२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन- कार्यक्रमांची माहिती

Submitted by BMM2015 on 25 February, 2015 - 15:11

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे एक महत्वाचे विशेष म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये उत्तर अमेरिकेतील कलाकारांना आपली कला लोकांपुढे सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते. अधिवेशन समितीने आलेल्या प्रवेशिकातून अनेक दर्जेदार कार्यक्रम निवडले आहेत. नाट्य रसिकांसाठी यावेळी विशेष मेजवानी आहे. ’मी आणि माझा ओझे (Jose)’ हे विनोदी नाटक न्यू जर्सीच्या कलाकारांकडून यावेळी सादर होणार आहे. ह्युस्टनचे कलाकार यावेळी ‘दुर्गा झाली गौरी’ हे सुप्रसिद्ध नाटक सादर करणार आहेत. न्यू जर्सीच्या कलाकरांकडून उदकशांत नावाचे नाटकही सादर होणार आहे. त्याशिवाय सॅन फ्रान्सिस्को बे एरीआच्या कलाकारांकडून तीन पैशांचा तमाशा हे नाटक या अधिवेशनता सादर होणार आहे. आणि या सर्व नाटकांव्यतिरीक्त मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेले गोष्ट तशी गमतीची हे नाटक भारतातील गाजलेल्या कलाकारांकडून सादर होणार ते वेगळेच! नाटकांव्यतिरीक्तही अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल या अधिवेशनात असणार आहे. शिकोगोतील कलाकारांडून ‘पडल्यावर प्रेमात’ हा कार्यक्रम तर सॅन फ्रान्सिस्कोतील कलाकरांकडून ‘मराठी चित्रपटाची १०० वर्षे’ हा मराठी चित्रपटाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर कार्यक्रम सादर होणार आहे. लॉस एंजलिसच्या कलाकारांकडून ‘राग तरंग’ हा संगीताचा कार्यक्रम तर मागील अधिवेशनात गाजलेला ‘उभ्या उभ्या विनोद’ हा कार्यक्रमही या अधिवेशनात सादर होणार आहे.

अच्युत गोडबोले हे नाव आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलं असेलच. आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनियर झालेल्या अच्युत गोडबोल्यांनी सुमारे ३२ वर्षे सॉफ्टवेअरच्या जगतात अनेक मोठ्या पदांवर काम केले. अच्युतनी आय टी विषयीची अनेक इंग्रजी पुस्तके लिहीली आहेतच, पण विशेष म्हणजे त्यांनी अनेक मराठी पुस्तेकेही लिहीली आहेत. संगणकयुग हे संगणकांवर, बोर्डरुम हे व्यवस्थापनावर, नववेध हे संगीतावर, किमयागार हे विज्ञानावर, नॅनोदय हे नॅनोटेक्नॉलॉजीवर, मनात हे मानसशास्त्रावर आणि गणिती हे गणितावर लिहीलेले त्यांचे पुस्तक! अशा अनेक विविध विषयांवर त्यांची पुस्तके लोकप्रिय झालेली आहेत. २०११ च्या युवा नाट्य साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अच्युत गोडबोले यांनी माहीती तंत्रज्ञान विषयावरील टेडएक्स (TEDx) लेक्चर्सही दिली आहेत. त्यांनी मुंबईमध्ये आशियाना नावाची मतिमंद मुलांसाठीची शाळाही सुरु केली आहे. धुळे जिल्ह्यातल्या शहाद तालुक्यातील भिल्ल आदिवासी लोकांमध्येही त्यांनी काम केलेले आहे. सध्या ते सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतात. अशा या चतुरस्त्र व्यक्तीमत्वाला लॉस एंजलिस अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून घोषित करताना अधिवेशन समितीला विशेष आनंद होत आहे

मनोरंजनाच्या कार्यक्रमांव्यतिरिक्तही अनेक या अधिवेशनात मागील अधिवेशनांप्रमाणेच एक दिवसाचा व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रमही होणार आहे. आपला व्यवसाय कसा वाढवायचा यावर या कार्यक्रमात परिसंवादही होणार आहे. या वर्षीच्या अधिवेशनात ५५+ लोकांसाठी उत्तररंग ही खास परिषद होणार आहे. या वयोगटातील समस्या आणि त्यांचे निराकरण यावर या परिषदेत अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. हे दोन्ही कार्यक्रम अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे २ जुलैला असणार आहेत. हे कार्यक्रमाला तुम्हाला जायचे असेल तर नावनोंदणी करताना त्या ऑप्शनवर चेक करायला विसरु नका. या व्यतिरीक्त युवा पिढीतील लोकांसाठी - विशेषत: १८ ते ३५ वयोगटातील लोकांसाठी यावेळी क्रूझ नाईट, क्लब नाईट आणि स्पीड डेटीगं (स्नेहबंधन) अशा तीन खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या अधिवेशनात मानसिक आरोग्यावरही एक विशेष कार्यक्रम होणार आहे.

हे सर्व वाचल्यावर तुम्हाला नावनोंदणी करावीशी वाटली नाही तरच नवल! चांगल्या सीट अजूनही शिल्लक आहेत. लवकरात लवकर नोदंणी करून या सीटवर आपला हक्क प्रस्थापित करा. अधिवेशनाची नावनोंदणी www.bmm2015.org या अधिवेशनाच्या वेबसाइटवरून करता येईल. अधिवेशनाबाबत कुठल्याही प्रश्नाची उत्तरे आपल्याला info@bmm2015.org या इमेलवर अथवा ३१० ७७६ ५५९३ या फोनवर मिळू शकेल. ​

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांसाठी काहीच कसं नाही? वेबसाईटवर पण मोठ्यांच्या नाटकाची जाहिरात दिसते. मुलांसाठीची प्लीज लिंक द्या.

उत्तर अमेरिकेतील होतकरु तसेच प्रस्थापित लेखकांसाठीपण एक व्यासपीठ या अधिवेशनात असणार आहे (यात अर्धे मायबोलीकर फिट्ट बसावेत)

http://bmm2015.org/cultural-programs/north-american-programming/naman/

त्यात दिलेल्या ईमेलवर नमन सचिवांशी जरुर संपर्क साधावा

बीएमएमच्या कार्यक्रमांच्या निवडीसाठी काय निकष असतात? एकाच मंडळाकडून एकापेक्षा जास्त कार्यक्रम स्वीकारले जातात का? तसेच आधीच्या अधिवेशनात सादर केलेला कार्यक्रम पुढच्या अधिवेशनासाठी विचारात घेतला जातो का?

अलिकडेच एका ३ दिवसांच्या कॉनफरंस करता हे अ‍ॅप टेस्ट ड्राइव्ह केलं माझ्या काही कलीग्जनी.

https://guidebook.com/event-apps/

अधिवेशनाच्यावेळी हे किंवा या सारखे काही अ‍ॅप्स वापरायचा प्लॅन आहे का ?

आमचे दोन कार्यक्रम आहेत यंदाच्या बीएमेमला...
१) मराठी लोककलांवर आधारीत - खेळ मांडियेला !
२) कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आधारीत - वाटेवरच्या सावल्या !

सुपर टेन्स पण एक्सायटेड फॉर बीएमएम.... पण मजा करू सगळे भेटून Happy

मेधा,

हो अ‍ॅप तयार करण्याचं काम चालू आहे. आणि सर्वांना ते अधिवेशनाच्या आधीच आपल्या मोबाईल डीवाईसवर उतरवता येईल.

मी ओपनिंग सेरिमनीत इतर १० मैत्रीणीं बरोबर गृप डान्स मधे पार्टीसिपेट केलय, बीएमेम ला आलात तर ओळखा मला स्टेज वरून :).