ज्योतिषविषयक लेखमाला काही काळ थांबली होती. १४ एप्रीलच्या निमीत्ताने पुन्हा सुरु होत आहे. १४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे? याच उत्तर महामानव बाबासाहेब आंबेडकर हे तर आहेच पण मायबोलीवर आणि मायबोलीच्या बाहेर असे अनेक लोक असतील ज्यांचा वाढदिवस १४ एप्रिल आहे.
काय विशेष आहे १४ एप्रील मध्ये ? हे जाणुन घ्यायला हा लेख वाचायला हवा.
ज्योतिषशास्त्रात ५ महत्वाचे राजयोग केवळ ५ महत्वांच्या ग्रहांचे विषीष्ठ राशीत विषीष्ठ अंशात असल्याने होतात. लग्न किंवा राशी कोणतीही असताना हे राजयोग फलदायी होताना दिसतात.
कोणते पाच ग्रह आणि कोणत्या राशी ज्यात ग्रह विषीष्ठ अंशावर असता राजयोग होतो ?
मेषेचा रवि, वृषभेचा चंद्र, कर्केचा गुरु, मकरेचा मंगळ, मीनेचा शुक्र आणि तुळेचा शनी हे मुलत्रिकोण आणि उच्च राशीत असतात. पैकी मेषेचा रवि १० अंशापर्यंत बलवान असतो.
रवि हा सर्व ग्रहांचा राजा समजला जातो त्यामुळे रविचा राजयोग फारच प्रभावी असतो हे सांगणे नको.
गेले काही वर्षे रवि मेषेत १४ एप्रीलला प्रवेश करतो आहे. अजुन पुढची काही वर्षे तो करणार आहे. मेषेचा दहा अंशापर्यंतचा रवी १४ एप्रील ते २४ एप्रील दरम्यान असतो. अजुन काही वर्षांनी जशी संक्रांत पुढे जाते तसे १५ एप्रीलला रवि मेषेत येईल. माझ्या मते १४ एप्रीलला जो योग गेले कित्येक वर्षे येत आहे तो पुढे असणार नाही.याच कारण १+४ = ५ हा आकडा रविचा आहे. तसे १४ एप्रील नंतर २३ एप्रील असा दिवस येतो ज्या दिवशी ५ ही बेरीज येते. पण १४ एप्रीलला जी झळाली आहे ती २३ ला नाही.
माझ्या जवळ देशा- परदेशातल्या किमान २०० लोकांच्या कुंडल्या आहेत ज्यात १४ एप्रीलला लोक जन्माला आलेले असुन महापौर, राजादुत, उच्च अधिकारी, प्रथितयश नट, मंत्री इ. गोष्टी त्यांना प्राप्त झालेल्या दिसतात.
या दिवशी साधारण पणे दुपारी १२ च्या नंतर ज्याचा जन्म आहे किंवा कर्क लग्नावर ज्याचा जन्म आहे त्याच्या दशामात रवि येतो आणि तो देखील उच्चीचा. अश्या व्यक्तीला कितीही गरीब घरात जन्माला आला तरी उत्तम अधिकार, खास करुन सरकारी नोकरीत मानाची जागा, वहान इ. प्राप्त होताना दिसते.
रवि आणि राहु एकत्र असताना सुध्दा एका व्यक्तीला मी अनेक वेळा नगरसेवक होताना पाहिले आहे. त्याला निवडणुकीत फारच जागरुक रहावे लागते. राजकारणात अनेक वेळा हातचा घास निसटतो असे असले तरी तो आपले स्थान टिकवुन आहे.
या रविची आणखी खासीयत की ही व्यक्ती अनेक लोकांच्या मनात उत्तम जागा करुन रहाते. यामुळे अनेक चांगले व्यावसायीक योग निर्माण होऊन धनवान होताना दिसते. जे काही असते ते नक्कीच स्वकर्तुत्वाने असते.
या रविच्या सोबत शुक्र खुप वेळा मागच्या म्हणजे मीन राशीत उच्चीचा असतो. तो जर चुकुन २७ अंशाच्या जवळ असेल तर मग मात्र हे दोन ग्रह मिळुन माणसाला फारच उंचीवर नेतात. मीनेचा शुक्र कलासक्त असतो त्यामुळे नाटक, सिनेमा यात या व्यक्तीला उंची देतो सोबत या क्षेत्रातला अधिकार ही देतो.
कोणी आहे असा ज्याची जन्मतारीख खात्रीने १४ एप्रील आहे आणि ज्याला आयुष्यात काहीच प्राप्त झाले नाही ? माझा दावा नाही. असे असणार नाही. पण उत्सुकता नक्कीच आहे हे जाणुन घेण्याची की असा कोण आहे ?
छान माहितीपूर्वक लेख आहे. पण
छान माहितीपूर्वक लेख आहे. पण हाच मेषेचा रवी व्ययात असेल तर काय होईल? माझ्या मैत्रिणीच्या सहकार्याची पत्रिका आहे, तिच्या आईचा घटस्फोट झालाय, वडलाना तिने प्रत्यक्षात पाहिले पण नाही. रवि पितृसुखाचा कारक आहे, मग उच्चीचा असला तरी फायदा काय?
कोणी आहे असा ज्याची जन्मतारीख
कोणी आहे असा ज्याची जन्मतारीख खात्रीने १४ एप्रील आहे आणि ज्याला आयुष्यात काहीच प्राप्त झाले नाही ? माझा दावा नाही. असे असणार नाही. पण उत्सुकता नक्कीच आहे हे जाणुन घेण्याची की असा कोण आहे ?
>>>>>>> नितीनजी, माझा एक जवळचा मित्र आहे ज्याची जन्मतारीख १४ एप्रिल आहे.
त्याच्याबाबतीत तुम्ही म्हणताय तसे " आयुष्यात काहीच प्राप्त झाले नाही " अशी परिस्थिती नाही. पण आज घडीला तरी किर्लोस्कर मधील नोकरी (तीही एवढ्या ५-६ वर्षात लागलेली) सोडली तर त्याच्याकडे विशेष अस प्राप्त काही नाही.
रश्मीजी, तिच्या आईचा घटस्फोट
रश्मीजी,
तिच्या आईचा घटस्फोट झालाय, वडलाना तिने प्रत्यक्षात पाहिले पण नाही. रवि पितृसुखाचा कारक आहे, मग उच्चीचा असला तरी फायदा काय?
व्ययातला रवि हा वडीलांशी न पटणे, वडिलांनी घरातुन हाकलुन देणे इ. घट्ना दर्शवितोच. परंतु हा रवि अधिकार दिल्याशिवाय रहात नाही. दशामात रवि असताना जेव्हढा प्रबळ अधिकार मिळेल तितका नाही मिळणार पण ही व्यक्ती पुढे गेल्याशिवाय रहात नाही.
आबासाहेब,
जन्मसाल, वेळ आणि स्थळ कळविल्यास आणखी जाणता येईल.
व्ययातला रवि हा वडीलांशी न
व्ययातला रवि हा वडीलांशी न पटणे, वडिलांनी घरातुन हाकलुन देणे इ.>>>. लहान वयात वडिलान्चा मृत्यु पण सहन करावा लागतो.:अरेरे: माझे आजोबा आई १५ -१६ वर्षाची असतानाच गेले. माझ्या आईच्या पत्रिकेत व्ययात रवी आहे, उच्चीचा नाही, त्यामुळे बरेच कष्टात जीवन गेले. पण परमेश्वर पाठिशी असला की सगळे सुरळीत होते. श्री स्वामी समर्थ आमच्या पाठिशी असल्याने आज जीवन म्हणजे काय हे खोलवर समजलेय.
छान लेख. अधिक नविन माहिती व
छान लेख. अधिक नविन माहिती व दृष्टी मिळाली. धन्यवाद.
मस्त माहिती. माझ्या भाच्याचा
मस्त माहिती. माझ्या भाच्याचा जन्म १४ अप्रिलचा. तो सध्या ८ वीत आहे. त्यामुळे अजुन २० वर्षांनीच कळेल पुढे जाऊन काय मिळाले ते.
मस्त माहिती, पण माझा गोड भाचा
मस्त माहिती, पण माझा गोड भाचा १५ एप्रिलचा म्हणून मी जराशी खट्टू.
माझ्या पुतण्याचा जन्म १४
माझ्या पुतण्याचा जन्म १४ एप्रिलचा. कालच वाढदिवस साजरा केलाय. यंदा १० वीला गेलाय तो बघु काय होते अजुन पुढे.
पण १४ एप्रीलला जी झळाली आहे ती २३ ला नाही.
मी २३ एप्रिलची आहे.
नितिन छान लेख. आवडला.
नितिन छान लेख. आवडला. टेक्निकॅलिटिज फारश्या झेपल्या नाहीत पण तुम्ही म्हणता तसं एक उदा. मी डोळ्याने पाहिलं आहे. माझ्या एका कलिगचा वादि १४ एप्रिल. शिक्षण आणि डोकं उत्तम. ४-५ वर्षातच धडाधड प्रमोशन्स मिळवून वर गेला. ऑफिस पॉलिटिक्स मुळे नोकरी सोडावी लागली पण आता जिथे आहे तिथे ही उत्तम कामगिरी करतो आहे.
छानच माहिती नितीनजी! माझ्या
छानच माहिती नितीनजी!
माझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीचा वाढदिवस १४ एप्रिलचा.
माहेर सुखवस्तु.. वडील कॉलेजचे प्रिन्सिपॉल. आणि सासरच परिस्थिती मध्यम असली तरी तिचा नवरा दिल्लीत सरकारी अधिकारी. तिचे आता दिल्लीत २ फ्लॅट्स, गावाकडे ४ प्लॉट्स वै. पण तब्येतीच्या बाबतीत थोडी अनलकी! कायम आजारी असते.
बाय द वे...रवी केतु लग्नी असतील तर काय उपद्व्याप करतात ते ही सान्गा प्लीज!
१४ एप्रिलला आपल्या अॅडमीन
१४ एप्रिलला आपल्या अॅडमीन ह्या आय डी चा वाढदिवस असतो असे आत्ताच लक्षात आले.
अरे व्वा.... तर मग माझ्या
अरे व्वा.... तर मग माझ्या आयडीचा २० एप्रिल अस्तो..
छान माहिती एक शंका विचारतो.
छान माहिती
एक शंका विचारतो. शुक्र मीन राशीत २७ अंशाअच्य पुढे असेल आणि रवी मेषेत १० अंशाच्या आत असेल तर ' शुक्र ' अस्तंगत होईल ना? याने शुक्राच्या कारकत्वात फरक पडतो का ?
अमोल
मला इथे भेटा
१४ मे चे असे काही नाही का
१४ मे चे असे काही नाही का हो!!!
१४ डिसेंबर चं काही विशेष?
१४ डिसेंबर चं काही विशेष?
१५ मार्च बद्दल सांगा ना
१५ मार्च बद्दल सांगा ना प्लीज, अलबर्ट आईनस्टाईन १४ मार्चचे आहेत.
माझा १२ एप्रिलला असतो. काही
माझा १२ एप्रिलला असतो. काही विशेष?
रविचा राजयोग फक्त खात्रीने
रविचा राजयोग फक्त खात्रीने सध्या १४ एप्रीलला असतो. एकटा रवि ३६५ दिवसात १ फेरी पुर्ण करतो त्यामुळे तारखेवार बोलता येते.
अमोल केळकर - आपला मुद्दा बरोबर आहे. मीनेचा शुक्र अस्तंगत असता कलेच्या बाबतीत जरी जोरदार असला तरी वैवाहीक आयुष्याला फारसा चांगला नाही. रविच्या ( मेषेच्या ) साहचर्यांने कलेत अधिकार मिळवुन देईल पण..... वैवाहीक सुखात फलदायी रहाणार नाही. ( कुणीही वाचुन घाबरुन जाऊ नये. अस्तंगत शुक्र असता काही उपायांनी हा दोष घालवता येतो )
मी आर्या, रवी केतु लग्नी
मी आर्या,
रवी केतु लग्नी असतील तर काय उपद्व्याप करतात रास कोणती ? मेषेचा रवी १० अंशात असल्यास प्रगती नक्की होईल. वडीलांचे सुख लाभणार नाही. वडीलांपासुन लांब रहाणे, प्रेम नसणे इ गोष्टी अनुभवाला येतील. अरोग्याच्या तक्रारी नक्कीच असतील.
माझा बालमित्र आहे १४ एप्रिलचा
माझा बालमित्र आहे १४ एप्रिलचा आणि तुमचं वर्णन त्याला तंतोतंत लागू पडतं. घरची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. या मुलाने मधेच कॉलेज सोडलं, हाँगकाँगला एका दूरच्या नातेवाईकाकडे गेला. तिथे काहीतरी दुकानात काम करत होता वगैरे. काही वर्षं ढोर मेहनत केली. आज तो मुलगा युरोपमधे आहे, प्रचंड श्रीमंत झाला आहे.
Mazya best frnd chi lahan
Mazya best frnd chi lahan bahin ahe १४ April chi, vadil ti ३ astanach warle pan mothya bahinicha financial support n hushari mule ti IT engineer ahe ata apekshe peksha ati shrimant mulashi lagn houn US La geliy
मी पण १४ एप्रिलची. बालपण
मी पण १४ एप्रिलची. बालपण मजेत. तरूणपण खुप कष्टात. मुलगा ५ वष असल्यापासुन सिन्गल पेरेंट. पण आता चांगली परिस्थिति. मुलगा , सुन इंजिनिअर. पण अरोग्याच्या तक्रारी आहेत.
१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब
१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरां चा वाडदिवस आहे. त्य्यंची कुंडली काय म्हणतेय ?