टाटा स्काय (पुणे विभाग) - एच डी चॅनेल्स दिसतायत का?

Submitted by mansmi18 on 8 April, 2015 - 09:54

टाटा स्काय (पुणे विभाग) - एच डी चॅनेल्स दिसतायत का?

आमच्याकडे (बाणेर बालेवाडी) गेले ७ दिवस एच डी चॅनेल्स दिसत नाही आहेत. कस्टमर सर्विस वर एस एम एस केले तर "तुमच्याकडे सर्विस इंजिनीयर लवकरच येइल" असा मेसेज आला पण कोणीही आले नाही. टाटा स्काय अपग्रेड करत आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे असे सांगत आहेत पण ते कधी संपणार कळत नाही आहे.(अकाउंट वर त्यांनी क्रेडीट दिले आहे पण चॅनेल पहायला मिळत नाही हा मेन प्रॉब्लेम. एकदा HD ची सवय झाल्यावर साधे पाहवत नाही Happy )

कोणाला माहिती असल्यास लिहाल का प्लीज?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी टाटास्काइ काढून "डिश टिव्हिचा" +चा से टाप लावला रु १२००,(एचडिवाला नाही)पेनड्राइव(कितीही gb अथवा हार्ड डिस्क) लावून रेकॅार्डिंग करता येते.२२५,२७५रुच्या पॅकेजात बरेच कामाचे चानेल दिसतात +DTHचेही दिसतात.

बापरे, ओवाळायचे ऐवजी "आवळायचे" झालेय, च्यामारी भलताच पीजे झाला, म्हंजे अगदी " समारंभाच्या सुरुवातीस नऊ सुवासिनीनी मा. शरद पवार याना आवळले" या छापाचा पीजे झाला.

आमाला दिवसातुन तीन चार वेळा टास्काचा समस येतो
" आमचे तंत्रद्न्य तुमच्या कडे येवु शकत नाहीयत त्याबद्दल सॉरी ! पण या विलंबाबद्दल भरपाई म्हणुन तुमचे सबस्क्रीपशन दोन दिवसानी फुकट वाढवुन देत आहोत. आता असे फुकटचे सहा दिवस आमच्या खात्यात जमा झाले आहेत. काय म्हायती नक्की देतील की नाही !

आमच्या सेटवर ग्राहक क्र. अन बिलींग चुकीचे दाखवले जात आहे. कश्याला डोक्याला त्रास म्हणुन अजुन त्यांच्या कडे कसलीच चौकशी केली नाहीय. डोसक्यात टास्काचे फारच विचार यायला लागले तर, सरळ रामदेव बाबांच्या फोटोसमोर जाउन बसतो व मेडीटेशन सुरु करतो.

टाटा स्कायच्या कुठल्याही इंजीनीअरला आपण पैसे द्यायचे नसतात. ते पैसे सरळ आपल्या अकाऊंटमधून डीडक्ट केले जातात. आमचा एक रिओट खराब झाल्यानं दुसरा रीमोट मागवला तर दुसर्‍या दिवशी सकाळी इंजीनेअर घेऊन आला आणि पैसे घेतले नाहीत. एचडी सेट टॉप बॉक्सला अपग्रेड केल्यावर सुद्धा त्यांनी पैसे घेतले नाहीत. उलट कुणी हाती पैसे मागितले तर त्याची सरळ तक्रार करा म्हणाले.

सध्या अपग्रेडेशनमुळे खरंच खूप लोड आलेला आहे. पुणे मुंबई जिथं टाटा स्कायचं पेनीट्रेशन जास्त आहे, तिथं इंजीनीअर्स अपुरे पडतायत. आमच्या गावामध्ये मात्र सकाळी फोने केला की संध्याकाळी येऊन नीट करून जात आहेत.

Pages