Submitted by हर्ट on 6 April, 2015 - 06:10
विषयात म्हंटल्याप्रमाणे पुणे आणि मुंबई शहरात असलेल्या उत्तमोउत्तम कॅफेजची इथे यादी तयार करायला कृपया मदत करा. धन्यवाद.
अलिकडे उषा खन्ना ह्यांचे 'कॅफे समोवर' बंद झाले. हे नाव कधी ऐकले नाही. पण नंतर हे आहे तरी काय हे गुगल करुन पाहिल्यानंतर आपण काहीतरी मिस केले असे वाटत राहिले आहे. तसे गुगल करुन पाहिले तर खूप काही मिळेल पण इथे खास कुणी माबोकरांनी रेकेमेन्ड केलेले कॅफे असेल तर त्याचे महत्त्व गुगलपेक्षा मला जास्त वाटते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओसी बंद झाल्याचे समजल्यावर मी
ओसी बंद झाल्याचे समजल्यावर मी दुखवटा केला होता.... पुलाव, करी, मुळात जागा बाहेरचा व्हरांडा....
निधप ची लिस्ट भन्नाट आहे.
निधप ची लिस्ट भन्नाट आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या
सदाशिव पेठ मध्ये पेरुगेताजवळ ओम नर्मदेश्वर आहे. सकाळी कांदेपोहे उपमा चहा सुंदर. तिथल्या कट्ट्यावर अनेक वर्ष TP केलाय. अजूनही आम्ही मित्र शनिवार-रविवारी सकाळचा कट्टा तिकडेच भरवतो.
तिथेच पुढे जबरेश्वर पण आहे.
टिळक रोड वरच रामनाथ - भाजी मिसळ चहासाठी आणि समोरच तिलक.
तिलक >>> ३ वर्ष आमचा कट्टा
तिलक >>> ३ वर्ष आमचा कट्टा होता. पावपॅटीस - चहा भारी असतं. बसायला जागा नाही, तरी त्या जागेतच कट्टा पोटेंशियल आहे. तिलकच्या समोरच एका दिवंगत ज्येष्ठ मराठी कलाकाराचे घर आहे (की होते !), लोकांच्या कलकलाटाने वैतागून शिव्या घालताना ही त्यांना पाहिले आहे.
मित अरे शरद तळवळकर रहायचे
मित अरे शरद तळवळकर रहायचे त्या घरात अस आठवतय मला. तिलक च्या खाद्यपदार्थान्चा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच !
तिलक चालू आहे अजून?
तिलक चालू आहे अजून?
टिस्माच्या बाजूला गो गा समाजाच्या गल्लीच्या तोंडाशी मुक्ता म्हणून एक हॉटेल होते काही दिवस. आमच्या एका नाटकाच्या तालमी टिस्माला चालायच्या. संपूर्ण दिवस आणि मग पुढे नाटक ओपन झाल्यावर बरेचसे पुण्यातले प्रयोग टिस्माला. प्रयोगाआधीच्या तालमीही टिस्माला असत. त्या वर्षभरात मुक्ता होते. आणि आम्ही तिथे य टाइमपास केलाय. मग आमचे प्रयोग यथावकाश बंद झाले. त्यामुळे कंटाळून त्यांनी मुक्ताही बंद केले असावे
तिलक चालू आहे अजून. मागच्या
तिलक चालू आहे अजून. मागच्या भारतवारीत मुद्दाम थांबून पावपॅटीस हाणला. आजूबाजूला अजुन २-३ हॉटेल्स झालीयेत. त्यामुळे तो जुना निवांत लूक गेला.
तिलक आमचा पण कट्टा होता. थोडे
तिलक आमचा पण कट्टा होता. थोडे दिवस चाणक्य मंडलला होतो म्हणून तिलकपाशी जमायचो. मग ते संपले तरी भेटण्याची जागा म्हणून तिलक तसेच होते.
दुसरा कट्टा म्हणजे केएनपी - कमला नेहरू पार्कच्या बाहेरचा चहावाला. त्याच्याकडे सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही चहा प्यायलो आहे आणि गप्पा हाणल्या आहेत. तो तर घसा बरा नसेल तर हळद-दूध पण द्यायचा खास.
कॉलेजच्या दिवसांत मोठ्या कॉफी शॉप मध्ये जाण्याइतके पैसे ही नसायचे मग या चहाच्या टपर्याच कट्टे असायचे
कर्वे रोडवर मृत्युंजयेश्वर
कर्वे रोडवर मृत्युंजयेश्वर मंदीरासमोर एक स्वीकार नावाची टपरी आहे, तिथे पोहे, उपमा, मिसळ, वडा-सांबार व इतर अनेक पदार्थ जबराट मिळतात.
एमआयटी ला असताना पडीक असायचो तिथे.
तो तर घसा बरा नसेल तर हळद-दूध
तो तर घसा बरा नसेल तर हळद-दूध पण द्यायचा खास. <<
मुंबईत सगळीकडे मिळतो की नाही माहीत नाही पण आविष्कारच्या जवळचा चहावाला घशाला त्रास होत असेल तर उकाळा नामक प्रकरण द्यायचा. काय होतं कुणास ठाऊक(सुंठ नक्की होती एवढं आठवतंय.) पण प्रयोगात आवाजाचे प्रॉब्लेम्स गुल्ल असायचे.
स्वीकार नावाची टपरी >>> +१
स्वीकार नावाची टपरी >>> +१ मंदार. डोसा पण मस्त मिळतो तिथे.
केएनपी >>> क्लब सँडविच
तिलकचा समोसा मस्त! पण आमचा कट्टा एसपी शेजारचं एस एस होता. तिथला वडापाव आणि चहा. आहा!
बाहेरचं खाणं बर नाही. चांगलं
बाहेरचं खाणं बर नाही. चांगलं नसतं ते तब्येतीला ....
तिलकचा ब्रेड पॅटीस समस्त
तिलकचा ब्रेड पॅटीस
समस्त बेहेरे क्लासच्या जनतेचा आधार.. तिथेच विट्ठ्ल मंदिरासमोर एक वडापावची गाडी लागायची (?) सहानंतर. काय भारी वडापाव असायचा..
तुमची चर्चा छान सुरु आहे पण
तुमची चर्चा छान सुरु आहे पण मला पत्ते हवे आहेत तेंव्हा प्लीज त्या जागेचा पत्ता लिहायला विसरु नका.
मी पुणेकर नाही आहे. मी मुळचा अकोल्याचा आहे.
एसपी शेजारचं एस एस .... वा
एसपी शेजारचं एस एस .... वा काय आठवणि जाग्या झल्यात... तिथला सामोसा पाव आणि चहा.... B.com ची पाचहि वर्श तिथेच काधलि आहेत.
एसपी शेजारचं एस एस .... किती
एसपी शेजारचं एस एस .... किती वडा पाव खाल्ले असतील मी तिथले
पण दर्जेदार कॅफे च्या हेडिंग खाली नाही येवू शकत . मस्त पैकी कट्टा किंवा टपरीच ती
(दर्जेदार किंवा बिनदर्जाचे ही
(दर्जेदार किंवा बिनदर्जाचे ही )
कॅफे म्हणजे नक्की काय?
एस एस चा सामोसा पाव एकदम भारी
एस एस चा सामोसा पाव एकदम भारी लागायचा.. आणि हे कॉम्बिनेशन फक्त तिथेच खाल्लय..
कॅफे म्हणजे नक्की
कॅफे म्हणजे नक्की काय?
>>
माझ्या खेडवळपणाच्या काळात कॉलेजला शहरात आलो तेव्हा सायकलवर जाताना कॅफे ग्रीन नावाची टपरी पेक्षा मोठी , शिमिटाच्या भिंती असणारी एक कलाकृती दिसे . तिथे हिरवी कॉफी मिळते असे माझा एक मित्र सांगत असे. कॉफी ची आवड, चव्,व्यसन , पैसे काहीच नसल्याने आम्ही तेथे जात नसू. त्या काळी दहा पैशाला चहा मिळे. गावात एक कथित उच्च्भ्रू हॉतेल होते. तिथे दोन रुपयाला चहा मिळतो ही आमच्या दृष्टीने डोळे विस्फारून चर्चा करण्याची गोष्ट असे.आणि हा चहा कसा असेल याची चर्चा चाले. आमचा लीग गुरुदत्त टी सेन्टर, जयहिंद टी सेन्टर. म्हणजेच 'दोन इस्संव बीस पैसा' वाला' .सिनेमा १ रु. ५ पैसे. लोअर स्टॉल असे. ट्याक्स फ्री असेल तर ६६ पैसे.
ईस्ट स्ट्रीटपासच्या बर्गर
ईस्ट स्ट्रीटपासच्या बर्गर किंग वरून गोळीबार मैदानाकडे जाताना डावीकडे एका प्रशस्त बंगल्याच्या प्रशस्त आवारात कडाप्प्याची टेबलं आणि बाकं असलेला कॅफे जॉज... आत एक चोवीस तास चालू असणारा एम्टीव्ही आणि पूल टेबल आणि बाहेर अंगण. पडीक रहायचं अल्टिमेट ठिकाण. बंद झाल्यावर फार वाईट वाटलेलं
वैशाली!!! १९८३-८४ मध्ये
वैशाली!!! १९८३-८४ मध्ये बाहेर बसायची निवांत सोय होती. रस्त्यावर झाडे भरपूर. एक बारीक पानांचे झाड होते. तिथे बाहेर बसून कॉफी प्यायची. मित्र मैत्रीणींची बडबड ऐकायची. येणारी जाणारी लिंगनिरपेक्ष हिरवळ बघायची. ह्या सर्वात मजा म्हणजे वरून हलके हलके पडणारी ती बारीक कलाकुसर करणारी पिवळी पाने!
शेजारच्या गल्लीत टोकाला मैतरणीचे घर. समोर एफ सी. अजून काय पाहिजे.
अजूनही कुठे डोक्यावर बारकी पाने पडली , वारा आला कि वैशालीतले ते निवांत क्षण आठवतात. आता तिथे जी गजबज पुरी आहे त्यात बसवत नाही.
वरदा आता तर तो रस्ता पण वनवे
वरदा आता तर तो रस्ता पण वनवे झाला आहे.. त्यामुळे बर्गर किंग कडून गोळीबार मैदानाकडे असे जाताच येत नाही... .गोळीबार मैदानाकडून बर्गरकिंगकडे जाताना उजवीकडे असा उल्लेख करावा लागेल.. जॉर्ज मस्त ठिकाण होते पण...
आता तिथे जी गजबज पुरी आहे
आता तिथे जी गजबज पुरी आहे त्यात बसवत नाही.
>>
मामी साहिबा,
आता तिथेही नंतर खाणारे लोक तुमच्या मागे येऊन उभे राहून तुम्हाला टेन्शन देण्याच्या स्थितीला आले आहे::फिदी:
George was a great venue to
George was a great venue to go on a date.
पण इथे खालच्या लिंक वर तर ६
पण इथे खालच्या लिंक वर तर ६ दिवसांपुर्वीचा अभिप्राय सांगतो आहे george असून सुरु आहे:
https://www.zomato.com/pune/george-restaurant-east-street
बी आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत
बी आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत ते जॉर्ज वेगळे आहे.. आणि हे जॉर्ज वेगळे आहे..
himya, me mhanatey te Jaws
himya, me mhanatey te Jaws hota re.... George vegala
जॉज रात्री उशीरापर्यंत चालू
जॉज रात्री उशीरापर्यंत चालू असायचं असं आठवतंय. मनसोक्त भटकंती करून झाल्यावर तिथल्या जंबो बर्गरने पोटातली भूक शांत करायची.
ब्लू डी चे कॉफी हाऊस रात्रभर चालू असायचे. तिथे रॉयल वातावरणात ऐटीत बसून पॉट टी मागवायचा आणि सँडविचेस. त्या बेगमीवर तिथे पहाटे चार - साडेचारपर्यंत बसायची सोय व्हायची सर्व ग्रुपची. मग उजाडायच्या अगोदर वानवडी किंवा कोंढवा परिसरातील टेकड्यांकडे प्रयाण व तिथून सूर्योदय पाहून घरी येऊन तण्णावून देणे हे कधीकाळचे 'चिल आऊट' (नाईट आऊट) होते.
आय एम डी आर ची कॅन्टीन पण छान
आय एम डी आर ची कॅन्टीन पण छान आहे ना.. मी तिथे १९९५ मधे सलग वर्षभर गेलेलो आहे. ती कॅन्टीन आणि तिथला क्राऊड दोन्ही अप्रतिम होते तेंव्हा. रुपाली समोर एक बोळ लागते ती सरळ सरळ चालत गेलो की चढ लागतो आणि उजव्या बाजूला आय एम डी आर. त्या समोर छोट्या छोट्या लोटगाड्यांवर सुद्धा खूप छान पदार्थ मिळायचेत. आता माहिती काय अवस्था आहे तिथे पण पुर्वी सारखे पुणे वाटतच नाही.
जॉज म्हणजे त्याच बंगल्यात
जॉज म्हणजे त्याच बंगल्यात वरती पॅन्टॅलून्सची शोरूम होती काही काळ तेच ना?
रुपाली समोर एक बोळ लागते
रुपाली समोर एक बोळ लागते <<<
बोळ???
Pages