अस्मिता

Submitted by मानसी२२ on 17 February, 2015 - 17:02

अस्मिता - Lady Detective ह्या कार्यक्रमावर धागा माझ्या वाचनात आला नाही म्हणून हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते झी टीव्ही वरच्या प्रत्येक मालिकेवर एक एक धागा पाहिजेच पाहिजे Happy
अस्मिता मालिका मला स्वताला आवडते. एक एक भाग छान घेताहेत आणि आत्ता अस्मिताच करार लग्न झाल्यावर तर मालिकेतली गम्मत वाढलेय . तिच्या नवऱ्याच आणि आजीचं क्यारेकटर्स ( पात्र ) तर मस्त डेव्हलप केली आहेत. त्या दोघांमुळे मालिकेत थोडा हसरे पणा आलाय . मी तर ही मालिका बघतेच बघते. बाकीच्या बोअर मालिकांपेक्षा दर भागात किव्वा दोन भागात एक एक वेगळी केस दाखवल्यामुळे मालिकेतल ताजे पणा टिकून आहे Happy

टीव्हीवरच्या प्रत्येक मालिकेसाठी स्वतंत्र धागा असलाच पाहिजे असा नियम झालाय का?>>
अजिबात नाही, पण इतर एवढ्या पकाऊ मालिकांचे धागे आहेत म्हटले ही बरी मालिका आहे, not so melodramatic , म्हणुन धागा काढला. Happy

म्याडम, रागावू नका !!! ज्या सिरिअल्स वर चर्चा होते त्या धांदात एकदम सपक आणि वैतागवाण्या आहेत म्हणून केवळ त्यांवर टीका करता यावी यासाठी त्यांचे धागे काढले जातात (आतापर्यंतचा नवीन वाचक म्हणून माझा आलेला अनुभव मी सांगत आहे). आणि म्हणूनच एखाद्या न बघितल्या जाणाऱ्या किंवा चांगल्या सिरिअलचे धागे कमी निघतात.

थ्यांक्स मानसी ताई !!!!!!! बर तुमच्या अस्मिता म्याडम चा नवरा छान दिसतो. चेहरा जरा सुकलेला वाटतो थोडा तजेला हवा होता चेहऱ्यात. बाकी एकदा पाहिला होता एक भाग जेव्हा त्या अस्मिता चे लग्न होते आणि लग्नाच्या दिवशी तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या सुनेचा छळ वैगरे होत असतो आणि तीच केस नेमकी तिच्याकडे असते. अगदी अगदी वाटले होते आता हि सुद्धा सिरिअल सासू सुनेच्या वाटेवर जाते कि काय पण ठीक आहे.

मला पण आवडते अस्मिता.. निदान रोजच्या रटाळ रड्या मलिकांपेक्षा चांगली आहे. आजच्या काळतही सासूसुना, भातुकली अन घर-घर खेळणार्‍या मालिकांपेक्षा काही तरी वेगळं आहे. भलेही केसेस साध्या किंवा फार पंचिंग नसल्या तरी टाकाऊ नाहीत.

आमच्याकड माझे साबु सारखे चॅनेल बदलत असतात. त्यामुळे झी आणी ई आलटुन पालटुन पाह्यले जातात. ई वर हम्मा लाईव्ह असताना मध्येच अस्मिता लावतात, त्यामुळे टिव्हीवरचे हसरे वातावरण एकाएकी बदलुन एकदम रडके, उदास, गुढ, सन्शयी होत रहाते. आमचे चेहेरे पण आलटुन पालटुन तश्याच प्रतीक्रिया देत रहातात.

मी कदी मदी पहाते अस्मिता, पण लग्ना आधी ( अस्मिताच्या, माझ्या नाही) सिरीयल जोरात होती. केसेस धडाधड चाल्ल्या होत्या, आता रटाळ झालेय.:अरेरे:

हे मात्र खरं.. आधी केसेस एकाच आठवड्यात संपायच्या. आता टू बी कंटिन्युड होतात... घरची कामं सांभाळत करत असेल ही बयो केसेस सॉल्व्ह Proud

कोण ग भाची??

कल्याणी एका एपिसोडमधे मिसेस प्रधान दाखवली होती, तिच्या मुलावर एक मुलगी आळ घेते अशी काहीतरी केस होती, ती माझी भाची 'माधवी सोमण'. Happy

हो कल्याणी. आता ती प्रीती परी तुजवरती मध्ये आहे हिरोची आई.

पण सिरीयल सहन करायची सहनशक्ती माझ्याकडे नाही म्हणून मी एकदा दोनदा तिला जाऊन बघते, बास.

तिच्या नवीन नवीन केसेस. आत्ता हळू हळू तिची सासू पण तिच्या केस मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलेय. दहावीच्या परीक्षा चालू आहेत न ( का संपल्या? ) त्या निमिताने एक कॉपीची केस घेतलेय Happy

माझ्या मते अस्मिताच्या वडलांच्या खुनात त्यांचा ( सासर्यांचा ) हात आहे. ती केस खर तर बंद झालेय. पण अस्मिता अस्वस्थ आहे. तीच समाधान झालेलं नाही. त्यामुळे कोणत्याही वेळी तिच्या मनात येईल केस ओपन करूया ती त्याच्यात लक्ष घालेल आणि एकदा का तिने खोलात जाऊन शोधाल तर तो ( सासरा ) सांपडेल. अर्थात ते सासर्याला नकोय म्हणून तो सारखा तिच्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याला भीती वाटतेय कधीही तिच्या डोक सणकेल आणि ती केस ओपन करेल Happy

अच्छा, मला वाटलं सासर्याला तिची प्रगती बघवत नाही (पु. प्र. संस्क्रूुती) म्हणून तो तिचे बोलणे चोरुन ऐकतो आणि तिच्या केसमध्ये अडथळे आणतो. तिचे काम बंद पडावे म्म्हणून, असा मी तर्क लढवला होता. Happy

Kitihi gruhit dharale ki hi agadi ch "balbodh" malika aahe. Lahan mulana far tar ya detective stories madhe tharar vagere vatu shakto. Pan, mala koni sangel ka ki Asmita cha navra kam kay karto? Tyache tyache mhanun kahi career aahe ki nahi? Ki fakt Asita la support karne evadha ch ek kalami karyakram?

ही चालू ठेवलीय की झीने आणि डी ३ वर गदा आणली.

आता तो अभिमान नाही का शिरेलीत. एकदा आईकडे गेले तेव्हा ५ मिनिटं बघितली त्याने वडिलांना पकडून दिलं काहीतरी चालू होतं. त्यानंतर प्रोमो दाखवले त्यात दिसला नाही तो. तो आवडतो मला पण तो आहे म्हणून चुकूनही ही सिरीयल पहावी असं वाटलं नाही.

Pages