Submitted by योकु on 5 April, 2015 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
- मूठभर कोथिंबीर
- त्याहून थोडा जास्त पुदीना
- शेंदेलोण / काळं मीठ
- आमचूर पावडर १ लहान चमचा / जलजीरा पावडरं चं रेडीमेड पाकीट १ सर्वींगवालं - १
- लिंबू
- थोडं भाजलेलं जिरं / जीरा पावडर (पण ही जीरे भाजून केलेली असेल तर जास्त चांगलं)
क्रमवार पाककृती:
- कोथिंबीर, पुदीन्याची पानं स्वच्छ धूवून ओबडधोबड चिरावी
- मिक्सरच्या लहान भांड्यात कोथिंबीर, पुदीना, आमचूर, काळं मीठ, भाजलेलं जीरं घ्यावं. यात अर्धे लिंबू पिळावं.
- गंधासारखं गुळगुळीत वाटावं.
- एका मोठ्या भांड्यात ही चटणी घालावी, वर बेतानी चिल्ड पाणी ओतावं. चव पहावी अन काही हवं असेल तर अजून घालावं.
- थंडगार सर्व करावं.
वाढणी/प्रमाण:
वरील प्रमाणानुसार साधारण साईजचे ४ ग्लास होतं
अधिक टिपा:
- उन्हाळ्याकरता मस्त आहे हे. साखर नसल्यानी हवं तेव्हढं घेता येतं. मीठ सुद्धा कमी करता येईल पथ्य असेल तर.
- हवं असेल तर प्लेन सोडाही घालता येईल चिल्ड करून
- मूळ रेसीपी इथे पाहाता येईल
माहितीचा स्रोत:
संजीव कपूर्स कीचन
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
अरे व्वा! फारच सोप्पी आहे
अरे व्वा! फारच सोप्पी आहे पाकृ!
करुन बघायला पाहिजे.
मस्त, मला यात सोडा घालून
मस्त, मला यात सोडा घालून प्यायला आवडते
आमच्या लहानपणी गाड्यांवर
आमच्या लहानपणी गाड्यांवर विकायला असे ह्यात फ़क्त एक बदल असायचा लिंबु वजा होत असे गंधासारख्या चटणी मधे बऱ्यापैकी हिरव्या मिरच्या असत अन चिल्ड पाणी हे साधे न असता बिनसाखरेचे उकडलेला कैरी गर मिसळलेले असे , ते आंबट तिखट पाणी ही भारी लागत असे
सोप्पय !
सोप्पय !
थोड्या पाणी पुरी वाल्या पु-या
थोड्या पाणी पुरी वाल्या पु-या आणाव्या, आणि उरलेला जलजीरा संपवावा.
त्या जलजीरा पेक्शा तो ग्लासच
त्या जलजीरा पेक्शा तो ग्लासच खुप छान आहे.
मस्तं रेस्पी. जिंजरेल घालून
मस्तं रेस्पी.
जिंजरेल घालून ऑन द रॉक्स प्यावं.
(No subject)
मॅक चांगला दिसतोय मागचा..
मॅक चांगला दिसतोय मागचा..
मस्त आहे . आवडली रेसीपी. मी
मस्त आहे . आवडली रेसीपी. मी नेहमी तयार जलजीरा मसाला आणत होते. आता असं करून पहाते.
ग्लास चांगला आहे. पण जलजीर्यापेक्षा नक्कीच नाही.
Mast..... bghunach thandavale
Mast..... bghunach thandavale dole. nakki karun pahin.