फ्लोअर प्लॅन

Submitted by मेधावि on 11 February, 2015 - 17:12

माझ्या आई वडिलांचे पेठेतले घर (अपार्ट्मेंट)३५ वर्षांपूर्वी बांधलेले आहे. त्याचे त्यावेळी जे अ‍ॅग्रीमेंट झाले होते त्याचे ओरिजिनल पेपर्स व ईन्डेक्स २ चा उतारा पूर्वीच्या पद्धतीने लगेच मिळत नसे. त्यावेळी ते तहसिलदाराकडे जावून काही वर्षांनी आणावे लागे. घर ज्याने बांधले होते त्या कॉन्टॄक्टरने बर्‍याच लोकांना बर्‍याच प्रकारे फसवले होते व त्यातून आलेल्या वैतुश्ट्यामुळे त्याने कोणालाच सेल डीड करून दिलेले नाही व संपूर्ण बिल्डींगमधील लोकांकडे अजूनही त्या व्यवहाराचे ओरिजिनल कागद नाहीत. अ‍ॅग्रीमेंट केले होते त्याची ओरिजिनल रिसिट व अ‍ॅग्रीमेंट फॉर सेलचे झेरॉक्स पेपर्स आहेत तसेच फ्लॅटचे क्म्प्लीशन सर्टीफिकेट आहे.. वडिल आता वयस्कर आहेत व आता त्यांचे ते घर विकण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे महसूल विभागामधे मूळ कागदपत्रे मिळावीत ह्यासाठी मी नुकताच अर्ज केला. त्यामधे असे समजले की त्यावेळेस काही गोष्टींची तृटी असल्यामुळे त्या व्यवहाराचे इन्डेक्स २ तसेच ओरिजिनल व सर्टीफाईड कॉपी बनलेच नाही. आता ती कागदपत्रे मिळवणे अधिकच कठीण झाले आहे. ती तयार क्रण्यासाठी अ‍ॅप्रुव्ह्ड फ्लोअर प्लॅन मिळवायचा आहे. तो कुठे मिळू शकतो? कंप्लीशन सर्टीफिकेट आहे म्हणजे नक्कीच फ्लोअर प्लॅन सॅन्क्शन झालेला असणार.कॉर्पोरेशन्मधून तो कसा मिळवावा? कोणी ह्या केसमधे काही अनुभव/युक्तीच्या चार गोष्टी सांगू शकेल का?

वरदा, ही जुने दस्तऐवज केस तुझ्या अखत्यारितली तर नाही ना? Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी - लोन नाही घेतले.

सोसायटी फॉर्म झालेली आहे. बिल्डरच्या विरोधात कोर्ट केस चालू आहे कारण त्याने काही अनधिकृत दुकानदार घुसवले आहेत. तो म्हणतो की त्यांना रेग्युलराईज करून घ्या व मग मी तुम्हाला काय हवी ती मदत करेन. आता बिल्डर व इतर घरमालक सगळेच जण ८०+ आहेत त्यामुळे मी बॅकलॉग सोडवायला घेतलाय Happy

कॉर्पोरेशन मधे अर्ज केल्यावर मिळतो फ्लोअर प्लॅन.. त्यासाठी तिथे कामाला असलेल्याच कोणाला तरी मदतीला घेउन काम होईल.

सुमेधा, पुणे मनपाचे रेकॉर्ड ऑफिस नानावाड्यात आहे, दुसऱ्या मजल्यावर. तिथे कम्प्लिशन सर्टिफिकेट घेऊन गेलात, तर ते त्या आधारे जुन्या फाईल शोधून देतील. अर्ज केल्यावर त्यातील कागदपत्रांची सर्टिफाईड कॉपी देतील. थोडा वेळ लागू शकतो, पण फाईल मिळण्याची शक्यता बरीच आहे. मला १९७५ सालची फाईलही मिळाली होती.

जी कागदपत्रे आम्ही शोधत होतो ती सर्व कागदपत्रे महसूल विभागाकडेही नाहीत असे समजते आहे. त्यांनी १५ दिवस त्यांची सर्व ऑफिसे शोधलीत असे समजले. अश्या वेळेस शासन काय करते कोणास काही कल्पना आहे का? कसलेसे सर्टीफिकेट देऊ असे मोघम बोलले आहेत शासकीय अधिकारी.