Submitted by व्यत्यय on 27 February, 2015 - 09:31
"Insurance is a subject matter of solicitation" याचं "विमा आग्रहाची विषय वस्तू आहे" असं भाषांतर सगळ्याच विमा कंपन्या रेडियो वरच्या जाहिरातीत करतात पण या शब्दशः भाषांतराला काहीच अर्थ नाही. मूळ इंग्रजी वाक्याचा अर्थ अबाधित ठेवणारे मराठी भाषांतर तुम्ही कसे कराल?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनधरणीची बाब
मनधरणीची बाब
या वाक्याचे एका वाक्यात
या वाक्याचे एका वाक्यात जाहिरातीसाठी कॅची भाषांतर आत्ता नाही सांगता येणार. सुचले तर सांगेन.
पण याचा मतितार्थ असा की
ग्राहकाने स्वतःची विम्याची गरज ओळखुन त्याप्रकारच्या विम्याची मागणी स्वतःच केली पाहीजे.
( छुपा अर्थ असा की कंपन्या मार्केटींग करुन तुमच्या गळ्यात विमा पॉलिसी घालु शकत नाहीत / नियमानुसार घालु नये. जबरदस्तीने किंवा उगाच गरज क्रिएट करुन पॉलिसी विकली जाऊ नये. )
मला वाटते की हे वाक्य छापणे / जाहिरातीत बोलणे हे आय. आर. डी. ए. ( Insurance Regulatory and Development Authority ) च्या नियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे जाहिरातीमधे हे विचित्र वाक्य आणि त्याचे विचित्र भाषांतर पाट्या टाकल्यासारखे बोलले जाते.
हे एक आर्टीकल वाचता
हे एक आर्टीकल वाचता येईल.
http://www.moneylife.in/article/insurance-is-a-subject-matter-of-solicit...
विमा केवळ गरजेनुसार!
विमा केवळ गरजेनुसार!
सावली यांच्या प्रतिसादानुसार
सावली यांच्या प्रतिसादानुसार खालील वाक्य कसे वाटते?
विमा स्वत: मागणी करण्याची गरज आहे. कृपया माहिती पुस्तक काळजीपूर्वक वाचा.
exactly याच वाक्याचा हाच
exactly याच वाक्याचा हाच विचार मी आजच सकाली करत होते
स्वेच्छानिवडीची बाब ?
स्वेच्छानिवडीची बाब ?
विमा ही मागून घेण्याची बाब
विमा ही मागून घेण्याची बाब आहे.
(स्वतः) विम्याची मागणी करा.
साती आणि त्यानंतरचा टग्या
साती आणि त्यानंतरचा टग्या यांचा प्रतिसाद जोडून :
विमा ही आपली गरज तपासून घ्यायची वस्तू आहे. कृपया निर्णय घेण्यापूर्वी माहितीपुस्तक काळजीपूर्वक वाचा.
हे एक mandatory वाक्य आहे. म्युच्यल फंडांच्या जाहिरातीत
mutual fund investments are subject to market risks. Please read....अशी एक अनिवार्य घोषणा असते. ती अगदी बारीक टायपात छापतात किंवा दृकश्राव्य जाहिरातीत जोसात पळवतात.
खेड शिवापुर टोलनाक्यावर आज
खेड शिवापुर टोलनाक्यावर आज अशीच एक विचीत्र पाटी पाहिली. No hawkers zone" चे भाषांतर "विक्रेता निषेध".
काय असु शकेल अचुक भाषांतर? "ना विक्रेता क्षेत्र?" "विक्रेतारहित क्षेत्र?"
"विक्रेता निषेध" बहुतेक
"विक्रेता निषेध" बहुतेक हिंदीत असावे कारण हिंदीत तसा वापर योग्य आहे. मराठीत तुम्ही दिलेले भाषांतर (विक्रेतारहित क्षेत्र) बरोबर आहे.
विक्रेतारहित क्षेत्र?" >>>
विक्रेतारहित क्षेत्र?" >>> किंवा विक्रेतानिषिध्द क्षेत्र ?
विमा स्वेच्छाधिकार !...
विमा स्वेच्छाधिकार !...
विमा घ्याच, पण स्वेच्छेने
विमा घ्याच, पण स्वेच्छेने
Why ch? I don't need
Why ch? I don't need insurance.
JaaNoon ghyaa, jaaNiv
JaaNoon ghyaa, jaaNiv Thevaa;
Vimaa havaa. ...
"Insurance is a subject
"Insurance is a subject matter of solicitation".... भाषांतरात "आग्रह" चा उल्लेख जरी असला आणि त्याचा वापर होत असला तरी त्यातून नेमका अर्थ ग्राहकापर्यंत पोचला असे वाटत नाही.
"विमा आस्थेची विषयवस्तू आहे."....हा एक विकल्प चालू शकेल.
Solicitation हे नाम "प्रार्थना" या अर्थानेही घेतले जाते....पण वरील वाक्यात प्रार्थना अस्थानी वाटेल.
Solicitation चा एक अर्थ to
Solicitation चा एक अर्थ to ask for , to request for - 'मागणी करणे' असा आहे.
आणि हो, या 'आग्रहाची विषयवस्तु' वाल्या भाषांतरातुन नेमका अर्थ ग्राहकांपर्यंत नक्कीच पोहोचत नाही असे वाटते.
'आस्थेची' हे भाषांतरही योग्य नाही. आय. आर. डी. ए. ला जे सांगायचेय ते आस्था या शब्दात प्रतित होत नाहीये.
सावली... "Solicitation" चा
सावली...
"Solicitation" चा शासकीय शब्दकोशात "आस्था" असा दिला आहे. शासन त्या अर्थाने ह्या नामाकडे पाहते असे दिसल्यामुळे मग मी तसा प्रयोग करून ते वाक्य सुचविले आहे. मला वाटते 'आस्था' शब्दातील आपुलकी लोकापर्यंत पोचली जाऊ शकेल. अर्थात ही एक सूचना होती.
"Solicitation" चा शासकीय
"Solicitation" चा शासकीय शब्दकोशात "आस्था" असा दिला आहे. >> ओह हे माहित नव्हते. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयुर्विमा ऐच्छिक असेल पण
आयुर्विमा ऐच्छिक असेल पण सर्वसाधारण विमा सक्तीचाच असतो. जसे की,
@चेतन: विमा घेणे जरी सक्तीचे
@चेतन: विमा घेणे जरी सक्तीचे असले तरी कुठल्या कंपनी कडून कुठल्या प्रकारचा (थर्ड पार्टी, कॉम्प्रीहेन्सीव, झिरो डेप) विमा घ्यावा हे ग्राहकाच्या स्वेछेनुसारच असावे ना.
खालील वाक्य कसे वाटते?
"विमा आपल्या गरजेनुसार स्वेच्छेने घ्या. कुठल्याही जाहिरात अथवा दबाबाला बळी पडू नका. कृपया निर्णय घेण्यापूर्वी माहितीपुस्तक काळजीपूर्वक वाचा."
विमा केवळ गरजेनुसार!>>+१
विमा केवळ गरजेनुसार!>>+१
In my experience most people
In my experience most people don't feel need for the insurance unless its mandatory like car insurance. To make the situation worse, most people look at it as an Investment
. Most of the time Insurance Agent pitch the products as an Investment. The word Insurance is a taboo, still ! If the word Investment is used while starting the talk about insurance then people are more inclined to listen to the agent. People buy Insurance mostly for it's tax benefits so huge Insurance selling happens between Dec - Feb. This insurance buying pattern need to change.
Mass awareness is required to understand the difference between saving, investment and insurance.
विमा 'घ्यायचा नसतो';
विमा 'घ्यायचा नसतो'; 'उतरवायचा असतो ' घेणे या शब्दात खरेदी-विक्री दडलेली आहे.
रेडियो वर अजून एक जाहिरात
रेडियो वर अजून एक जाहिरात सारखी ऐकायला येते.
विद्या बालनच्या शौचालयांच्या जाहिरातीचे मराठी भाषांतर. त्यात विद्या म्हणते "खरी नटी मी नाही प्रियांका भारती आहे, जिने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घर सोडले."
इथे नटी (अभिनेत्री) च्या जागी "नायिका" हा शब्द हवा. पण पुन्हा एकदा शब्दश: भाषांतराने मार खाल्ला.
तशाच एका दुसर्या जाहिरातीत
तशाच एका दुसर्या जाहिरातीत विद्या बालन "...कारण ती आजारी जी पडणार आहे?" अशी अफलातून मराठी रचना करते. मूळ हिन्दी वाक्याचे शब्दशः भाषांतर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हिंदी वाल्यांना इतर भाषांची
हिंदी वाल्यांना इतर भाषांची मारायला जाम मजा येते. ते असे प्रकार नेहमी करतात .. आणि मराठी लोकांना मार ( भाषिक ) खायला मजा येते. कटू असले तरी सत्य आहे ..