आपणही जबाबदार नाही का? आपण चालवून घेतो म्हणून ह्या सर्वांचे फावते!!

>>>पण इतकी वाइट अवस्था होण्यास थोडेफार आपणही जबाबदार नाही का? आपण चालवून घेतो म्हणून ह्या सर्वांची फावते!!<<<

हे अनेक वाईट गोष्टींबाबत लागू होते. पण मला खरंच समजत नाही की 'आपण चालवून घेतो' म्हणजे नक्की काय करतो आपण? काय करणे अपेक्षित असते? माझ्याकडे बातम्यांचे सुमारे तीस किंवा अधिक चॅनेल्स आहेत. त्या सर्वांवर प्रचंड अहमअहमिका सुरू असते. टीआरपीचेच युद्ध असते. मी छत्तीसावा चॅनेल शोधावा का? मला ह्या वृत्तीचा निषेध व्यक्त करायचा असेल तर तो मी कुठे करावा? त्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत अशी फ्रेंडली यंत्रणा आहे का? मी निषेध व्यक्त केल्यानंतर मीडिया मला बदनाम करणार नाही ह्याची शाश्वती आहे का? मग माझ्यासाठी सोप्पी असणारी माध्यमे, जसे संकेतस्थळे, फेसबूक, ट्विटर हेच मी वापरणार ना?

जे मुळात गोष्ट डिलीव्हर करत आहेत त्यांनी का सुधारणा दाखवू नयेत? त्यांचे आपण चालवून घेतो म्हणून ते असे वागतात असे स्पष्टीकरण का म्हणून मान्य करावे?

नेपाळ मध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा भारतीय मिडिया ने आधी पोहचून जगासमोर हि बातमी आणि खरी, पण खरी चढा ओढ इथून सुरु झाली.
आमचा चैनेल सर्वात पुढे, लाइव कवरेज च्या नादात मिडिया संवेदन शुन्य झाला.

२००८ च्या अतिरेकी हल्यात सुद्धा हीच संवेदन शून्यता खूप महाग पडली होती, ह्यांचे लाइव कवरेज अतिरेकी सुद्धा पाहून आपल्या हालचाली ठरवत होते.
न्यायालयाने फटकारून सुद्धा हे लोक बदलेले नाहीत Sad

११/२६ च्या दहशतवाद्याविरोधी कारवाईत , मे. सन्दिप उन्निकृष्ण्न अशाच मिडिया कवरेजचा बळी पडले होते , असे एकिवात आहे .

पण मला खरंच समजत नाही की 'आपण चालवून घेतो' म्हणजे नक्की काय करतो आपण? काय करणे अपेक्षित असते? >>> आपण काहीच करत नाही हा मूळ प्रॉब्लेम आहे. नेट न्युट्रॅलिटी हवी म्हणून लाखो इ-मेल्स जशा ट्रायकडे जातात तशा हीन वार्तांकन केले म्हणून तक्रार करणार्‍या किती इ-मेल्स न्यूज चॅनेल्सकडे जात असतील??

मी छत्तीसावा चॅनेल शोधावा का?>>> तुम्ही ते केलेत तर छत्तीसावा चॅनेल पण त्याच वाटेने जाईल.

त्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत अशी फ्रेंडली यंत्रणा आहे का? >>> भारतात कोणती यंत्रणा फ्रेंडली आहे??

मी निषेध व्यक्त केल्यानंतर मीडिया मला बदनाम करणार नाही ह्याची शाश्वती आहे का?>>>> अशी शाश्वती कशी देता येईल??

मग माझ्यासाठी सोप्पी असणारी माध्यमे, जसे संकेतस्थळे, फेसबूक, ट्विटर हेच मी वापरणार ना?>>> हो त्याबद्दल काहीच म्हणणे नाही. सोशल मिडियाची ताकद कशी नाकरता येइल. कमीत कमी सोशल मिडिया वापरून निषेध व्यक्त करणे इतके तर आपण करूच शकतो.

बघणारे लोक आहेत म्हणुन हे चॅनेल वाले असे आहेत.
लोकांनी बघणे बंद केले तर चांगले चॅनेल निघतिलच.

जे विकले जाते तेच तयार केले जाते.

ट्विटर सारख्या सोशल मिडीया वरुन राजदीप सरदेसाई, त्याची बायको सागरिका घोष, बरखा दत्त वगैरे लोकांची त्यांच्या असल्या घोडचुकांबद्दल व्यवस्थित बिनपाण्याने करता येते. Wink

do they care? as long as they are getting their fat pay packets on regular basis, no need to care for twitter and facebook.

its most likely that the people who are paying these guys fat pay packets are interested in what these guys are delivering or rather they are the pushing force behind what these guys are deliverying. india is a vast country. even if a million stop watching, you still get another millions who watch...

ते पण खरं आहे. पण असल्या लोकांना वाटत असतं की आपण लय भारी, त्यांच्या ह्याच (उरल्यासुरल्या) विश्वासार्हतेला तडे द्यायला ट्विटर वगैरे संस्थळे बरी पडतात.

मिडिया चा अजून एक प्रताप-
शोभा डे च्या 'चिवचिवाट' नंतर IBN लोकमत ने महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तिची १ तास मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीत तिने तिच्या इंग्रजी मराठीत उत्तरे दिली. तो संपादक प्रचंड लाळघोटेपणा करत तिची तारीफ करत होता. ती पेड मुलाखत आहे हे लगेच काळात होते.

नमस्कार

Go back indian modia
असे आहे. ज्याप्रकारे ट्विट करून भारताने नेपाळला सांगितले भूकंप झाला आहे हे दाखवले गेले ती मुर्खपणाची सीमा होती
माझ्या देशात भूकंप झाला हे मला परदेशी व्यक्तिच्या ट्विट ने कळले या चुकीचे आणि बढाई मारणार्या बातम्यांना नेपाळी जनता कंटाळली होती. स्वत:च्या देशाचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी प्रचारक मिडीयाला लाथ घालून हकलून द्यायला सुरुवात केली. इंडीया टिव्ही या अजून कुठलेतरी वाहीनीवर किळसवाणा प्रकार बघितला होता त्यात भूकंप झाल्यावर लोकांनी काय कसे केले ते परत करायला लावले होते काय हलकटपणा होता
देशाची मान शरमेने या प्रचारक मिडीयामुळे खाली झाली.

साधना, आपल्या पोस्टशी सहमत, हक्कांच्या वेळी त्यांना आपण लोकशाहीचा स्तंभ असल्याचे आठवते आणि कर्तव्याच्या वेळी त्याला जागत नाहीत.

सुमुक्ता,
कमीत कमी सोशल मिडिया वापरून निषेध व्यक्त करणे इतके तर आपण करूच शकतो.
>>
हो, नक्कीच, आणि हे ताकदीने व एकजुटीने केल्यास यानेही फरक पडू शकतो.

सोशल मिडिया ही खरे तर कॉमन मॅनचे माध्यम आणि ताकद असायला हवी, जे आपल्याकडे तितकेसे दिसत नाही.

माझ्यामते मीडीयात काम करणार्‍या लोकांना प्रशिक्षण मिळत असावे पण संवेदना कशी जागृत करायची आणि कॉमन सेन्स कसे उत्पन्न करायचे ह्या गोष्टी काही शिकवण्यासारख्य नाहीत. मला तर मीडीयावाले लोक अत्यंत हायपर वाटतात. त्यांचे संवाद ऐकून आपले कान फाटतील की काय म्हणून मी फार वेळ मीडीया ऐकूच शकत नाही. आणि वारंवार एकच एक बातमी बघून बघून कमालीचा वीट येतो.

११/२६ उदा घडल्यावर खरे तर ह्या लोकांनी त्यातून काही शिकायला हवे होते पण अजूनही ही लोक तशीच आहेत.

थोडेसे अवांतर,

http://en.wikipedia.org/wiki/Short-term_effects_of_alcohol

Confusion (BAC = 0.18% to 0.30%)

"Profound confusion"
"Impaired senses"

Analgesia
Increased ataxia; impaired speech; staggering
Dizziness often associated with nausea ("the spins")
Vomiting (emesis)

Anterograde amnesia, colloquially referred to as "blacking out", is another symptom of heavy drinking. This is the loss of memory during and after an episode of drinking. When alcohol is consumed at a rapid rate, the point at which most healthy people's long-term memory creation starts to fail usually occurs at approximately 0.20% BAC, but can be reached as low as 0.14% BAC for inexperienced drinkers.

स्पॉक, मीडिया आऊट ऑफ काँटेक्स्ट कशा बातम्या देते ह्याचे उत्तम उदाहरण तुम्ही दिलेत!!

ज्या धाग्याचे उदाहरण तुम्ही दिलेत त्याच धाग्यावर तुम्ही मला प्रतिसाद म्हणून "तुमच्यासाठी हेमाशेपो." लिहिले होते. वर मलाच हिपोक्रसीचा अर्थ सांगत आहात!!

तुमचे सर्व प्रतिसाद ह्यानंतर इग्नोर करण्यात येतील!!

तुमचे सर्व प्रतिसाद ह्यानंतर इग्नोर करण्यात येतील!! >> ओह. व्हाट विल आय डु विथ माय लाईफ नाऊ. आय सो मच वेटेड फॉर युर कन्स्ट्रक्टीव्ह रिप्लाईस ऑल द टाईम.

आय कॅन फिल जेड स्मिथ फॅन्स नाऊ.

Pages