अमेरिकेतील युनिवर्सिटी सिलेक्शन बद्दल ..

Submitted by mansmi18 on 6 March, 2015 - 21:11

नमस्कार,

माझ्या परिचयातील एका विद्यार्थ्याला अमेरिकेतील विद्यापीठ्/कॉलेजांबद्दल (For MS - Computer Science) माहिती हवी आहे. मी नेटवरुन पाहुन माहिती गोळा केली आहे पण आपल्यापैकी कोणी अनुभवी असतील तर त्यांच्याकडुन फर्स्ट हँड माहिती मिळाली तर आवडेल.
त्याची अपेक्षा ३२०० पर्यंत स्कोर यायची आहे.(अ‍ॅवरेज). त्याने पुढील काही युनिवर्सिटी short list केल्या आहेत. त्यामधे
1.Quality of Education,
2.Safety (considering recent incidents I suggested him tri state area or california where there is significant desi population - Please correct me if I have wrong perception) and
3.campus placement
या निकषावर आधारीत आपला स्वतःचा अनुभव किंवा ओळखीतल्या कोणाचा अनुभव अस्ल्यास लिहाल का?
(अ‍ॅवरेज स्कोअर साठी कॅलिफोर्निया मधील इतरही काही कॉलेजेस माहित असतील तर प्लीज द्या)
धन्यवाद.

शॉर्ट लिस्ट ही आहे:
1.university of southern california
2.new york university
3.arizona state university
4.suny stony brook
5.northeastern university boston
6.rochester institute of technology
7.syracuse university
8.rutgers new jersey
9.suny buffalo
10.new jersey institute of technology

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

USC -

Quality of education चांगली आहे. प्रोफ्स चांगले आहेत. भरपूर देसी पब्लिक असतं. कॅम्पसच्या आसपास सतत पॅट्रोलिंग असतं DPS चं. जवळपासच्या कम्युटिंगसाठी Univ च्या ट्रॅम्स आहेत ज्या ऑलमोस्ट सगळे ऑफ कॅम्पस एरिआज कव्हर करतात. त्यामुळे बर्‍यापैकी सेफही आहे. बर्‍यापैकी अश्यासाठी कारण कॅम्पस डाऊनटाऊनला जवळ आहे. त्यामुळे ऑड अवर्सना वगैरे चोर्‍या (मगिंग) होऊ शकतात रस्त्यावरून जाताना.
बाकी USC is one of the best Univs. कॅम्पस वर चांगल्या चांगल्या कंपन्या येतात. मोठ्या कंपन्यांमधे इथले खूप विद्यार्थी आहेत त्यामुळे नेटवर्क जबरदस्त आहे नोकरी मिळण्याच्या दृष्टीने. प्लेसमेंटस साठी चांगली Univ आहे ही.

शॉर्ट लिस्ट मधे नाही पण स्वानुभवावरुन Uni. of Florida, Gainesville सुचवेन. भरपूर मोठी, सुरक्षित, उत्तम हवामान त्यामुळे मजा करता येते आणि campus placement चांगली आहे.

खालच्या दोन युनिव्हर्सिटीजचा वेगवेगळ्या कारणांनी फर्स्ट हँड अनुभव आहे.

स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीचं कंप्यूटर सायन्स डिपार्टमेंट हायली रेटेड आहे. प्लेसमेंटबद्दल कल्पना नाही. पण सेफ्टीच्या दृष्टीनं कँपस चांगलं आहे. ग्रॅज्युएट स्टूडन्ट अपार्टमेन्ट्समध्ये राहिलं तर पहिलं सेमिस्टर आरामात जाईल. 'शाँबर्ग' ग्रॅज्युएट अपार्टमेंट्सपासून काँप्यूटर साय्नस बिल्डिंग जवळ आहे. 'चेपिन' अपार्टमेन्ट्सपासून थोडं दूर. पण सतत बसेस फिरत असतात. त्यामुळे कुठेही जागा मिळाली तरी प्रॉब्लेम नाही. अफोर्ड करू शकणार्‍यांनी शाँबर्गला जावं. चेपिन मुलाबाळांनी गजबजलंय. ते चालणार असेल तर मात्र चेपिन स्वस्तं आहे. स्टोनीब्रूक, लाँग आयलंड या बर्‍याच महागड्या जागी असलेली शाळा आहे. तेव्हा ट्यूशन, राहण्याचा खर्च, कँपसवर जॉब या सगळ्याचं गणित मांडून निर्णय घ्यावा.

इथे पहिलं वर्षं तरीऑफ कँपस हाउसिंग टाळावं. एकतर ऑगस्टमध्ये आल्यावर लागलीच महिन्या दोन महिन्यात जीवघेणी थंडी सुरू होते. नंतर बर्फ! कार असलीतरी कँपसवर पार्किंगची बोंबाबोंब!

तसंच स्टोनीब्रूक युनिव्हर्सिटीला इथे अनेक शाळांना असलेलं टिपिकल 'युनिव्हर्सिटी टाउन' नाही. कँपसमधून चालत बाहेर पडलंय, आणि ग्रोसरीज, रेस्टॉरन्ट्स मिळतील असं नाही. तरीही स्टोनीब्रू़क फार छान जागा आहे, आणि युनिव्हर्सिटी भारी! Happy

प्राजा म्हणतेय त्या युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाबद्दल थोडं सांगू शकते. त्यांच्या कंप्यूटर सायन्स डीपार्टमेंटची आणि प्लेसमेंटची माहीती विचारून सांगते.

यूएफ टॉप पब्लिक युनिव्हर्सिटीजपैकी एक आहे. मुख्य म्हणजे गेन्स्व्हिल गाव युनिव्हर्सिटी टाउन आहे. ऑफ कँपस फॅसिलिटीज कँपसला लागून आहेत. कँपस बसेस किंवा टाउन बस सर्व्हिस शाळेच्या आतबाहेर करत असल्यामुळे इथे ऑफ कँपस हाउसिंग स्वस्त आणि जास्त सोपं पडू शकतं.

फ्लोरिड्यातलं वेदर भारतातून येणार्‍या व्यक्तीसाठी उत्तम आहे! Happy

या दोन युनिव्हर्सिटीजमध्ये इंटरेस्ट असेल तर मी जास्तीतजास्त माहिती गोळा करायला मदत करू शकेन.

मृण्मयी, धन्यवाद उपयुक्त Detailed माहितीबद्दल.
GRE च्या किती Min स्कोअरला इथे प्रवेश मिळु शकेल.

rmd
USC मधे GRE चा कट ऑफ किती आहे कल्पना आहे का?

..

एनीटाइम! Happy

स्टोनीब्रूक अंप्यूटर सायन्सेस- ग्रॅड स्कूल अ‍ॅडमिशनची माहिती: https://www.cs.stonybrook.edu/admissions/Graduate-Program

अप्लाय करताना लगणारी जास्तीची माहिती:
https://www.grad.stonybrook.edu/ProspectiveStudents/faq.shtml#scores
इथेच...
>>Is there a minimum GRE requirement?
The Graduate School does not have a minimum GRE requirement. You must contact the department to which you are applying to see if they have minimum GRE requirements for their admissions process.

पण TOEFL प्रमाणेच चांगल्या GRE स्कोअरमुळे टीएशिप मिळायचे चान्सेस वाढतात हे सत्य आहे. Happy

rochester institute of technology>>> भरपुर देसी जनता. लहान गाव. भरपुर बर्फ आणि थंडी, त्यामुळे शक्यतो पहिले वर्श ऑन कँपस राहणे चांगले. फी थोडी जास्त आहे बाकी स्टेट युनि पेक्षा.
येण्या पुर्वी देसी पब्लिक ला ( ईंडी असो ) काँटॅक्ट केल्यास राहण्याची - नविन जागा मिळे पर्यंत / पिक अप ची सोय करतात सहसा ( हेच बाकी अनेक युनि ला लागु होते).

syracuse university>> माझ्या माहिती मधे २ ते ३ लोक्स सोडुन RIT ला आले. ( कारण मला माहिती नाही).

नमस्कार,

त्याचा जी आर इ स्कोअर ३०७ इतका आला आहे. तो पुढीलपैकी युनिव मधे अप्लाय करणार आहे,
तुमच्या मते (त्याच्या स्कोअर नुसार) कुठल्या युनिव मधे मिळण्याचा चान्स आहे आणि कुठल्या अवॉइड कराव्यात?
(Univ of Alabama त्यांच्या कँपस मधे येणार आहे आणि spot admissions offerकरणार आहे. असेही हल्ली करतात का?)

धन्यवाद.

Rochester Institute of Technology
Stevens Institute of technology
New Jersey Institute of technology
Polytechnic University of new York(nyu poly)
Suny buffalo
Syracuse University
University of Texas Dallas
University of Texas Arlington
Arizona state University
University of Illinois Chicago
IIT CHICAGO
Csu long beach
Clemson University

University of Georgia
Oklahoma state university
University of North Carolina Charlotte
Utah state university
University of Connecticut
University of Alabama, Huntsville