[माबोवर(जुन्या) पांढर्या ढोकळ्याची एकच पा.कृ सापडली. ती बरीच वेगळी आहे म्हणुन ही टाकली.]
तांदुळ - २ वाट्या,
उडदाची डाळ - १/२ ते १ वाटी (आवडी प्रमाणे),
पोहे - १ वाटी (जाड,मध्यम,पातळ कोणतेही)
हरबरा डाळ - ४ चमचे,
मेथी दाणे - १ चमचा,
आल+लसुण+हि.मिरची वाटणं - २ चमचे भरुन,
साखर्+मिठ - चवीप्रमाणे,
ताटलीला लावायला थोडे तेल.
तांदुळ, डाळी, पोहे आणि मेथी दाणे सगळे एकत्रच पाण्यात भिजत घालावे. साधारण ८-१० तास भिजवावे. मग गंधगाळ वाटुन घ्यावे. घट्ट झाकुन चांगले फसफसे पर्यंत ठेवावे. जास्तितजास्त बारा तासात फसफसते असा अनुभव आहे.
लसुण-आलं-मिरचीच वाटणं, साखर, मीठ घालुन पिठ चांगले हलवुन घ्यावे. ताटलीला तेल लावुन त्यात पिठ ओतावे. ताटली हलवुनच सारखे करावे आणि वाफवायला ठेवावे (मी ढोकळा स्टँड वापरते). साधारण १५ मिनीटात ढोकळा तयार होतो. कधी लवकरही होतो. वाफेचा रंग आणि वासावरुन अंदाज करता येउ शकतो.
बाहेर काढल्यावर ५ मिनीटांनी सुरीने रेघा पाडुन वरुन मोहरी आणी हिंगाची फोडणी घालावी. हवी असल्यास बारीक चिरुन कोथिंबीर घालावी.
या कृतीने ढोकळा अगदी पांढरा स्वच्छ आणि हलका होतो.
१.फोडणीत तिळ, जिरे पण चांगले लागतात.
२. पिठात साखर न घालता फोडणीत '२ चमचे साखरेचे' पाणी मिसळुन पण चांगली चव येते. पाण्यामुळे फोडणी ढोकळ्यात नीट शोशलीपण जाते.
३.जिने पा.कृ सांगीतली ती मैत्रिण वाटुन झाल्यावर २ चमचे दही घालुन ठेवते. पण मला ती चव जरा जास्तच आंबट वाटली म्हणुन मी आता घालत नाही.
प्रमाण आप्प्याशी मिळतजुळते
प्रमाण आप्प्याशी मिळतजुळते आहे... मस्त्च! मला पान्ढरा ढोकळा जास्त आवडतो..( शब्दखुणात खट्टा ढोकळा अॅड कर)
मस्त दिसतायत. तांदूळ आणि
मस्त दिसतायत.
तांदूळ आणि उडीदडाळ म्हणजे मसाला (आलंबिलं) इडलीच आहे की ही.
चव तशी लागत नाही इडली सारखी.
चव तशी लागत नाही इडली सारखी.
यम्मी
यम्मी
प्राजक्ता, केले. धन्यवाद
प्राजक्ता,
केले.
धन्यवाद
छान दिसताय्त पांढरे ढोकळे!
छान दिसताय्त पांढरे ढोकळे!
मस्त स्पॉन्जी दिसतायत!
मस्त स्पॉन्जी दिसतायत!
मस्तच ..
मस्तच ..
सोङा नाही घालायचय? सोङा न
सोङा नाही घालायचय? सोङा न घालता इतकी जाळी येते ढोकळ्याला
मस्त हलके दिसतायत ढोकळे.
मस्त हलके दिसतायत ढोकळे.
सुंदर. छान दिसतायेत. आई
सुंदर. छान दिसतायेत.
आई करायची असा ढोकळा आणि माहेरी शेजारच्या भाभीपण. मी क्वचित करते. आता करेन परत. आम्ही ह्यात थोडं आंबट ताक घालतो.
व्वाह! मस्स्स्स्स्स्त एकदम.
व्वाह! मस्स्स्स्स्स्त एकदम. मला हा पांढरा ढोकळा लै आवडतो. खमणवाल्यांकडे मिळतो. पण तो असा क्लासिक्क दिसत नै.
निल्सन, सोडा, कच्च तेल दोन्ही
निल्सन,
सोडा, कच्च तेल दोन्ही नाही घालायचय. पोह्यांमुळे हलके होत असावे.
वा मस्त दिसताहेत. इडली सारखे
वा मस्त दिसताहेत. इडली सारखे लागत असावेत का अस मात्र वाटल.
आम्ही पांढरा ढोकळा रवा वापरून करतो. जास्त फुगत नाही. पण उत्कृष्ट लागतो. रवा रात्रभर ताकात भिजवायचा आणि सकाळी नेहमी प्रमाणे ढोकळा करायचा.
स्वाती,सीमा, 'आपल ते चविष्ट'
स्वाती,सीमा,
'आपल ते चविष्ट' च्या नियमाप्रमाणे मल खरच यात इडलीची चव नाही लागली पण तशी शंका असेल तर उडदाच्या डाळीचे प्रमाण कमी करुन पण चालेल.
२ वाट्या तांदुळ, १ वाटी पोहे, १/२ वाटी उडीद डाळ. (३ वाट्यांना १/२ वाटी जास्त वाटणार नाही)
तसेही ती चिकटपणासाठीच वापरली आहे.
मस्त! मलाही आवडतो पांढो!
मस्त! मलाही आवडतो पांढो!
वा, फारच मस्त दिसतोय ढोकळा
वा, फारच मस्त दिसतोय ढोकळा
जर आले, लसुण, मिरचीचे प्रमाण
जर आले, लसुण, मिरचीचे प्रमाण छान असेल, जरा जास्त जीरे मोहरी कढीपत्ताघालुन फोडणी, ताजी कोथंबीर वारुन बारीक चिरुन. तर हा ढोकळा खुप छान लागतो. वाटण कमी पडले तर ईडली वाटते असं मला वाटतं. मी बर्याचदा कॉलेजमधे पोळीचा डबा भरुन हा ढोकळा नेते अन ५मिनटात मैत्रीणी डबा संपवतात ईतका आवडतो.
Mastach jamalaay. Hee kharee
Mastach jamalaay. Hee kharee paaranparik kruti. Instant mix laa hee chav yet naahee.
वा!! सुंदर!! नक्कीच करून
वा!! सुंदर!!
नक्कीच करून बघणार. मी बर्याचदा प्रयत्न केला आहे, पण वर बर्याच जणांनी म्हटलंय तसं इडलीची चव जाणवली बर्याचदा. म्हणजे हलका, चवीला छान वगैरे! पण खाणारे विचारतात की इडलीच्या पीठाचा ढोकळा केला आहे का
बाहेर मिळतो तसा खाटा ढोकळा नाही जमलाय. आता या प्रमाणात करून बघेन.
अतिशय सुरेख दिसतो आहे.
अतिशय सुरेख दिसतो आहे. अभिनंदन.
मग गंधगाळ वाटुन घ्यावे.>> हे म्हणजे काही खास आहे का? गंधगाळ म्हणजे नक्की कसे
मस्त दिसतोय इदडो (गुजराथी
मस्त दिसतोय इदडो (गुजराथी नाव)
पिठ ताटलीत घातल्यावर वरून जरा सढळ हाताने जीरेपूड, लाल तिखट आणि मिरपूड पेरायची . एकदम भन्नाट चव येते. फोडणीची पण गरज पडत नाही मग.
माधवजी नाव सांगितल्याबद्दल
माधवजी नाव सांगितल्याबद्दल धन्स.
आम्ही लाल तिखट, मीरपूड टाकतो
आम्ही लाल तिखट, मीरपूड टाकतो वरून. आता जिरेपूड टाकून बघेन.
हां... तो इदडा! तरलाबाई
हां... तो इदडा!
तरलाबाई म्हणतात की "Idada, here is non-fermented version of dhokla, for people with acidity and for jains. This can be made even faster than the khatta dhoklas."
छान पाककृती आणि फोटो एकदम
छान पाककृती आणि फोटो एकदम तोंपासू.......
आई खुपवेळा बनवते सफेद ढोकळा, पण ताक घालते आंबटपणा येण्यासाठी. तुमची पाककृती वेगळी आहे.
इदडो (गुजराथी नाव)>>>>> माझे सगळे गुज्जु मित्र मात्र नेहमी खट्टा ढोकळाच म्हणतात.
येस नरेशजी, खाटा ढोकळा म्हणतो
येस नरेशजी, खाटा ढोकळा म्हणतो आम्हीपण. ताक घालूनच करतो.
आरती, पाककृती आणि फोटो दोन्ही
आरती, पाककृती आणि फोटो दोन्ही खूप आवडलं. वाचल्या वाचल्या लागलीच डाळी भिजत घातल्या. उद्या ढोकळे.
मृण्मयी, सुभाषिणी, आम्ही पण
मृण्मयी,
सुभाषिणी,
आम्ही पण कॉलेजात एका मैत्रिणीच्या डब्यातले ढोकळे असेच फस्त करत असु. पण तीची आई डाळ-तांदुळ भाजुन पिठ दळुन वगैरे आणायची. ते काही जमत नव्हते माझ्यच्याने. मग एका दुसर्याच गुजराथी मैत्रिणीकडुन ही पा.कृ. मिळाली.
मंजूडी,
मी विकतचा खल्ला नाहीये पण हा ढोकळा ताक न घालता सुद्धा आंबट झाला होता.
नरेश, अन्जू
मी दही घालुन बघितले पण खुप जास्त आंबट वाटली चव. ही आंबट-गोड मस्त लागली.
माधव,
पुढच्यावेळी एका ताटलीत जीरेपूड, लाल तिखट आणि मिरपूड पेरुन बघेन
दिनेश,
हो, मी पण २-३ वेळा इंस्टंट करुन बघीतला पण नाही आवडला.
बी,
गंधगाळ म्हणजे गंधा सारखे मऊ आणि एकजीव.
पाककृती / फोटो आवडल्याचे
पाककृती / फोटो आवडल्याचे कळवल्या बद्दल सगळ्यांना धन्यवाद
Pages