Submitted by प्रकु on 4 April, 2015 - 13:00
नमस्कार मित्रहो,
माझ्या एका मैत्रिणीचे नुकतेच(२०१४) मेकॅनिकल इंजीनीयरिंग झाल आहे. कॅम्पस मधून तिला नोकरी लागली आहे. परंतु तिला MSc mathematics करायचे आहे. याकरता पर्यायांची चाचपणी करत आहे. योग्य पर्याय कोणता ते कृपया सुचवावे. तसेच इतर काही वाटल्यास सुचवावे.
direct MSc ला ज्या चांगल्या कॉलेजेसच्या प्रवेशपरीक्षा देणे (इंजीनीयरिंग नंतर) शक्य असेल अशी नावे कृपया तर सुचवावीत.
वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार . __/\__
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्युअर सायन्स करायचे होते तर
प्युअर सायन्स करायचे होते तर इंजी. का केले?
मैत्रीणीला सल्ला देणे हे थर्ड पार्टी होणार नाही काय?
असल्या थर्ड पार्टी सल्ल्यावर तिने का विश्वास ठेवावा.
हातात असलेली नोकरी सोडून कॉलेज मध्ये lecturer ship का करावी?
हे विचारण्याचा हेतू चांगला आहे, बाकी बेस्ट ऑफ लक.
जूनियर कॉलेज ला शिकवायचे
जूनियर कॉलेज ला शिकवायचे असल्यास बी एड पण करावे लागेल ना?
माझ्या ओळखीत दोन जणींनी इंजीनियरिंग नंतर बी एड केले आहे पण त्या माध्यमिक शाळेत शिकवतात की ज्यू कॉलेज ला ते माहीत नाही.
तुमच्या मैत्रीणीला करियर का बदलावयाचे आहे याबद्दल ऐकायला आवडेल.
अरभाट नावाचा एक यूजर आयडी आहे
अरभाट नावाचा एक यूजर आयडी आहे तो शोधा. त्याने इंजिनीयरींग नंतर गणितात पीएचडी केली आहे आणि तो शिक्षण क्षेत्रात काम करतो. त्याला संपर्क करु शकता
मॅथेमॅटीक्स >>>> मास्टर्स
मॅथेमॅटीक्स >>>> मास्टर्स डिग्री >>>>>>पीएचडी >>>>>>>> बुहुहुहुहुहुहुहुहुहु हुहुहुहुहुहुहुह्हुहु !!!!! बच्चें की जान लोगे क्या ?
.
.
जर "मास्तर"कीच करायची होती तर
जर "मास्तर"कीच करायची होती तर इंजीनियरिंग का केलं ते समजत नाही
@ वत्सला , प्रतिक्रियेबद्दल
@ वत्सला ,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
जूनियर कॉलेज ला शिकवायचे असल्यास बी एड पण करावे लागेल ना? ----> मला वाटते ते शाळेत शिकवण्यासाठी कराव लागत. तरी अजून चौकशी करतो.
तुमच्या मैत्रीणीला करियर का बदलावयाचे आहे याबद्दल ऐकायला आवडेल. ----> विपु करतो. धाग्याचे विषयांतर होऊन भलतीकडे जाईल
आभार ! __/\__
अहो नाशिककर , मी पण नाशिककर
अहो नाशिककर , मी पण नाशिककर __/\__
पाषाणभेदला दिलेल्या उत्तरात आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
@ टन्या ,
@ टन्या ,
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत... खूप खूप आभार __/\__
प्रतिक तुमच्या गफ्रे चा
प्रतिक तुमच्या गफ्रे चा निर्णय योग्य आहे, चूका सुधारण्याचि वेळ अजुन गेली नाहीय. थोड़ा वेळ वायाजाईल पण पुढचे नियोजन मनासारखे होईल. तुम्हाला शुभेच्छा.
मंडळि नो, engग ला का गेली हां प्रश्न का विचारताय? १० वि नंतर मुलानी काय करावे हां निर्णय बहुतांशी पालक घेतातहे माहीत नाही का?, ज़रा बरे मार्का असतिल तर मुले डॉ किन्व़ा इन्गिनीर झाल्याची स्वप्ने आइबाबाना पडतात. मुलाला कशात रस आहे हे कोणीही लक्षात घेत नाहित. अर्थात याला अपवाद आहेत पण ते केवल अपवादच.
रच्याकने, गणित च शिकवणार आ आग्रह नसेल तर अभियांत्रिकी शिकून ती एखाद्या अभियान्त्रीकी कॉलेज किंवा पॉली टेकनिक मध्ये शिकवू शकते.
@ साधना, समजून घेतल्याबद्दल
@ साधना, समजून घेतल्याबद्दल मनापासून आभार ! __/\__
चूका सुधारण्याचि वेळ अजुन गेली नाहीय >> +१
थोड़ा वेळ वायाजाईल पण पुढचे नियोजन मनासारखे होईल. तुम्हाला शुभेच्छा. >> वेगळी वाट निवडताना पाठींबा देणारे कमी असतात. तुम्ही दिलात. आभारी आहे.
गणित च शिकवणार आ आग्रह नसेल तर अभियांत्रिकी शिकून ती एखाद्या अभियान्त्रीकी कॉलेज किंवा पॉली टेकनिक मध्ये शिकवू शकते. >>> हा एक पर्याय म्हणून ठेवलेला आहेच. पण गणिताला पहिला preference आहे. बघूया अजून काय काय होतंय ते
GATE ची परीक्षा दिल्यावर काही
GATE ची परीक्षा दिल्यावर काही शिक्षणसंस्थांमध्ये थेट एम. एस्सी. चा पर्याय उपलब्ध आहे. त्याकरिता त्या परीक्षेचे माहितीपुस्तक मिळवून वाचावे. त्यात सविस्तर माहिती आहे.
bsc second yearला प्रवेश
bsc second yearला प्रवेश घ्यावा लागेल असे वाट्ते.लेक्चरर व्यायचे असल्यास बी.एड् करावे लागेल.तुमच्या मैत्रिणीला नीट विचारपुर्वक निर्णय घ्यायला सांगा.
@ चेतन ,
@ चेतन ,
धन्यवाद !
या उत्तराचा नक्कीच फायदा होईल .. कारण ती GATE qualified आहे , हा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो.
@ धिरज, bsc
@ धिरज,

bsc second year ला प्रवेश घ्यावा लागेल असे वाट्ते.लेक्चरर व्यायचे असल्यास बी.एड् करावे लागेल. >>> होय हो! बहुतेक कराव लागत अस दिसतय. बघतो चौकशी करून..
तुमच्या मैत्रिणीला नीट विचारपुर्वक निर्णय घ्यायला सांगा. >>> नक्कीच
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
मित्रहो , वत्सलताई आणि धिरज
मित्रहो ,
वत्सलताई आणि धिरज यांनी सुचवल्याप्रमाणे , बी. एड. करण्याबाबद माहिती काढली.
ज्युनियर कॉलेज साठी बी एड करावेच लागते असे कळाले..
सध्यातरी बी एड करण्याचे मनात नाही.
त्यामुळे ज्यू कॉलेज चा पर्याय रद्दबादल ठरवत आहे..(मूळ प्रश्नात बदल करून ज्यू कॉलेज काढून टाकले आहे)
त्याएवजी MSc करून इंजिनियरिंग कॉलेज मध्ये गणित शिकवावे या पर्यायाचा विचार करतो.
म्हणजे बी.एड.ची भानगड राहणार नाही .. तसेच गणित शिकण्याची शिकवण्याची आवड सुद्धा पूर्ण होईल ...
MSc ला कुठे आणि कसा प्रवेश मिळवता येईल त्याबाबद अजून काही माहिती/ suggestions असल्यास पोस्टी पाडाव्यात.. धन्यवाद ..
मित्रहो , वत्सलताई आणि धिरज
मित्रहो ,
वत्सलताई आणि धिरज यांनी सुचवल्याप्रमाणे , बी. एड. करण्याबाबद माहिती काढली.
ज्युनियर कॉलेज साठी बी एड करावेच लागते असे कळाले..
सध्यातरी बी एड करण्याचे मनात नाही.
त्यामुळे ज्यू कॉलेज चा पर्याय रद्दबादल ठरवत आहे..(मूळ प्रश्नात बदल करून ज्यू कॉलेज काढून टाकले आहे)
त्याएवजी MSc करून इंजिनियरिंग कॉलेज मध्ये गणित शिकवावे या पर्यायाचा विचार करतो.
म्हणजे बी.एड.ची भानगड राहणार नाही .. तसेच गणित शिकण्याची शिकवण्याची आवड सुद्धा पूर्ण होईल ...
MSc ला इजीनीयरिंग नंतर direct प्रवेश शक्य आहे असे सुद्धा कळाले . त्यामुळे तूर्तास BSc विषय थोडा बाजूला ठेवत आहे. (मूळ प्रश्नात बदल केला आहे)
MSc करण्याकरता इजीनीयरिंग नंतर प्रवेश घेता येईल अशा कॉलेजेस ची नावे सुचवावीत.
धन्यवाद ..
चेन्नई मॅथेमॅटिकल
चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंग केले असले तरी M.Sc. मॅथ्स करता येते. त्यांची एक परीक्षा द्यावी लागेल जी साधारण गेट सारखीच असते. अनेक देशांतर्गत संशोधन संस्था इंजिनिअरिंग केले असले तरी प्युअर सायन्स मध्ये संशोधन करण्याची इच्छा असेल तर प्रवेश देतात, जरूर ती परीक्षा दिली म्हणजे झाले.
@ पायस ,
@ पायस ,
धन्यवाद ! या संस्थांच्या websites चाळून पाहतो.
१ आय आय
१ आय आय टी
http://www.successcds.net/Admission-Notification/IITJAM/Joint-Admission-...
Bachelor's degree with Mathematics as a subject for at least two years/four semesters.
Read more at: http://www.successcds.net/Admission-Notification/IITJAM/Joint-Admission-...
यात इंजिनिअरिंग येत असावे..
२ पुणे विद्यालय
http://math.unipune.ac.in/Courses_2.htm
M. Tech(Industrial Mathematics with Computer Applications) : 3 years
वेगळाच कुरसे आहे
Eligibility Criteria:
B. Sc. (Mathematics) or any Science graduate with Mathematics at least up to second year or B.C.S./B. E./B. Tech./ B.Sc. (Engineering).
प्रतिक कुलकर्णी, तुमच्या
प्रतिक कुलकर्णी,
तुमच्या मैत्रिणीला इंडस्ट्रियल इंजिनियरिंग व/वा ऑपरेशन्स रिसर्च मध्ये रस आहे का? असल्यास गणितात एमेस्सी करायची गरज पडू नये असे वाटते.
आ.न.,
-गा.पै.