स्वीट कॉर्नचे दाणे - २ वाट्या
बेबी कॉर्नचे १ से.मी. आकाराचे क्यूब्स - १ वाटी
पनीरचे १ से.मी. आकाराचे क्यूब्स - अर्धी वाटी
काजू - अर्धी वाटी
धने - १ चमचा
जिरे - २ चमचे
बडिशेप - २ चमचे
४-५ लवंगा
इंचभर दालचिनीचा तुकडा
२ लिंबं
मीठ
अमूल बटर - तीन चार चमचे
लाल तिखट - ऐच्छिक
आवडीप्रमाणे चीज
१. जमलं तर, वेळ मिळाला तर काजू अर्धे अर्धे करून दोन तास पाण्यात भिजवून घ्या. ह्याची चव छान वेगळी लागते.
२. स्वीट कॉर्नचे दाणे आणि बेबी कॉर्नचे क्यूब उकडून घ्या.
३. पनीरचे तुकडे पाण्यात घालून ठेवा.
४. धने, जिरं, बडीशेप, लवंगा, दालचिनी न जळू देता खमंग भाजून घ्या. जरा कोमट झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
५. एका कढईत अमूल बटर वितळवून त्यात उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे, बेबी कॉर्न घाला. काजू पाण्यातून निथळून काढून त्यात घाला. चवीप्रमाणे मीठ आणि तयार केलेली ताजी मसाला पावडर घाला. तिखटपणासाठी हवं असेल तर लाल तिखट घालून व्यवस्थित ढवळा. पनीरचे तुकडे घालून नाजूकपणे पनीर मोडू न देता ढवळा. वरून लिंबाचा रस पिळून नीट एकत्र करून गरमागरम खायला घ्या.
१. हे चाट नुसतंही खाता येतं, मी घरी केलं होतं तेव्हा कॅनॅपीजमध्ये भरून वरून थोड्डंसं चीज किसून घालून खायला दिलं होतं.
२. लिंबांची काटकसर करू नका. चाटची चव लिंबूरसामुळे खुलून येते.
३. मी ज्या लग्नात हे सर्वप्रथम खाल्लं होत तो आचारी MDH ची धनिया पावडर, जीरा पावडर आणि डेगी मिर्च पावडर घालत होता. लवंग, दालचिनी, बडीशेपेची कल्पना माझी आणि मला ती चव आवडली.
फोटो नाय तर मजा नाय
फोटो नाय तर मजा नाय
मस्तच आहे.
मस्तच आहे.
सोप्पी आहे त्यामुळे नक्की
सोप्पी आहे त्यामुळे नक्की करुन बघणार.
मसाला मस्त वाटतोय! फोटो
मसाला मस्त वाटतोय! फोटो पाहिजे..
लगेच हवं असेल तर मी फ्रोजन कॉर्न खरपुस भाजुन घेते.. मग टोमॅटो,कांदा,धने-जिरे पुड ,चाट मसाला नि कोथिंबीर.. १० मिनीटात तय्यार!!
मस्त आहे. करायलाच पाहिजे
मस्त आहे. करायलाच पाहिजे असं.
मस्त!
मस्त!
कॉर्न चाट म्हटलं की कांदा
कॉर्न चाट म्हटलं की कांदा टोमाटो शेव चाट मसाला वालं आम्हा गरीबांचं पोटभरू चाट समोर येतं. यात काजू आणि पनीर शिवाय नुकताच केलेला गरम मसाला असल्याने नियमानुसार याचं नाव "शाही कॉर्न चाट" ठेवायला हवं.
*खरंच, म्हणजे मस्त पार्टीचे मेनू सांगतानाही या पदार्थाचं नाव अदबीनं घेतलं जाईल.
आहा.. फारच मस्त रेसिपी.. पण
आहा.. फारच मस्त रेसिपी.. पण फोटो हवाच!!
मस्तच सोपी कृती आहे. नक्की
मस्तच सोपी कृती आहे. नक्की करणार.
छान कृती.
छान कृती.
है शाब्बास! फोटो नसूनही
है शाब्बास! फोटो नसूनही रेसिपी तत्परतेने टाकल्याबद्दल धन्यवाद :). ( दम द्यायला विसरलीस का? )
रेसिपी लवकरच करून बघेन
मस्त
मस्त
वा! वा! मस्त आहे हा प्रकार!
वा! वा! मस्त आहे हा प्रकार! थॅक्स मंजूडी
आशुडी +१ शाही कॉर्न चाट
आशुडी +१
शाही कॉर्न चाट म्हणायला हवे.
मस्त चटकदार पाकृ
मी पण गरीबाचं पोटभरू चाटच
मी पण गरीबाचं पोटभरू चाटच खाल्लंय. हे 'इंदौर्की शाही चाट' नक्की करणार.
मंजूडी, गरमागरम द्यायचं म्हणजे ५व्या स्टेपला बटर वितळल्यावर सगळ मिसळेपर्यंत gas चालूच ठेवायचा ना.
सह्हीये प्रकार! मस्तच लागत
सह्हीये प्रकार! मस्तच लागत असणार!
मस्त! पनीर न तळता म्हणजे
मस्त! पनीर न तळता म्हणजे नाजूक हाताने मिक्स करावे लागणार हे चाट!
फोटो येऊ द्या लवकर
वेगळी आणि मस्तं पाककृती
वेगळी आणि मस्तं पाककृती आहे.
चाट म्हंटल्यावर धने, बडीशोप, लवंग, दालचिनी घालायचं डोक्यात येत नाही. हे घालून करून बघेन.
पनीरचे तुकडे का भिजवत
पनीरचे तुकडे का भिजवत ठेवायचे? त्याने ते लवकर मोडतील असं वाटतं.
रेसिपी मस्त आहे.
मस्तच आहे..... एकदम नवीन अगदी
मस्तच आहे..... एकदम नवीन अगदी कोरी-करकरीत रेसीपी.... येत्या विकान्ताला करणारचं
वेगळीच आहे ही चाट. पनीर वगळून
वेगळीच आहे ही चाट. पनीर वगळून करून बघेन.
हुश्श आली एकदाची मला अपेक्षित
हुश्श आली एकदाची मला अपेक्षित पोस्ट मी पण पनीर न घालताच करेन म्हणते.
सिंडरेला तरी बटाटे घालेन असं
सिंडरेला तरी बटाटे घालेन असं लिहीता लिहीता थांबले.
paneer che tukade fresh
paneer che tukade fresh rahave mhanun panyat thevataat.
aamhI ghari paneer aanale ki panyat ghalunch freeze madhye thevato nehemi.
chat aawadali.
पनीरचे तुकडे का भिजवत
पनीरचे तुकडे का भिजवत ठेवायचे?>> थॉ करण्यासाठी सायो आणि अल्पना +१.
पनीर न घालून चवीत काही फरक पडणार नाही. पण मधून तोंडात पनीर/ काजू येणं आवडलं होतं.
अमित, हो! सगळं नीट एकत्र होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा.
फक्त शंका आणि प्रश्नांचीच दखल
फक्त शंका आणि प्रश्नांचीच दखल घ्यायची आणि कौतुकाचा अनुल्लेख करायचा एवढा विनय बरा नव्हे!
कौतुक कुठे दिसलं नाही
कौतुक कुठे दिसलं नाही त्यामुळे अनुल्लेखाचा प्रश्नच येत नाही.
बर.
बर.
वाह...मस्तच लागेल. नुसते
वाह...मस्तच लागेल. नुसते वाचूनच छान वाटले.
मंजूडी धन्स ग...एक वगळीच झट की पट होणारी रेसिपी सुचवल्याबद्दल...
दोन लिंबं पाहून जरा शंका आली
दोन लिंबं पाहून जरा शंका आली होती, पण <लिंबांची काटकसर करू नका. चाटची चव लिंबूरसामुळे खुलून येते.> हे पटलंच. लिंबात काटकसर नकोच.
मस्त आहे प्रकार! (कॅनपीज मिळाल्या की) करणार नक्कीच.
आपल्याकडे 'कॉर्न फॅन क्लब' आहे का? नसेल, तर काढूया का?
Pages